Jio Prepaid Plan :नवी दिल्ली : दूरसंचार कंपन्या जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्रीपेड प्लॅन (prepaid Plan) बाजारात आणत असतात. टेलिकॉम कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. अशात जिओ (Jio)अनेकदा आपल्या यूजर्ससाठी नवनवीन प्लान आणत असते. आता कंपनीने आणखी एक नवीन प्लॅन आणला आहे. या प्लानमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासह अनेक सुविधा मिळतात. आपण अशाच एका स्वस्त जिओ प्लॅनबद्दल (Jio Prepaid Plan) जाणून घेणार आहोत. या प्लॅनमध्ये जिओ तुम्हाला कमी किंमतीत अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटाची ऑफर देखील देते. (Jio prepaid plan with many benefits in reasonable charges)
जिओ फोन ऑल-इन-वन प्लॅनची (Jio Phone All in one plus)) किंमत 28 दिवसांच्या वैधतेसाठी 91 रुपये असेल. पण लक्षात ठेवा हा प्लान फक्त जिओ फोनच्या ग्राहकांसाठीच असेल. जर तुम्ही 91 रुपयांच्या बाबतीतही बघितले तर तुम्हाला 336 दिवसांसाठी 1092 रुपये खर्च करावे लागतील. पण तुम्ही त्यापेक्षा कमी किंमतीत प्लॅन खरेदी करू शकता. प्लॅनमध्ये तुम्ही 193 रुपयांपर्यंतची बचत देखील करू शकता. पण हे प्रीपेड प्लॅन घेण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे.
अधिक वाचा : The Great Khali : WWE स्टार खलीचा आजही जलवा कायम, आहे गडगंज संपत्तीचा मालक
Jio फोन ग्राहकांना नवीन प्लॅन फक्त 899 रुपयांमध्ये मिळतो आहे. ग्राहकांना 28 दिवसांसाठी 2 GB डेटा मिळेल. अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही आहे. तुम्हाला एसएमएस पाठवण्याची सुविधा देणारा प्लॅन हवा असेल, तर हा प्लॅन तुम्हाला पूर्ण 28 दिवसांसाठी 50 एसएमएस देत आहे. पण यासाठी तुम्ही जिओ फोन वापरणारे असणे आवश्यक आहे. कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या प्लॅनच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला आहे.
अधिक वाचा : Weight Loss: वजन कमी करताना Breakfast मध्ये खाऊ नका या गोष्टी, नाहीतर होईल उलटा परिणाम
यासोबतच कंपनी Jio Cinema, Jio TV चे सबस्क्रिप्शन अगदी मोफत देते. म्हणजेच फक्त 899 रुपयांमध्ये तुम्हाला असे अनेक फायदे मिळत आहेत जे मनोरंजनासाठी आवश्यक आहेत. जिओचे हे प्लान तुम्ही कुठूनही खरेदी करू शकता. हा प्लॅन पेटीएम, फोनपेनेही रिचार्ज केला जाऊ शकतो. हा प्लॅन My Jio अॅपवरही उपलब्ध आहे.
भारतातील दूरसंचार कंपन्यांमधील स्पर्धा तीव्र होत चालली आहे. त्यामुळे कंपन्या एकामागोमाग एक नवे प्लॅन बाजारात आणत असतात. दुसऱ्या बाजूला मोबाइल रिचार्जचा खर्च वाढत चालला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दूरसंचार कंपन्या वेगवेगळे प्लॅन आणत असतात. एअरटेल, जिओ, व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएल यांच्यात ग्राहक वाढवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असते.
भारत सरकारने टेलिकॉम कंपन्यांना भारतात 5G सेवा देण्यास परवानगी दिलेली आहे. तुम्हाला 5Gची सेवा हवी असेल तर तुमच्याकडे 5G मोबाईल असणे गरजेचे आहे. भारतात सर्वप्रथम जियो आणि एअरटेल 5Gची सेवा देणार आहेत.
5G स्पेक्ट्रम लिलावाची प्रक्रियादेखील पूर्ण झाली असून दूरसंचार कंपन्यादेखील तयारीत आहेत. त्यामुळे देशात 5G मोबाइल सेवा सुरू होण्याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav)यांनी मोठी माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात देशात 5G मोबाइल सेवा सुरू होईल. खरंतर अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे की 12 ऑक्टोबर 2022 पर्यंत देशात 5G मोबाइल सेवा सुरू केली जाईल.