Jio Recharge: 2016 साली रिलायन्सची जिओ सेवा देभभरात लॉन्च झाली. जिओमुळे अन्य टेलिकॉम कंपन्यांना चांगलाच झटका बसला. ज्यावेळी जिओची सेवा लॉन्च झाली तेव्हा रिलायन्सनं लोकांना फ्री कॉलिंग आणि स्वस्त डेटा असं गिफ्ट दिलं होतं. कंपनीनं आपल्या कॉमर्शियल सुरूवातीचे जवळपास तीन वर्षांपर्यंत ही सुविधा कायम ठेवली. मात्र ऑक्टोबर 2019 मधल्या दुसऱ्या आठवड्यात कंपनीनं आययूसीचा संदर्भ देतं सर्व नेटवर्कवर मिळणारी फ्री कॉलिंगची सुविधा बंद केली. कंपनीनं यासाठी आययूसी चार्जचं कारण सांगून आणि आपल्या नेटवर्कवर म्हणजेच जिओ ते जिओवर फ्री कॉलिंगची सुविधा सुरू ठेवली.
तर अन्य नेटवर्कवर म्हणजेच जिओकडून कोणत्याही अन्य नेटवर्कवर कॉलिंगवर 6 पैसे प्रति मिनिट असा चार्ज लागेल. टेलिकॉम कंपनीच्या या निर्णयानंतर जास्त प्रमाणात सब्सक्राइबर्संनी या निर्णयाचा विरोध केला. कंपनीकडून लावण्यात आलेले चार्जच्या ऐवजी अतिरिक्त डेटा मिळणार आहे. जिओ सतत आपल्या कॅम्पेनिंगमध्ये म्हणत आहेत की, त्यांना अन्य टेलिकॉम कंपन्यांना चार्ज द्यावा लागत आहे. ज्यामुळे आम्ही ग्राहकांवर चार्ज लावला आहे.
जिओच्या पोर्टफोलियोमध्ये सर्वांत जास्त चर्चित 1.5 जीबी डेटा दररोज आणि 2 जीबी डेटा दररोज असा प्लान आहे. जिओच्या पोर्टफोलियोमध्ये काही अन्य प्लान देखील आहेत. ज्यातून काहींमध्ये जिओ टॉक टाइम देते. जिओनं ग्राहकांना आणखी एक झटका दिला आहे. ज्याच्या अंतर्गत आता जिओ ग्राहकांना फुल टॉक टाइम मिळणार नाही आहे.
जिओच्या पोर्टफोलियोमध्ये 10 रूपयांपासून 1000 रूपयांपर्यंत टॉक टाइम प्लान मिळतो. याआधी या प्लानमध्ये फुल टॉक टाइम मिळत होता. जो आता मिळत नाही आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आययूसी चार्ज लागू करण्यासोबतच कंपनीनं फुल टॉक टाइमचा लाभ बंद केला आहे.
10 रूपयांच्या टॉक टाइम रिचार्जवर जिओ 7.47 रूपयांचा टॉक टाइम देत आहे. 20 रूपयांच्या रिचार्जवर कंपनी 14.95 रूपयांचा, 50 रूपयांच्या रिचार्जवर 39.37 रूपयांचा टॉक टाइम, 100 रूपयांच्या रिचार्जवर 81.75 रूपयांचा टॉक टाइम, 500 रूपयांच्या रिचार्जवर 420.73 रूपयांचा टॉक टाइम आणि 1000 रूपयांच्या टॉक टाइमवर 844.46 रूपयांचा टॉक टाइम मिळणार आहे. दुसरीकडे हे ध्यानात ठेवा की, रिलायन्स जिओच्या चर्चित डेटा प्लान देखील आता आययूसी टॉक टाइम व्हॉउचरसोबत मिळत आहे. प्रीपेड यूजर्स आपल्या सुविधेनुसार आययूसी रिचार्ज निवडू शकता.