JioPhone Next झाला लॉंच, फक्त १,९९९ रुपयांच्या ईएमआयवर, पाहा कुठे खरेदी कराल

JioPhone Next Launch | जिओफोन नेक्स्टची किंमत फक्त ६,४९९ रुपये असणार आहे. हा स्मार्टफोन (Smartphone) फक्त १,९९९ रुपयांच्या ईएमआयवर विकत घेतला जाऊ शकतो. ग्राहकांना उर्वरित किंमत १८ किंवा २४ महिन्यात सोप्या हफ्त्यांमध्ये भरता येणार आहे.

JioPhone Next
जिओफोन नेक्स्ट 
थोडं पण कामाचं
  • जिओने (Reliance Jio) आपला स्वस्त स्मार्टफोन लॉंच केला
  • जिओफोन नेक्स्ट हा फोन ४ नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध
  • जिओफोन नेक्स्ट फक्त १,९९९ रुपयांच्या ईएमआयवर विकत घेता येणार

JioPhone Next Launch | नवी दिल्ली: रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपला स्वस्त स्मार्टफोन लॉंच केला आहे. जिओफोन नेक्स्ट (JioPhone Next) बाजारात आला आहे. दिवाळीनंतर ४ नोव्हेंबरपासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. जिओफोन नेक्स्टची किंमत फक्त ६,४९९ रुपये असणार आहे. हा स्मार्टफोन (Smartphone) फक्त १,९९९ रुपयांच्या ईएमआयवर विकत घेतला जाऊ शकतो. ग्राहकांना उर्वरित किंमत १८ किंवा २४ महिन्यात सोप्या हफ्त्यांमध्ये भरता येणार आहे. जिओफोन नेक्स्टला रिलायन्स जिओ आणि गुगलने संयुक्तरित्या डिझाइन केले आहे. (JioPhone Next Launch: Reliance Jio launches new JioPhone Next, get the phone on EMI of Rs 1,999)

कुठे खरेदी करता येईल  JioPhone Next

जिओफोन नेक्स्ट हा स्मार्टफोन जवळच्या जिओ मार्ट डिजिटल रिटेलर्स स्टोअर किंवा जिओच्या www.jio.com/Next या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करून विकत घेता येणार आहे. ग्राहकांना आपला व्हॉट्सअॅप नंबरवरून ७०१८२७०१८२ या नंबर Hi मेसेज पाठवून JioPhone Next बुक करता येणार आहे.

या जिओ रिचार्ज आणि ईएमआयसोबत येईल जिओफोन नेक्स्ट

Always on Plan: या प्लॅनमध्ये ग्राहकांना १८ महिन्यात ३५० रुपये आणि २४ महिन्यात ३०० रुपये द्यावे लागतील. ग्राहकांना प्लॅनसोबत ५जीबी डेटा आणि १०० मिनिट प्रति महिना व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे.

Large Plan: या १८ महिन्यात ५०० रुपयांचा ईएमआय आणि २४ महिन्यांसाठी ४५० रुपये प्रति महिना द्यावे लागतील. या प्लॅनमध्ये १.५ जीबी डेली डेटा मिळणार आहे आणि सोबत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. 

XL Plan: या प्लॅनमध्ये डेली २ जीबी मिळेल. या प्लॅनमध्ये १८ महिन्यांसाठी ५५० रुपये आणि २४ महिन्यांसाठी ५०० रुपये प्रति महिना द्यावे लागतील.

XXL Plan:या प्लॅनमध्ये २.५ जीबी डेली डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळेल. यामध्ये १८ महिन्यांसाठी ६०० रुपये आणि २४ महिन्यांसाठी ५५० रुपये प्रति महिना द्यावे लागतील.

JioPhone Nextचा कॅमेरा

जिओफोन नेक्स्टमध्ये १३ एमपी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी ८एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचा रियर कॅमेरा सेल्फी कॅमेरा, नाइट मोड, पोट्रेट मोड आणि एचडीआर मोडसोबत हा कॅमेरा येणार आहे. यामध्ये भारतीयांसाठी विशेष लेन्स फिल्टर सारखे फिल्टर्स देण्यात आले आहेत.

JioPhone Next ची बॅटरी

जिओफोन नेक्स्ट स्मार्टफोनमध्ये ३५०० एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की जिओफोन नेक्स्ट स्मार्टफोनला एकदा चार्ज केल्यानंतर ३६ तासांपर्यत वापरता येऊ शकते. जिओफोन नेक्स्ट मध्ये हॉटस्पॉट कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. जिओफोन नेक्स्ट स्मार्टफोन युजर्स आपल्या आवडीच्या भाषेत कोणत्याही स्क्रीनचे भाषांतर करू शकतात. या स्मार्टफोनमध्ये गुगल प्ले स्टोअरद्वारे कोणत्याही अॅपला डाउनलोड करू शकतात. या स्मार्टफोनमध्ये अनेक जिओ आणि गुगल अॅप्स प्रीलोडेड स्वरुपात येतात. या फोनमध्ये इंटरनेटशी संबंधित सुरक्षा अपडेट देखील येतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी