New Mobile Launch 2022: मोठी बॅटरी आणि ड्युअल कॅमेरा सेटअपसह हा नवीन फोन लॉन्च, त्याची किंमत ६,५९९ रूपये

फोना-फोनी
Updated Mar 05, 2022 | 13:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

New Mobile Launch In India | Lava X2 शुक्रवारी भारतात लॉन्च करण्यात आला आहे, या कंपनीचा X-Series चा स्मार्टफोन ऑनलाइन एक्सक्लुझिव्ह फोन आहे. Lava कंपनीने सांगितले की, या सीरीजमधील हा पहिला फोन आहे आणि तो खास बजेट खरेदीदारांसाठी तयार करण्यात आला आहे.

 Lava X2 launches new phone with big battery and dual camera setup, priced at Rs 6,599
मोठी बॅटरी आणि ड्युअल कॅमेरा सेटअपसह हा नवीन फोन लॉन्च  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • Lava X2 शुक्रवारी भारतात लॉन्च करण्यात आला आहे.
  • या कंपनीचा X-Series चा स्मार्टफोन ऑनलाइन एक्सक्लुझिव्ह फोन आहे.
  • या सीरीजमधील हा पहिला फोन आहे आणि तो खास बजेट खरेदीदारांसाठी तयार करण्यात आला आहे.

New Mobile Launch In India | नवी दिल्ली : Lava X2 शुक्रवारी भारतात लॉन्च करण्यात आला आहे, या कंपनीचा X-Series चा स्मार्टफोन ऑनलाइन एक्सक्लुझिव्ह फोन आहे. Lava कंपनीने सांगितले की, या सीरीजमधील हा पहिला फोन आहे आणि तो खास बजेट खरेदीदारांसाठी तयार करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा HD+IPS डिस्प्ले आणि ५,०००mAH ची देण्यात आली आहे. (Lava X2 launches new phone with big battery and dual camera setup, priced at Rs 6,599). 

अधिक वाचा : CISCE ने वेळापत्रकात केला बदल

Lava X2 ची किंमत ६,९९९ रूपये ठेवण्यात आली आहे. तसेच ६,५९९ रूपयांच्या सवलतीच्या किंमतीवर ११ मार्चपर्यंत Amazon वरून प्री-बुकिंग करता येईल. Amazon च्या यादीनुसार ग्राहकांना हा फोन ब्लू आणि निळळसर रंगाच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येणार आहे. ग्राहकांना हा नवा फोन लावा ई-स्टोअरवरूनही खरेदी करता येणार आहे. 

Lava X2 चे स्पेसिफिकेशन्स

ड्युअल-सिम सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन स्टॉक अँड्रॉइड ११ गो एडिशनवर चालतो आणि यात ६.५ इंचाचा HD+IPS डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजसह जोडलेल्या ऑक्टा-कोर Media Tek Helio प्रोसेसद्वारे समर्थित आहे.

अधिक वाचा : विराट ४५ धावांवर बाद, आता रोहितची रिॲक्शन होतेय व्हायरल

फोटोग्राफीसाठी याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा 8 MP आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर ५ एमपी कॅमेरा आहे. येथे मागील बाजूस फिंगरफिट सेन्सर देण्यात आला आहे. 

Lava X2 ची बॅटरी ५,०००mAh आहे आणि येथे फेस अनलॉक देखील समर्थित आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत यात वाय-फाय, ब्लूथ v5.0,3.5 मिमी ऑडिओ जॅक, यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि ओटीजी सपोर्ट आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी