मोटोचा जबरदस्त फिचर्स असलेला 5G मोबाइल , किंमत फक्त...

Motorola ने भारतात 18 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतील स्मार्टफोन लॉन्च केला आहे. यामध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. जाणून घ्या त्याबद्दल.

looking for a new smartphone under 18 thousand 5G handset of moto
मोटोचा जबरदस्त फिचर्स असलेला 5G मोबाइल , किंमत फक्त... (Photo Credit- Moto) 
थोडं पण कामाचं
  • या मोबाइलची बॅटरी 5000mAh क्षमतेची आहे
  • या फोनमध्ये 50MP रिअर कॅमेरा
  • 5G सपोर्ट असलेला फोन

Motorola: मुंबई: Moto G62 भारतात लॉन्च झाला आहे. कंपनीच्या जी सीरीजचे हे नवीन मॉडेल आहे. यात 120Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाचा डिस्प्ले आहे. याशिवाय, यात स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर, 50MP रिअर कॅमेरा आणि 5,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन डस्ट आणि  वॉटर रेसिस्टेन्स IP52 रेटेड  आहे. (looking for a new smartphone under 18 thousand 5G handset of moto)

किंमत

Moto G62 ची 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आणि 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. हे फ्रॉस्टेड ब्लू आणि मिडनाईट ग्रे कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. 19 ऑगस्टपासून ग्राहक हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि आघाडीच्या ऑफलाइन आउटलेटवरून खरेदी करू शकतील. ग्राहकांना फोनवर HDFC बँक कार्ड ऑफर आणि Jio आणि Myntra देखील ऑफर मिळतील.

अधिक वाचा: Smartphone offers : स्मार्टफोनवर मिळतेय जबरदस्त सूट, पाहा टॉप 5 ब्लॉकबस्टर ऑफर्स

Moto G62 चे स्पेसिफिकेशन्स 

ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्ट असलेला स्मार्टफोन नियर-स्टॉक Android 12 वर चालतो आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंच फुल-एचडी+ (1,080x2,400 पिक्सेल) LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅमसह Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी यामध्ये 50MP प्रायमरी रिअर कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा त्याच्या मागील बाजूस देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी, समोर 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची इनबिल्ट मेमरी 128GB आहे आणि ती कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येते. सुरक्षेसाठी येथे फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

अधिक वाचा: Alto booking : बहुप्रतिक्षित नवीन मारुति अल्टोचे बुकिंग सुरु, कशी करायची बुकिंग, मोजावे लागतील इतके पैसे

Moto G62 ची बॅटरी 5,000mAh आहे आणि 20W फास्ट चार्जिंग सपोर्टही आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर आणि ड्युअल मायक्रोफोन देखील देण्यात आले आहेत. यात ThinkShield मोबाइल सुरक्षा देखील आहे. हा फोन डस्ट आणि वॉटर रेसिस्टेन्ससाठी IP52 रेटेड केलेला आहे. या फोनचे फीचर्स लक्षात घेता ग्राहक हा फोन खरेदी करण्याचा विचार करु शकतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी