Mobile Safety Alert | फोन जुना झाल्यावर विकणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा, हॅकर्स चोरतील तुमचा डेटा

Mobile Safety Alert | हॅकर्स तुमच्या फोनमधून तुमचे फोटो, त्यातील व्हिडिओ, सोशल मीडियासंदर्भातील माहिती आणि इतर वैयक्तिक माहिती चोरतात. यानंतर ते या माहितीचा गैरवापर करून तुम्हाला ब्लॅकमेल करू शकतात किंवा आर्थिक फसवणूक करू शकतात किंवा तुमच्या खात्यातून पैसे चोरू शकतात. सायबर तज्ज्ञांनुसार फोन खराब झाल्यानंतरदेखील त्यातील डेटा फोनमधील ड्राइव्हमध्ये सुरक्षित असतो. जेव्हा मोबाइल दुरुस्त होऊन सुरू होतो तेव्हा त्या मोबाइलमधील तो सर्व डेटा हॅकर्सच्या हाती लागतो.

Mobile Safety
जुन्या स्मार्टफोनची सुरक्षित हाताळणी 
थोडं पण कामाचं
  • जुन्या स्मार्टफोनला लोक बेजबाबदारपणे हाताळतात
  • हॅकर्स तुमच्या जुन्या फोनमधील माहिती चोरून गैरवापर करू शकतात
  • जुना फोन किंवा खराब झालेला फोन कसा हाताळायचा

Mobile Safety Alert | नवी दिल्ली : मोबाइल फोन जुना किंवा खराब झाल्यावर (Old Smartphone) अनेकवेळा लोक त्याला घरातच पडू देतात. त्यानंतर थोड्या दिवसांनी त्या आपण एकतर गल्लीतील किंवा जवळच्या एका दुकानात विकतो, किंवा भंगारात त्याची रवानगी करतो. मात्र आपल्या स्मार्टफोनला असे हाताळणे तुम्हाला महागात पडू शकते. कारण असे फोन नंतर मोबाइल मार्केटमध्ये जातात आणि नंतर हॅकर्स (Hackers)तुमच्या फोनमधील माहिती (Data in smartphone)काढून त्याचा गैरवापर करू शकतात. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या जुन्या स्मार्टफोनला कसे हाताळावे ते पाहूया. (Mobile Safety Alert | Selling your old smartphone could be dangerous, hackers may steal your data)

कोणती माहिती चोरतात हॅकर्स

हॅकर्स तुमच्या फोनमधून तुमचे फोटो, त्यातील व्हिडिओ, सोशल मीडियासंदर्भातील माहिती आणि इतर वैयक्तिक माहिती चोरतात. यानंतर ते या माहितीचा गैरवापर करून तुम्हाला ब्लॅकमेल करू शकतात किंवा आर्थिक फसवणूक करू शकतात किंवा तुमच्या खात्यातून पैसे चोरू शकतात.

असा होतो सगळा प्रकार

सायबर तज्ज्ञांनुसार फोन खराब झाल्यानंतरदेखील त्यातील डेटा फोनमधील ड्राइव्हमध्ये सुरक्षित असतो. जेव्हा मोबाइल दुरुस्त होऊन सुरू होतो तेव्हा त्या मोबाइलमधील तो सर्व डेटा हॅकर्सच्या हाती लागतो. तज्ज्ञांनुसार जुने फोन हाताळताना म्हणजे त्यांची विल्हेवाट लावताना काळजी घेतली पाहिजे. थोड्याशा निष्काळजीपणामुळे मोठे नुकसान होऊ शकते. अलीकडच्या काळात स्मार्टफोनमधून माहिती चोरून होणाऱ्या सायबर गुन्ह्यांमध्ये किंवा फसवणुकीच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे. या प्रकारांपासून सुरक्षित कसे राहायचे ते पाहूया.

जुन्या फोन असे हाताळा -

  1. जर मोबाइल फोन जुना झाला आणि तुम्हाला त्याला बदलायचे आहे तर नवा फोन सुरू केल्याबरोबर जुन्या फोनमधील डेटा आवर्जून डीलीट करा. यासाठी तुम्ही फॅक्टरी रिसेटचा पर्याय निवडा. यामुळे त्या फोनमध्ये कोणतीही माहिती राहणार नाही.
  2. जर फोन खराब झाला आहे आणि तुम्ही त्यातील डेटा डिलीट करू शकत नसाल तर तो फोन विकू नका. त्याला घरातच सांभाळून ठेवा. जर तो फोन दुरुस्त होऊ शकत असेल तर त्याला दुरुस्त करा, त्यातील डेटा डिलीट करा आणि मगच विका.
  3. हल्ली अशा अनेक कंपन्या आहेत ज्या ई-वेस्ट विकत घेतात. तुम्ही जुना फोन इकडेतिकडे विकण्यापेक्षा अशा कंपन्यांना देणे उत्तम. या कंपन्या ई-वेस्ट नष्ट करतात. यामुळे तुम्ही माहिती चुकीच्या  लोकांच्या हाती पडणार नाही. मात्र अशी कंपनी निवडताना खातरजमा करून घ्या.
  4. मुलांच्या हाती जुना फोन देऊ नका. कारण मुले खेळता खेळता फोन फेकतात. यामुळे फोन जर हरवला तर चुकीच्या हाती पडू शकतो.
  5. फोन विकताना त्यामधील जीमेल, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतर विविध अकाउंटमधून लॉगऑउट करा आणि मगच त्याला विका.
     
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी