मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, 12000 हून कमी किमतीची चीनी मोबाइल होणार बंद?

Mobile Phones: भारतीय मोबाइल मार्केटमध्ये चीनमधील कंपन्यांचं वर्चस्व आहे. मात्र आता याच चीनी मोबाइलवर भारतात बंदी येण्याची शक्यता आहे. 

modi Government preparing to take big decision chinese mobile under rs 12000 may be banned read in marathi
मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, 12000 हून कमी किमतीची चीनी मोबाइल होणार बंद? (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत 
  • चीनी मोबाइलवर भारतात बंदीची शक्यता

Chinese mobile may banned in India: मोबाइल कंपन्यांसाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. भारतातील ग्राहकांची संख्या आणि मोबाइलची मागणी लक्षात घेता सर्वच परदेशी मोबाइल कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केलं आहे. भारतीय बाजारात मायक्रोमॅक्स, लावा, कार्बन आणि इतर देशांतर्गत ब्रँड्सला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार आता एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. (modi Government preparing to take big decision chinese mobile under rs 12000 may be banned read in marathi)

चीनमध्ये तयार करण्यात येणाऱ्या स्मार्टफोन्स (12000 रुपयांहून कमी किमतीचे) विक्रीवर भारतात बंदी घालण्याची योजना केंद्र सरकार आखत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ब्लूमबर्गने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, चायनीज स्मार्टफोन्स निर्माता कंपन्यांचे 12000 हून कमी किमतीच्या फोन्सच्या विक्रीवर भारत बंदी घालण्याची शक्यता आहे. 

शाओमी आणि रियलमी सारख्या कंपन्यांना झटका

या रिपोर्टनुसार, भारत सरकारने हा निर्णय गेतला तर चीनमधील स्मार्टफोन निर्मात्यांना जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोबाइल मार्केटमधून आपला पाय काढावा लागेल. काऊंटरपॉईंट रिसर्चनुसार, सरकारने हा निर्णय घेतला तर शाओमी आणि रियलमी सारख्या कंपन्यांना याचा मोठा फटका बसू शकतो ज्यांनी भारतातील 12000 आणि त्याहून कमी किमतीच्या सेगमेंटमध्ये जवळपास 50 टक्के मार्केट शेअर मिळवला आहे.

अधिक वाचा : स्वप्नातील ऑफर! वनप्लसच्या स्मार्टफोन मिळतोय फक्त 4999 रुपयांत, 10 ऑगस्टपर्यंत ऑफर

संशोधन संचालक तरुण पाठक यांनी IANS ला सांगितले की, 2018 च्या तिमाहीत 49 टक्क्यांच्या तुलनेत या वर्षी जूनच्या तिमाहीत भारतातील एकूण स्मार्टफोन व्हॉल्यूममध्ये 150 डॉलर पेक्षा कमी स्मार्टफोन्सचे योगदान 31 टक्के इतके आहे. गेल्या काही तिमाहींमध्ये Jio PhoneNext च्या विक्रीत वाढ झाल्यामुळे 75-80 टक्के व्हॉल्यूमवर चीनी ब्रँड्सचे वर्चस्व आहे.

अधिक वाचा : Smartphone offers : स्मार्टफोनवर मिळतेय जबरदस्त सूट, पाहा टॉप 5 ब्लॉकबस्टर ऑफर्स

ट्रान्शन ग्रुप ब्रँड्स (itel, infinix आणि Tecno) ने Q2 मध्ये भारताच्या हँडसेट मार्केटमध्ये 12 टक्के वाटा मिळवला आहे. काऊंटरपाईंट रिसर्चच्या मते, itel 77 टक्के शेअरसह 6000 रुपयांच्या खालील स्मार्टफोन सेगमेंटमध्ये आघाडीवर असताना Tecno ने देशात 8000 रुपयांपेक्षा कमी स्मार्टफोन सेगमेंटमध्ये दुसरं स्थान मिळवलं आहे.

चीनमधील कंपन्यांची चौकशी 

भारताने यापूर्वीच चीनमधील उत्पादकांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. ओप्पो, विवो आणि शाओमी सारख्या चीनी स्मार्टफोन्स कंपन्यांच्या संबंधित ठिकाणांवर अलीकडे छापे सुद्धा टाकण्यात आल्याची माहिती समोर आली होती. ओप्पो, विवो इंडिया आणि शाओमी या तीन चीनी मोबाइल कंपन्यांकडून भारत सरकार कथित कर चुकवेगिरीच्या प्रकरणांची चौकशी आणि तपास करत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी