Moto X30 Pro चीनमध्ये 12 ऑगस्ट रोजी लॉन्च होईल. या फोनची खास गोष्ट म्हणजे यामध्ये तब्बल 200 मेगापिक्सलचा (Megapixels) प्राइमरी कॅमेरा (Camera) मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार, Motorola चा हा फ्लॅगशिप फोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह येईल. याशिवाय, याला 125W GaN फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात येणार आहे. हा फोन अलीकडेच मॉडेल XT2241-1 सह Geekbench वर स्पॉट झाला होता.
Motorola ने Weibo वर एक पोस्ट शेअर करून पुष्टी केली आहे की Moto X30 Pro 200MP मेन कॅमेरासह बाजारात आणला जाईल. हा जगातील पहिला स्मार्टफोन असेल, ज्यामध्ये एवढा प्रचंड मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध असणार आहे. या फोनसाठी अशी देखील पुष्टी केली गेली आहे की, हा फोन 125W GaN फास्ट चार्जिंग सपोर्टसह देखील देईल. हा स्मार्टफोन १२ ऑगस्टला चीनमध्ये लॉन्च होणार आहे.
अधिक वाचा: Mobile Inventor : मोबाईलचा शोध लावणारा स्वतःच फोनपासून दूर, लोकांना दिला हा सल्ला
चीनी कंपनीने नुकतेच Moto X30 Pro च्या सेन्सर्सच्या फोकल लेंथची पुष्टी केली आहे. या अपकमिंग फोनमधील सेन्सर्सची फोकल लेंथ ही 35mm, 50mm आणि 85mm असेल. मिळालेल्या माहितीनुसार, 85mm लेन्स चांगले क्लोज-अप पोर्ट्रेट शॉट्स घेतील. त्याच वेळी 50 मिमी लेन्स स्टँडर्ड व्ह्यूईंग अँगलसाठी अधिक चांगले काम करेल.
Moto X30 Pro नुकताच गीकबेंचवर स्पॉट झाला होता. तिथे मॉडेल XT2241-1 सह तो स्पॉट झाला होता. लिस्टमधून असे समोर आले आहे की, हा फोन अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असेल आणि यात 12GB रॅम मिळेल.
अधिक वाचा: MOTO G22 : लॉन्चिंगच्या आधीच स्पेसिफिकेशन्स झाले लिक, फिचर पाहून युजर्स खूश
Moto X30 Pro चे स्पेसिफिकेशन्स
मिळालेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये तब्बल 5,000mAh क्षमतेची बॅटरी असेल. तसेच, यात 144Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा OLED डिस्प्ले असणार आहे. याशिवाय, हा स्मार्टफोन 8GB+128GB आणि 12GB+256GB च्या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करुन दिला जाऊ शकतो.
Motorola X30 Pro 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंत UFS 3.1 अंतर्गत स्टोरेजसह येईल. फोनमध्ये सापडलेली बॅटरी 4500mAh असू शकते, जी 125W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. जोपर्यंत OS चा संबंध आहे, फोन Android 12 वर आधारित MyUI 4.0 वर काम करेल. बायोमेट्रिक सुरक्षेसाठी, अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळणे अपेक्षित आहे. तुमच्या माहितीसाठी कंपनी हा फोन सर्वात आधी चीनमध्ये लॉन्च करणार आहे.