Best Prepaid Plan : फक्त 49 रुपयांच्या रिचार्जमध्ये चालणार 180 दिवस, एअरटेल, जिओ, व्होडाफोन, बीएसएनल सर्वांवर भारी

Prepaid Plan : भारतातील दूरसंचार कंपन्यांमधील स्पर्धा तीव्र होत चालली आहे. त्यामुळे कंपन्या एकामागोमाग एक नवे प्लॅन बाजारात आणत असतात. दुसऱ्या बाजूला मोबाइल रिचार्जचा खर्च वाढत चालला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दूरसंचार कंपन्या वेगवेगळे प्लॅन आणत असतात. आता एमटीएनएलने (MTNL)ग्राहकांसाठी भन्नाट प्लॅन आणला आहे. हा प्लॅन एअरटेल, जिओ, व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएलसारख्या कंपन्यांच्या प्लॅनला टक्कर देतो आहे. एमएटीएनएलच्या ज्या स्वस्त प्लॅनबद्दल आपण बोलत आहोत तो फक्त 49 रुपयांचा आहे.

Prepaid Plan
प्रीपेड प्लॅन 
थोडं पण कामाचं
  • MTNL चा स्वस्त आणि मस्त प्लॅन
  • 49 रुपयांमध्ये मोठ्या व्हॅलिडिटीचा प्लॅन
  • रिचार्ज करून 180 दिवस फायदे मिळवा

MTNL Prepaid Plan : नवी दिल्ली : भारतातील दूरसंचार कंपन्यांमधील स्पर्धा तीव्र होत चालली आहे. त्यामुळे कंपन्या एकामागोमाग एक नवे प्लॅन बाजारात आणत असतात. दुसऱ्या बाजूला मोबाइल रिचार्जचा खर्च वाढत चालला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दूरसंचार कंपन्या वेगवेगळे प्लॅन आणत असतात. आता एमटीएनएलने (MTNL)ग्राहकांसाठी भन्नाट प्लॅन आणला आहे. हा प्लॅन एअरटेल, जिओ, व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएलसारख्या कंपन्यांच्या प्लॅनला टक्कर देतो आहे. एमएटीएनएलच्या ज्या स्वस्त प्लॅनबद्दल आपण बोलत आहोत तो फक्त 49 रुपयांचा आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 180 दिवसांची आहे. इतर कंपन्यांकडे सध्या असा अतिशय स्वस्त आणि जास्त व्हॅलिडिटी असलेला प्लॅन दिसत नाही. मात्र असे होऊ शकते की लवकरच Airtel, Jio, Vi आणि BSNL देखील असे प्लॅन बाजारात आणतील.  MTNL च्या या भन्नाट 49 रुपयांच्या प्लॅनचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया. (MTNL is offering prepaid plan of Rs 49 with validity of 180 days)

अधिक वाचा : Changes from September 2022 : 1 सप्टेंबरपासून होणार हे बदल, तुमच्यावर होणार थेट परिणाम...जाणून घ्या

एमटीएनएलचा 49 रुपयांचा प्लॅन: 

या प्लॅनमध्ये ग्राहकांना 180 दिवसांची वैधता म्हणजे व्हॅलिडिटी दिली जाते आहे. या प्लॅनमधील फायद्यांबद्दल सांगायचे तर, लोकल कॉल करण्यासाठी 60 मिनिटे दिली जात आहेत. त्याच वेळी, एसटीडी कॉलिंगसाठी 20 मिनिटे दिली जात आहेत. आता कॉल चार्जेसबद्दल जाणून घेऊया. यात तुम्हाला प्रति सेकंद 1 पैसे आणि 1 पैसे प्रति सेकंद या दराने कॉल शुल्क भरावे लागेल. दुसरीकडे, जर आपण एसएमएसबद्दल बोललो, तर स्थानिक एसएमएससाठी 0.50 पैसे, राष्ट्रीयसाठी 1.50 रुपये आणि आंतरराष्ट्रीयसाठी 5 रुपये आकारावे लागतील. याशिवाय 3 पैसे प्रति एमबी दराने शुल्क भरावे लागणार आहे.

अधिक वाचा : Hemant Soren आमदारांना घेऊन पोहोचले लातरातुला, धरणावर बांधलेल्या रिसॉर्टमध्ये शिफ्ट

Airtel, Jio, Vi आणि BSNL पडले मागे

Airtel-Vi च्या प्लानबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्याकडे 49 रुपयांचा कोणताही प्लान नाही. पण दोन्ही कंपन्या 58 रुपयांचा प्लान देतात. या प्लानमध्ये ३ जीबी डेटा दिला जात आहे. त्याची वैधता ग्राहकांच्या विद्यमान योजनेप्रमाणेच आहे. हे डेटा व्हाउचर आहे. Jio असा 49 रुपयांचा कोणताही प्लॅन देत नाही. कंपनी या किंमतीच्या जवळपास 62 रुपयांचा प्लान देते आहे. ज्यामध्ये यूजर्सना 28 दिवसांसाठी 6 GB डेटा दिला जात आहे. हा प्लॅन Jio फोन ग्राहकांसाठी आहे. त्याच वेळी, सामान्य ग्राहकांसाठी 61 रुपयांचा प्लॅन आहे, ज्यामध्ये 6 जीबी डेटा दिला जातो आहे. त्याची वैधता सध्याच्या योजनेप्रमाणेच आहे.

अधिक वाचा : Ganesh Chaturthi 2022 Ekdant Katha: गणपती बाप्पाला का म्हणतात एकदंत, जाणून घ्या या मागील कथा

भारत सरकारने टेलिकॉम कंपन्यांना भारतात 5G सेवा देण्यास परवानगी दिलेली आहे. तुम्हाला 5Gची सेवा हवी असेल तर तुमच्याकडे 5G मोबाईल असणे गरजेचे आहे. भारतात सर्वप्रथम जियो आणि एअरटेल 5Gची सेवा देणार आहेत.

एअरटेल आणि जियो कंपनीने 2024 पर्यंत संपूर्ण देशात 5G सेवा देण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. यादरम्यान वोडाफोन आयडियाने दिल्लीत 5G सेवा सुरू करणार आहे. 5G स्पेक्ट्रम लिलावाची प्रक्रियादेखील पूर्ण झाली असून दूरसंचार कंपन्यादेखील तयारीत आहेत. त्यामुळे देशात 5G मोबाइल सेवा सुरू होण्याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav)यांनी मोठी माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात देशात 5G मोबाइल सेवा सुरू होईल. खरंतर अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे की 12 ऑक्टोबर 2022 पर्यंत देशात 5G मोबाइल सेवा सुरू केली जाईल. त्यानंतर ही सेवा देशातील सर्व लहान आणि मोठ्या शहरांमध्ये विस्तारित केली जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी