Best Prepaid Plan | स्वस्त प्लॅनच्या शोधात आहात? मग हा आहे लयभारी प्लॅन...फक्त 141 रुपयांचा, तेही वर्षभरासाठी आणि दणकून डेटासुद्धा...

MTNL Plan : नवी दिल्ली : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या विविध प्रीपेड प्लॅन (Prepaid Plan) बाजारात आणत असतात. जास्तीत जास्त ग्राहकांना ओढता यावे यासाठी स्वस्त प्लॅन देण्याचा प्रयत्न केला जातो. सध्या देशात असलेल्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये जोरदार चुरस आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी शुल्कात जास्त सुविधा देण्याचा दबाव त्यांच्यावर आहे. ग्राहकांना हव्या असलेल्या सुविधा कमी दरात देण्याचा प्रयत्न कंपन्यांना करावा लागतो. एमटीएनएलचा प्रीपेड प्लॅन हा ग्राहकांना स्वस्तात दमदार सुविधा देतो आहे.

Cheapest Prepaid Plan
एमटीएनएलचा स्वस्त भन्नाट प्रीपेड प्लॅन 
थोडं पण कामाचं
  • एमटीएनलचा स्वस्त आणि मस्त प्लॅन
  • तुमच्या गरजा भागवणारा बाजारातील सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान
  • छोट्या शुल्कात मिळतात मोठे फायदे

MTNL best prepaid plan : नवी दिल्ली : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या विविध प्रीपेड प्लॅन (Prepaid Plan) बाजारात आणत असतात. जास्तीत जास्त ग्राहकांना ओढता यावे यासाठी स्वस्त प्लॅन देण्याचा प्रयत्न केला जातो. सध्या देशात असलेल्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये जोरदार चुरस आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी शुल्कात जास्त सुविधा देण्याचा दबाव त्यांच्यावर आहे. ग्राहकांना हव्या असलेल्या सुविधा कमी दरात देण्याचा प्रयत्न कंपन्यांना करावा लागतो. एमटीएनएलचा प्रीपेड प्लॅन (MTNL Prepaid Plan) हा ग्राहकांना स्वस्तात दमदार सुविधा देतो आहे. या प्लॅनची वैशिष्ट्ये जाणून घेऊया. (MTNL prepaid plan in just Rs 141 with whole year validity, check details)

अधिक वाचा : Data TSunami | 'सुनामी'गत डेटा हवांय का भाऊ? दररोज 2GB डेटा फक्त 4 रुपयात तेही 365 दिवसांसाठी...पाहा तुफान प्लॅन

कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा

कंपन्यांनी बाजारात विविध प्लॅन आणले आहेत. मात्र ग्राहक नेहमी स्वस्त प्लॅनच्या शोधात असतात. काही प्रीपेड प्लॅनमध्ये व्हलिडिटी चांगली असते तर काहीमध्ये डेटा जास्त असतो. तर काहींमध्ये इतर सुविधा असतात. ग्राहक आपल्या गरजेनुरुप प्लॅनची निवड करतात. एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि जिओमध्ये जोरदार स्पर्धा असताना बीएसनएनएल आणि एमटीएनएलसारख्या कंपन्यांदेखील अधूनमधून भन्नाट प्लॅन बाजारात आणत असतात.  

एमटीएनएल देखील ग्राहकांसाठी काही जबरदस्त प्लॅन बाजारात आणत असते. Jio, Airtel, Vi, BSNL यांच्या प्लॅन्सची तर जोरदार चर्चा होत असते. मात्र आज आपण MTNL च्या सुपर प्लॅनविषयी पाहणार आहोत. एमटीएनएलचा एक प्लॅन एक वर्षाच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लॅनमधील मोठे फायदे आहेत. चला तर मग पाहूया एमटीएनएलच्या या प्रीपेड प्लॅनचे शुल्क आणि त्यात मिळणारे भन्नाट फायदे. 

Daily Routine Apps | असे 5 अॅप्स जे तुमच्या दिनचर्येचे करू शकतात व्यवस्थापन

एमएटीएनएलच्या प्रीपेड प्लॅनची खासियत

या प्लॅनबद्दल बोलायचे तर, त्याची व्हॅलिडिटी एक वर्षासाठी आहे. मात्र त्याचे शुल्क फक्त फक्त 141 रुपये आहे. हा प्लॅन ग्राहकांना डेटा आणि कॉलिंगची सुविधादेखील देतो. हल्ली दूरसंचार कंपन्या अधिक ग्राहक जोडण्यासाठी प्रयत्नशील असतात. या स्पर्धेत एरवी Jio, Airtel, Vi, BSNL असले तरी यात एमटीएनएलदेखील असते. ग्राहकांना खुणावणारा हा एमएटीएनएलचा प्लॅन आहे तरी कसा.

अधिक वाचा : WhatsApp यूजर्संना पैसे कमविण्याची संधी, Google Pay, Paytm आणि PhonePe ला देणार टक्कर

स्वस्त आणि मस्त 141 रुपयांचा प्लॅन

एमटीएनएल या प्रीपेड प्लॅनमध्ये ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी देते आहे तेही फक्त 141 रुपयांमध्ये. या प्लॅनमध्ये पहिल्या 90 दिवसांसाठी ग्राहकांना रोज 1 GB डेटा मिळणार आहे. शिवाय एमटीएनएल नेटवर्कवर कॉलिंगसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाईल. ग्राहकांना इतर नेटवर्कवर कॉल करायचा असेल तर 200 मिनिटे मोफत दिली जातील. यानंतर तुम्हाला 25 पैसे प्रति मिनिट शुल्क भरावे लागेल. हे शुल्क 90 दिवसांसाठी असून त्यानंतर ग्राहकांना प्रत्येक सेकंदाला 0.02 पैसे शुल्क द्यावे लागेल.तुम्हाला जास्त व्हॅलिडिटी प्लॅन आणि कमी शुल्कातील प्लॅन हवा असल्यास हा प्लॅन तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी