डाऊनलोडिंगच्या वेगात सर्वात वरच्या स्थानावर आहे मुकेश अंबानींची जिओ

फोना-फोनी
Updated Jul 10, 2021 | 11:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

डाऊनलोडिंगच्या स्पीडबाबत सध्या जिओचाच बोलबाला आहे आणि टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या नुकत्याच समोर आलेल्या अहवालानुसार जिओची सरासरी डाऊनलोडिंगची स्पीड 21.9 Mbps इतकी आहे.

Reliance Jio
डाऊनलोडिंगच्या वेगात सर्वात वरच्या स्थानावर आहे मुकेश अंबानींची जिओ 

थोडं पण कामाचं

  • जिओचे भारतात आहेत सर्वात अधिक सबस्क्राईबर्स
  • डाऊनलोडिंग स्पीडमध्ये एअरटेलची वाईट स्थिती
  • वोडाफोन-आयडिया अपलोडिंग स्पीडमध्ये सर्वोच्च

नवी दिल्ली: भारतातली (India) सर्वाधिक लोकप्रिय (most popular) टेलिकॉम कंपनी (telecom company) असलेल्या जिओने (Jio) डाऊनलोडिंगच्या स्पीडमध्ये (downloading speed) पुन्हा एकदा आपले सर्वोच्च स्थान (top place) कायम राखले आहे आणि टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (Telecom Regulatory Authority of India) म्हणजेच ट्रायने (TRAI) त्याला सर्वात जास्त डाऊनलोडिंग स्पीड देणारे टेलिकॉम नेटवर्क (telecom network) म्हटले आहे. तर व्होडाफोन-आयडियाने (Vodafone-Idea) अपलोडिंग स्पीडमध्ये (uploading speed) बाजी मारली आहे.

ट्रायच्या अहवालात समोर आली ही आकडेवारी

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या नुकत्याच समोर आलेल्या अहवालानुसार जिओची सरासरी डाऊनलोडिंगची स्पीड 21.9 Mbps इतकी आहे. तर व्होडाफोन-आयडियाची डाऊनलोडिंग स्पीड 6.5 Mbps आहे. एअरटेलची परिस्थिती आणखीच वाईट आहे आणि एअरटेल यूजर्सना फक्त 5 Mbpsची डाऊनलोडिंग स्पीट मिळत आहे जी जिओ आणि एअरटेलच्या तुलनेत बची कमी आहे.

अपलोडिंगमध्ये सर्वात वर आहे व्होडाफोन-एअरटेल

जर अपलोडिंगच्या वेगाबद्दल बोलायचे झाले तर याबाबत व्होडाफोन-आयडियाची परिस्थिती सर्वात चांगली आहे आणि या कंपनीच्या यूजर्सना 6.2 Mbpsची स्पीड मिळत आहे. अपलोडिंगच्या बाबतीत एअरटेलची स्थिती जिओपेक्षा चांगली आहे आणि या क्रमवारीत ते दुसऱ्या स्थानावर आहेत. तर अपलोडिंगच्या वेगाबाबत जिओ तिसऱ्या जागेवर आहे.

जाणून घ्या भारतातल्या टेलिकॉम कंपन्यांची स्थिती

भारतात रिलायन्स जिओचे सर्वाधिक सबस्क्राईबर्स आहेत आणि दर महिन्याला लाखो लोक मुकेश अंबानींच्या या टेलिकॉम कंपनीशी जोडले जात आहेत. तर एअरटेल सबस्क्राईबर्सच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. व्होडाफोन-आयडियाची परिस्थितीही हळूहळू सुधारत आहे आणि हे भारतातले तिसऱ्या क्रमांकावरचे सर्वात मोठे नेटवर्क आहे. सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलची परिस्थिती खासगी कंपन्यांशी तुलना करता फारच वाईट आहे. या सर्व कंपन्या आपल्या कोट्यावधी यूजर्ससाठी एकापेक्षा एक प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स बाजारात आणत आहेत ज्यात अमर्यादित डेटा आणि कॉलिंगची सोय आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी