Nokia 4.2 स्मार्टफोन लॉन्च, किंमत केवळ...

फोना-फोनी
Updated May 07, 2019 | 21:18 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Nokia 4.2 Smartphone Launch: नोकिया कंपनीने आपला नवा स्मार्टफोन नोकिया 4.2 भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 11 हजार रुपयांपेक्षाही कमी आहे. जाणून घ्या या स्मार्टफोनची किंमत आणि फिचर्स...

Nokia 4.2 smartphone launched
Nokia 4.2 स्मार्टफोन लॉन्च  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: नोकिया कंपनीने आपला नवा स्मार्टफोन नोकिया 4.2 मंगळवारी भारतीय बाजारात लॉन्च केला. नोकियाचा हा स्मार्टफोन अँड्राईड वन प्लॅटफॉर्मवर चालतो. नोकिया 4.2 स्मार्टफोन यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये लॉन्च करण्यात आला होता. त्यानंतर आता हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. नोकियाच्या या स्मार्टफोनमध्ये दोन नवे बदल पहायला मिळत आहेत जे सामान्यत: नोकियाच्या फोनमध्ये पहायला मिळत नाहीत. नोकियाने या फोनमध्ये एक गुगल असिस्टंट बटन आणि एक नोटिफिकेशन लाइट पॉवर बटन दिलं आहे.

नोकिया 4.2 चे फिचर्स...

नोकियाचा हा स्मार्टफोन वॉटर ड्रॉप स्टाइल नॉच डिस्प्लेसह उपलब्ध आहे. फोनच्या रियर साइडला फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 9 पाय वर चालतो. फोनमध्ये 5.71 इंचाचा इचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे, तसेच ऑक्टाकोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनच्या पुढील बाजुला 8 MP चा f/2.0 अॅपर्चर असलेली लेंस दिली आहे. तर रियरला 13 MP चा प्रायमरी सेंसर आणि 2 MP चा सेकंडरी सेंसर दिला आहे. फोनमध्ये 3000 mAh ची बॅटरी देण्यात आळी आहे. यासोबतच फोनमध्ये 32 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे जो मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 400 Gb पर्यंत वाढवता येऊ शकतो.

Nokia 4.2 photos

नोकिया 4.2 स्मार्टफोनची किंमत

नोकिया 4.2 स्मार्टफोन भारतीय बाजारात 10,990 रुपयांत लॉन्च करण्यात आला आहे. ही किंमत स्मार्टफोनच्या 3 GB रॅम 32 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची आहे. कंपनीने भारतात 2 GB रॅम व्हेरिएंट लॉन्च केला नाहीये. हा फोन दोन रिंगांत उपलब्ध आहे.

Nokia 4.2 photos

फोनची लॉन्च ऑफर

हा स्मार्टफोन खरेदी करताना 500 रुपयांच्या इंस्टंट डिस्काऊंट मिळत आहे. यासाठी ग्राहकांना प्रोमो कोड- LAUNCHOFER- याचा उपयोग करावा लागणार आहे. ही ऑफर 10 जून 2019 पर्यंत सुरु राहणार आहे. यासोबतच स्मार्टफोन खरेदीवर वोडाफोन-आयडिया ग्राहकांना 2500 रुपयांचा इंस्टंट कॅशबॅक, 50 रुपयांचे 50 वाऊचरच्या स्वरुपात मिळणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Nokia 4.2 स्मार्टफोन लॉन्च, किंमत केवळ... Description: Nokia 4.2 Smartphone Launch: नोकिया कंपनीने आपला नवा स्मार्टफोन नोकिया 4.2 भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 11 हजार रुपयांपेक्षाही कमी आहे. जाणून घ्या या स्मार्टफोनची किंमत आणि फिचर्स...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola