नोकियाचा दमदार फिचर्स असलेला 'हा' स्मार्टफोन मिळतोय अगदी स्वस्त

फोना-फोनी
Updated Jul 06, 2019 | 20:01 IST | टाइम्स नाऊ हिंदी

नोकिया कंपनीने गेल्यावर्षी लॉन्च केलेल्या आपल्या नोकिया 6.1 (Nokia 6.1) स्मार्टफोनच्या किमतीत कपात केली आहे. हा स्मार्टफोन आता खूपच स्वस्त किमतीत उपलब्ध झाला आहे.

Nokia 6.1 smartphone price slashed
नोकियाचा 'हा' स्मार्टफोन मिळतोय अगदी स्वस्त 

थोडं पण कामाचं

  • नोकिया 6.1 स्मार्टफोनच्या किमतीत कपात
  • अवघ्या 6,999 रुपयांत खरेदी करा स्मार्टफोन
  • नवी किंमत अद्याप फ्लिपकार्ट, अॅमेझॉनवर नाही

मुंबई: तुम्ही नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात? मग तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. कारण, नोकिया कंपनीने आपल्या एका स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. नोकिया कंपनीने आपल्या Nokia 6.1 या स्मार्टफोनची किंमत भारतीय बाजारात कमी केली आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन आता 6,999 रुपयांत उपलब्ध आहे. किमतीत कपात केल्यानंतर नव्या किमतीसह हा स्मार्टफोन नोकिया इंडिया ऑनलाइन स्टोअरवर उपलब्ध आहे.

नोकिया 6.1 हा स्मार्टफोन कंपनीने गेल्यावर्षी (2018) एप्रिल महिन्यात लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. त्यामध्ये 3GB रॅम, 32GB स्टोरेज आणि 4GB रॅम, 64GB स्टोरेज या दोन व्हेरिएंटचा समावेश आहे. नोकिया कंपनीचा हा स्मार्टफोन अँड्रॉईड वन प्रोग्रामचा एक भाग आहे. हा स्मार्टफोन फुल एचडी डिस्प्लेसह बाजारात उपलब्ध आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमचं ऑक्टाकोअर प्रोसेसर देण्यात आला आहे.

नोकिया 6.1 या स्मार्टफोनची नवी किंमत अॅमेझॉन डॉट इन आणि फ्लिपकार्टवर सध्या रिफ्लेक्ट झालेली नाहीये. त्यामुळे ऑफलाइन रिटेलर्स सुद्धा हा स्मार्टफोन जुन्या किमतीत विक्री करत असतील. नोकिया कंपनीने आला Nokia 6.1 हा स्मार्टफोन गेल्यावर्षी 16,999 रुपयांच्या किमतीत लॉन्च केला होता. लॉन्च केल्यानंतर काही दिवसांनीच हा स्मार्टफोन नोकिया ऑनलाइन स्टोअरवर 8,999 रुपयांच्या सुरूवातील किमतीत उपलब्ध झाल्याचं पहायला मिळालं होतं.

Nokia 6.1 चे फिचर्स

नोकिया 6.1 स्मार्टफोन अँड्रॉईड 9 पाय वर काम करतो. या फोनमध्ये 5.5 इंचाचा फुल एचडी आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 630 प्रोसेसर आहे. यासोबतच 4GB पर्यंत रॅम सपोर्ट आहे. नोकिया 6.1 स्मार्टफोनमध्ये 16MP चा सिंगल रियर कॅमेरा असून फ्रंट साइडला 8MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच 3000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फनमध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर, 3.5 एमएम हेडफोन जॅक, 4G VoLTE, वायफाय, ब्ल्यूटूथ, जीपीएस, एफएम रेडिओ सारखे फिचर्सही या फोनमध्ये देण्यात आले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
नोकियाचा दमदार फिचर्स असलेला 'हा' स्मार्टफोन मिळतोय अगदी स्वस्त Description: नोकिया कंपनीने गेल्यावर्षी लॉन्च केलेल्या आपल्या नोकिया 6.1 (Nokia 6.1) स्मार्टफोनच्या किमतीत कपात केली आहे. हा स्मार्टफोन आता खूपच स्वस्त किमतीत उपलब्ध झाला आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola