खुशखबर... NOKIA ने आपल्या 'या' दोन स्मार्टफोनच्या किमतीत केली कपात, आता खरेदी करा स्वस्तात

Nokia Smartphones: नोकिया कंपनीने आफल्या दोन स्मार्टफोनच्या किमतीत कपात केली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स ड्युअल रियर कॅमेरा सेटअप, फास्ट चार्जिंग सारख्या फिचर्ससह उपलब्ध आहेत. जाणून घ्या या फोनची नवी किंमत.

Nokia 7.1, Nokia 6.1 plus
NOKIA ने आपल्या 'या' दोन स्मार्टफोनच्या किमतीत केली कपात 

थोडं पण कामाचं

  • नोकिया 7.1 आणि नोकिया 6.1 प्लस स्मार्टफोनच्या किमतीत कपात
  • दोन्ही स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि दमदार बॅटरी
  • नोकिया 7.1 स्मार्टफोन गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात लॉन्च करण्यात आला होता

मुंबई: नोकिया कंपनीने आपल्या Nokia 7.1 आणि Nokia 6.1 Plus या स्मार्टफोन्सच्या दरात कपात केली आहे. दोन्ही स्मार्टफोन्सच्या नव्या किमती नोकिया ऑनलाइन स्टोअरवर जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, अॅमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्टवर अद्याप या स्मार्टफोनच्या नव्या किमतींचं लिस्टिंग झालेलं नाहीये. नोकिया 7.1 स्मार्टफोन गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात लॉन्च झाला होता तर नोकिया 6.1 प्लस स्मार्टफोन गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात लॉन्च झाला होता.

नोकिया 7.1 आणि नोकिया 6.1 प्लस फोनची किंमत

नोकिया कंपनीने आपल्या 7.1 स्मार्टफोनची किंमत कमी करुन 12,999 रुपये केली आहे. हा स्मार्टफोन भारतामध्ये 19,999 रुपयांत लॉन्च करण्यात आला होता. यावर्षी एप्रिल महिन्यात सुद्धा नोकियाने आपल्या या फोनच्या किमतीत कपात केली होती. तर दुसरीकडे नोकिया 6.1 प्लस स्मार्टफोनची किंमत कमी केल्याने नव्या किमतीनुसार आता हा फोन 11,999 रुपयांत उपलब्ध होणार आहे. ही किंमत 4GB रॅम व्हेरिएंटच्या फोनची आहे. तर 6GB रॅम व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे.

नोकिया 7.1 स्पेसिफिकेशन्स

ड्युअल सिम कार्ड सपोर्ट असलेला नोकिया 7.1 स्मार्टफोन 5.84 इंचाचा फुल एचडी प्लस प्योअर डिस्प्लेसह उपलब्ध आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर असून 4GB रॅम आहे. ड्युअल रियर कॅमेरा सेटअप या फोनमध्ये देण्यात आला आहे. ज्यामध्ये 12MP लेंस आणि एक 5MP ची सेकंडरी लेंस देण्यात आली आहे. फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 64GB स्टोरेज सुविधा असून ही स्टोरेज क्षमता मायक्रो एसडी कार्डच्या सहाय्याने 400 GB पर्यंत वाढवता येणार आहे. तर 3060 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

नोकिया 6.1 प्लस स्मार्टफोनचे फिचर्स

नोकियाच्या 6.1 प्लस या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम कार्ड सपोर्ट, 5.8 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनवर गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन मिळतं. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसरवर काम करतो. जो 4GB रॅम आणि 6GB रॅमला सपोर्ट करतो.

नोकिया 6.1 प्लस या फोनमध्ये 16MP आणि 5MP लेंस असलेला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या पुढील बाजुला 16MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 64GB इनबिल्ड स्टोरेज सुविधा देण्यात आली आहे. तसेच स्टोरेज क्षमता मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 400GB पर्यंत वाढवता येणार आहे. या फोनमध्ये 3060 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...