Nokia च्या 'या' स्मार्टफोनवर तब्बल 7000 रुपयांचा डिस्काऊंट

फोना-फोनी
Updated Jun 10, 2019 | 17:30 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Nokia phone discount: नोकिया कंपनीने आपल्या स्मार्टफोनवर 7000 रुपयांचा डिस्काऊंट जाहीर केला आहे. पाह हा डिस्काऊंट कुठल्या फोनवर दिला जात आहे आणि त्यानंतर किती रुपयांनी स्वस्त झालाय फोन.

Nokia offers discount of 7000 rupees on Nokia 8.1 smartphone
स्मार्टफोनवर तब्बल 7000 रुपयांचा डिस्काऊंट 

मुंबई: स्मार्टफोनप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, नोकिया कंपनीने आपल्या नोकिया 8.1 (Nokia 8.1) या स्मार्टफोनवर तब्बल 7000 रुपयांचा डिस्काऊंट दिला आहे. या डिस्काऊंटमुळे नोकियाचा हा स्मार्टफोन खूपच स्वस्त झाला आहे. नोकिया ऑनलाइन स्टोअरमध्ये ग्राहकांना हा फोन नव्या किमतीत खरेदी करता येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. तुम्हाला नोकियाचा Nokia 8.1 हा स्मार्टफोन अगदी स्वस्तात मिळत आहे. 

Nokia 8.1 हा स्मार्टफोन मिड-रेंजचा स्मार्टफोन असून या फोनच्या किमतीत आता कपात करण्यात आली आहे. नोकिया कंपनीच्या वेबसाइटवर सुद्दा या फोनची नवी किंमत पहायला मिळणार आहे. नोकिया 8.1 हा स्मार्टफोन भारतीय बाजारात डिसेंबर 2018 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. लॉन्चिंगवेळी या फोनची किंमत 26,999 रुपये ठेवण्यात आली होती. मात्र, आता या फोनच्या किमतीत 7,000 रुपयांनी कपात केल्यामुळे हा फोन ऑनलाइन शॉपमध्ये 19,999 रुपयांना (4GB रॅम मॉडल) उपबल्ध झाला आहे. तर, 6GB रॅम असलेला फोन 29,999 रुपयांऐवजी 22,999 रुपयांत मिळणार आहे. 

यासोबतच नोकिया ऑनलाइन स्टोअरतर्फे ग्राहकांना खास ऑफरही दिली जात आहे. यामध्ये ग्राहकांना 4000 रुपयांचे गिफ्ट कार्ड, वन-टाईम स्क्रीन रिप्लेसमेंटची सुविधा दिली जात आहे. तसेच एअरटेल ग्राहकांना नोकिया 8.1 फोन खरेदी केल्यास 1TB पर्यंत 4G डेटा असलेले इंटरनेट प्लान दिले जात आहेत. या प्लानची सुरूवात 199 रुपयांपासून सुरू होत आहे. 

नोकिया 8.1 या स्मार्टफोनमध्ये 6.18 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले, ऑक्टाकोअर स्नॅपड्रॅगन 710, फोनमध्ये 12MP आणि 20MP कॅमेरा दण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 3500 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Nokia च्या 'या' स्मार्टफोनवर तब्बल 7000 रुपयांचा डिस्काऊंट Description: Nokia phone discount: नोकिया कंपनीने आपल्या स्मार्टफोनवर 7000 रुपयांचा डिस्काऊंट जाहीर केला आहे. पाह हा डिस्काऊंट कुठल्या फोनवर दिला जात आहे आणि त्यानंतर किती रुपयांनी स्वस्त झालाय फोन.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola