मुंबई : नोकिया कंपनीने आपला नवा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. Nokia C21 Plus या स्मार्टफोनमध्ये 13 MP चा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची खास बाब म्हणजे एकदा चार्ज केल्यावर या फोनची बॅटरी तीन दिवस काम करणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तसेच या फोनला दोन वर्षांपर्यंत क्वॉटर्ली सिक्युरिटी अपडेट्स मिळत राहणार आहेत. हा स्मार्टफोन दोन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
Nokia C21 Plus हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुन भारतात खरेदी केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनच्या 3GB + 32GB व्हेरिएंटची किंमत 10,299 रुपये आणि 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 11,299 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन डार्क सियान आणि वार्म ग्रे या दोन रंगांत उपलब्ध आहे. लवकरच हा स्मार्टफोन ई-कॉमर्स साइट्स आणि रिटेल चॅनल्सवर विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे.
हे पण वाचा : Gmail Tips and Tricks: तुम्ही पाठवलेला Gmail समोरच्याने वाचला आहे की नाही ते कसे ओळखाल, पाहा या टिप्स
हा स्मार्टफोन अँड्रॉईड 11 गो एडिशनवर चालतो आणि यामध्ये 6.5 इंचाचा HD + डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनला दोन वर्षांपर्यंत रेग्युलर सिक्युरिटी अपडेट्स मिळत राहणार आहेत. या फोनच्या रियरला एक फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. यामध्ये ऑक्टा-कोअर Unisoc SC 9863 A प्रोसेसर देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 13MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2 MP चा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या फोनच्या फ्रंटला 5MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फ्रंट आणि रियर दोन्ही बाजूला LED फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.
या स्मार्टफोनमध्ये 5050 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने दावा केला आहे की, हा स्मार्टफोन एकदा चार्ज केल्यावर तीन दिवसांपर्यंत बॅटरी राहू शकते. यासोबतच फोनला 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट सुद्धा देण्यात आला आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 3.5 mm हेडफोन जॅक, Bluetooth v4.2 आणि Micro-USB पोर्ट देण्यात आला आहे. या फोनची इंटरनल मेमरी तुम्ही मेमरी कार्डच्या मदतीने 256 GB पर्यंत वाढवू शकता.