Nokia 5G Phone: नोकियाने भारतीय बाजारात लॉन्च केला 5G फोन, 50MP कॅमेरा आणि बरंच काही, किंमत...

Nokia G60 5G phone specifications and price: नोकियाने भारतीय बाजारात 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनमध्ये 50MP कॅमेरा देण्यात आला असून इतरही फिचर्सचा समावेश आहे. 

Nokia G60 5G
Nokia G60 5G 
थोडं पण कामाचं
  • नोकियाचा 5G फोन भारतीय बाजारात लॉन्च
  • Nokia G60 5G नावाचा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च
  • या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे तर 8MP फ्रंट कॅमेरा आहे 

Nokia G60 5G Phone: नोकिया कंपनीने आपला 5G फोन बाजारात लॉन्च केला आहे. या फोनचं नाव Nokia G60 5G आहे. हा फोन अँड्रॉईड 12 वर चालतो. कंपनीने दावा केला आहे की, ग्राहकांना तीन वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर अपडेट मिळत राहतील. या स्मार्टफोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा सुद्धा देण्यात आला आहे. (nokia G60 5g phone launch in india 50mp camera check price and specifications read in marathi)

Nokia G60 5G स्मार्टफोनच्या सिंगल 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा फोन 7 नोव्हेंबरपर्यंत कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुन प्री बूक करता येईल. या फोनचं बुकिंग रिटेल स्टोअर्समधून सुद्धा करता येईल. हा फोन ब्लॅक आणि आइस कलर्समध्ये लॉन्च करण्यात आला आहे. लिमिटेड कालावधीतील या ऑफर अंतर्गत ग्राहकांना 3599 रुपयांचा Nokia Wired Buds फ्री मिळेल.

हे पण वाचा : 12 राशींपैकी सर्वाधिक धोकादायक रास कोणती? वाचा

Nokia G60 5G फोनचे स्पेसिफिकेशन्स

ड्युअल सिम सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन अँड्रॉईड 12 वर चालतो आणि यामध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.5 इंचाचा FHD+ (1080x2400 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. या फोनमध्ये Snapdragon 695 प्रोसेसर देण्यात आला आहे. 

हे पण वाचा : तुमची रास सांगते तुम्ही किती खोटारडे आहात

फोटोग्राफीसाठी या फोनच्या रिअरमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 5MP अल्ट्रा-वाईड अँगल कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या फोनच्या पुढील बाजुला 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा नॉचमध्ये आहे.

Nokia G60 5G बॅटरी 4500 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये 20W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आलं आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये bluetooth 5.1, 3.5 mm जॅक, एक टाईप-सी पोर्ट आणि ड्युअल बँड वाय-फाय देण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी