Nokia Cheap Smartphone : फक्त 7000 रुपयांमध्ये नोकियाने आणला जबरदस्त 5G स्मार्टफोन, पाहा C2 2nd एडिशनचे फीचर्स

Nokia Smartphone : भारतीय बाजारपेठेत एक वेळ अशी होती की नोकियाचा (Nokia) दबदबा होता. मात्र नोकियाने आपल्या स्मार्टफोनमध्ये अॅंड्राइडऐवजी विंडोज प्रणालीची निवड करत मोठी चूक केली. यावेळेस नोकियाने अॅंड्राइड प्रणालीचा वापर केला आहे. नोकिया कमी किंमतीतील एकाहून एक दर्जेदार स्मार्टफोन बाजारात आणते आहे. लॉंच झाल्याबरोबरच Nokia C2 2nd Edition हा स्मार्टफोन ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे.

Nokia Smartphone
नोकिया स्मार्टफोन  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • नोकियाचे भारतीय बाजारपेठेत पुनरागमन
  • नोकियाचा नवा 5G स्मार्टफोन
  • Nokia C2 2nd Editionची भन्नाट वैशिष्ट्ये

Nokia C2 2nd Edition : नवी दिल्ली : सध्या स्वस्तात चांगला स्मार्टफोन देण्यासाठी मोबाइल कंपन्यांवर मोठा दबाव आहे. भारतातील स्मार्टफोनची (Smartphone)बाजारपेठ प्रचंड विस्तारते आहे. नोकियाने भारतात आपला नोकिया सी2 सेंकड एडिशन  (Nokia C2 2nd Edition) लॉंच केला आहे. प्रतिस्पर्धी कंपन्यांना लक्षात घेऊन या नव्या स्मार्टफोनची किंमत ठरवण्यात आली आहे. भारतीय बाजारपेठेत एक वेळ अशी होती की नोकियाचा (Nokia) दबदबा होता. मात्र नोकियाने आपल्या स्मार्टफोनमध्ये अॅंड्राइडऐवजी विंडोज प्रणालीची निवड करत मोठी चूक केली. अॅंड्राइडसारख्या ग्राहकाभिमुख प्रणालीसमोर विंडोजचा टिकाव लागणे शक्य नव्हते. त्यानंतर भारतीय बाजारपेठेतून नोकियाची पीछेहाट सुरू झाली. मात्र आता पुन्हा एकदा नोकियाने भारतीय बाजारपेठेत एन्ट्री केली आहे. यावेळेस नोकियाने अॅंड्राइड प्रणालीचा वापर केला आहे. नोकिया कमी किंमतीतील एकाहून एक दर्जेदार स्मार्टफोन बाजारात आणते आहे. लॉंच झाल्याबरोबरच Nokia C2 2nd Edition हा स्मार्टफोन ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. नोकियाचा हा स्मार्टफोन 7 हजार रुपयांच्याही खाली मिळतो आहे. याच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊया. (Nokia launched new C2 2nd Edition smartphone for less Rs 7,000)

अधिक वाचा-  Rajiv Gandhi : राजीव गांधी हत्येप्रकरणी सर्व आरोपींची सुटका, तमिळनाडूत फटाके फोडून जल्लोष

नोकियाने हा स्वस्त स्मार्टफोन जास्त बॅटरी पॉवरनिशी आणला आहे. यात 5.7 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये 5 MP कॅमेरा आहे. फारच कमी किंमतीत हा स्मार्टफोन ग्राहकांना मिळणार आहे. नोकियाच्या या जबरदस्त स्मार्टफोनची वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

या वर्षी फेब्रुवारी महिन्यात नोकियाचा सर्वात स्वस्त कंपनीने 2022 टेक इव्हेंटमध्ये लॉंच केला होता. यात कंपनीने Nokia C21 आणि Nokia C21 plus सह Nokia C22nd Edition आणला आहे. यामध्ये 5.7 इंच स्क्रीन, 5MP कॅमेरा आणि 2400 mAh बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत सात हजार रुपयांपेक्षाही कमी आहे.

Nokia C2 2nd Edition ची किंमत

या नव्या स्मार्टफोनची युरोपातील किंमत 79 युरो म्हणजे फक्त 6,540 रुपये इतकी आहे. आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतदेखील हा स्मार्टफोन लॉंच केला जाण्याची अपेक्षा आहे. हा स्मार्टफोन ग्रे आणि ब्ल्यू या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. सात हजारांपेक्षा कमी किंमतीत या फोनमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत.

अधिक वाचा  : मेव्हण्याचं केलं अपहरण...खंडणी म्हणून मागितली वधू

Nokia C2 2nd Editionमधील सुविधा

या फोनमध्ये 5.7 इंचाचे आयपीएस पॅनल आहे. शिवाय 960 x 480 पिक्सेलचे रिझोल्यूशन देण्यात आले आहे. शिवाय हा फोन मीडियाटेक क्वाड-कोअर प्रोसेसरद्वारे सज्ज आहे. हा फोन 1.5 GHz वर क्लॉक करतो.

अधिक वाचा  : खासदार गजानन किर्तीकर बाळासाहेबांच्या शिवसेनेत

रॅम आणि स्टोरेज

या स्मार्टफोनमध्ये 1GB, 2GB RAM आणि 32 GB स्टोरेज देण्यात आले आहे. अतिरिक्त स्टोरेज क्षमतेसाठी यामध्ये मायक्रो एचडी कार्ड स्लॉट देण्यात आले आहे. हा फोन Android 11Go व्हर्जनवर चालतो. दोन वर्षांच्या गॅरंटीसह हा फोन मिळतो. यामध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर नाही. यामध्ये फेस अनलॉकचा ऑप्शन आहे.

कॅमेरा आणि बॅटरी

यामध्ये समोरच्या बाजूस एक 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा नसतो. यामध्ये रिअर कॅमेरा सेटअपमध्ये LED फ्लॅश सोबत 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

यामध्ये 4G LTE, 2.4 GHz wifi, GPS, 1 micro SB port आणि 3.5 mini audio jack सारखे अप्रतिम फीचर्स देण्यात आलेले आहेत. हा फोन सिंग सिम व्हर्जनमध्येदेखील येतो.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी