लँडलाइनवरुन मोबाइलवर कॉल करताय, मग हे वाचा...

'ट्राय'चा नवा आदेश १ जानेवारी २०२१ पासून लागू होणार आहे. या आदेशामुळे लँडलाइनवरुन मोबाइलवर कॉल करणाऱ्यांना एक बदल लक्षात ठेवून अंमलात आणावा लागेल.

Now from January 1 all calls from landline to mobile phones will have to dial zero before call numbers
लँडलाइनवरुन मोबाइलवर कॉल करताय, मग हे वाचा...  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • लँडलाइनवरुन मोबाइलवर कॉल करताय, मग हे वाचा...
  • 'ट्राय'चा नवा आदेश १ जानेवारी २०२१ पासून लागू होणार
  • लँडलाइनवरुन मोबाइलवर कॉल करणाऱ्यांना बदल लक्षात ठेवून अंमलात आणावा लागणार

नवी दिल्ली: भारतीय दूरसंचार नियामक मंडळाचा अर्थात 'ट्राय'चा (Telecom Regulatory Authority of India - TRAI) नवा आदेश १ जानेवारी २०२१ पासून लागू होणार आहे. या आदेशामुळे लँडलाइनवरुन मोबाइलवर कॉल करणाऱ्यांना एक बदल लक्षात ठेवून अंमलात आणावा लागेल. 'ट्राय'च्या आदेशानुसार लँडलाइनवरुन मोबाइलवर कॉल करण्यासाठी मोबाइल नंबरच्या आधी शून्य हा क्रमांक डायल करावा लागेल. (Now from January 1 all calls from landline to mobile phones will have to dial zero before call numbers)

ताज्या आदेशामुळे दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांना मोठ्या संख्येने नव्या फोन नंबरचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. याआधी लँडलाइन नंबरच्या आधी २ हा क्रमांक डायल करण्याचा आदेश लागू झाला होता. या आदेशामुळे मोठ्या संख्येने लँडलाइनसाठी नव्या फोन नंबरचे पर्याय उपलब्ध झाले होते.

लागोपाठ दोन शून्य असलेला एकही एसटीडी कोड भारतात नाही. तसेच कोणत्याही टोल फ्री क्रमांकाची तसेच कॉल सेंटरशी संपर्क साधण्याच्या क्रमांकाची सुरुवात शून्य या आकड्याने होत नाही. याच कारणामुळे अस्तित्वात असलेल्या सर्व दहा आकड्यांच्या मोबाइल नंबरच्या आधी शून्य हा क्रमांक डायल करुन पुढे मोबाइल क्रमांक डायल केला तर गोंधळ उडणार नाही आणि योग्य ठिकाणी संपर्क होऊ शकेल. 'ट्राय'ने याच कारणामुळे लँडलाइनवरुन मोबाइलवर कॉल करण्यासाठी मोबाइल नंबरच्या आधी शून्य हा क्रमांक डायल करण्याचे बंधन घातले आहे. 

जर अ नावाच्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांक १२३४५६७८९९ असा असेल तर १ जानेवारी २०२१ पासून मोबाइलवरुन मोबाइलवर संपर्क करताना अ ला कॉल करण्यासाठी १२३४५६७८९९ डायल करावा लागेल. ही व्यवस्था सध्या लागू असल्यामुळे मोबाइलवरुन मोबाइलवर संपर्क साधणाऱ्यांना कोणताही फरक पडणार नाही. मात्र 'ट्राय'च्या आदेशामुळे १ जानेवारी २०२१ पासून लँडलाइनवरुन अ व्यक्तीच्या मोबाइलवर कॉल करण्यासाठी ०१२३४५६७८९९ असा क्रमांक डायल करावा लागेल. 

लक्षात ठेवा मोबाइल नंबरच्या आधी शून्य हा क्रमांक डायल करण्याचे बंधन १ जानेवारी २०२१ पासून लागू होणार आहे. जोपर्यंत हे बंधन लागू नाही तोपर्यंत लँडलाइनवरुन अ व्यक्तीच्या मोबाइलवर कॉल करण्यासाठी १२३४५६७८९९ असा क्रमांक डायल करावा. पण १ जानेवारी २०२१ पासून 'ट्राय'च्या आदेशानुसार लँडलाइनवरुन अ व्यक्तीच्या मोबाइलवर कॉल करण्यासाठी ०१२३४५६७८९९ असा क्रमांक डायल करावा. 

'ट्राय'च्या आदेशाचे देशातील सर्व दूरसंचार कंपन्यांनी स्वागत केले. 'ट्राय'च्या १ जानेवारी २०२१ पासून लागू होणाऱ्या आदेशामुळे मोठ्या संख्येने नव्या फोन नंबरचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. तसेच भविष्यात ३, ४, ५ या क्रमांकानी सुरू होणारे नवे मोबाइल नंबर तयार करणे शक्य होणार आहे. नवे नंबर आणि एसटीडी क्रमांक यांच्यात गोंधळ होऊन चुकीच्या ठिकाणी संपर्क साधला जाण्याची शक्यता मावळणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी