भारीच... सीम कार्ड किंवा IMEI नंबर बदलल्यानंतरही सापडणार चोरी झालेला मोबाइल!

फोना-फोनी
Updated Jul 08, 2019 | 18:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sim card: जर आपला मोबाइल हरवला किंवा चोरी झाला तर तो मिळणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. त्यामुळे आता मोबाइल शोधण्यासाठी सरकारने एक नवी यंत्रणा तयार केली आहे.

Lost_Mobile_BCCL
सीम कार्ड किंवा IMEI नंबर बदलल्यानंतरही सापडणार चोरी झालेला मोबाइल!  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • चोरी झालेला मोबाइल आता मिळणं झालं सोप्पं
  • चोरीचे मोबाइल शोधण्यासाठी सरकारने तयार केली नवी प्रणाली
  • सीम कार्ड बदललं तरीही चोरट्यांकडून सापडणा मोबाइल

मुंबई: मुंबईसारख्या शहरामध्ये ट्रेन किंवा बसच्या प्रवासात फोन चोरीला जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात. अनेकदा काही जण पोलिसात या प्रकरणी तक्रार देखील नोंदवतात. पण बऱ्याचदा मोबाइल चोरी झाल्यानंतर त्याचं सीम कार्ड आणि आयएमआय नंबर चोरांकडून बदलला जातो. त्यामुळे हरवलेल्या मोबाइलचा शोध लावणं मुश्कील होऊन बसतं. पण आता याच अडचणीवर मात करता येणार आहे. कारण सरकार पुढील महिन्यातच आपल्या या समस्येचं समाधान करणार आहे. सरकार पुढील महिन्यात अशाच तंत्रज्ञानावर आधारित उपाय सुरू करणार आहे. ज्यामध्ये सीम कार्ड किंवा आयएमआय नंबर बदलला तरीही तुमचा हरवलेला किंवा चोरी झालेला मोबाइल सहजपणे सापडू शकतो. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (सी-डीओटी) ने एक टेक्नोलॉजी तयार केली आहे. जी ऑगस्टमध्ये सुरु केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

दूरसंचार विभागाच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितलं की, 'सी-डॉट जवळ एक तंत्रज्ञान तयार आहे. संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर दूरसंचार विभागाच्या मंत्र्यांशी ही प्रणाली लागू करण्याबाबत संपर्क केला जाईल. त्यामुळे ही प्रणाली पुढील महिन्यापासून सुरु केली जाईल.' दरम्यान, संसदेचं अधिवेशन हे २६ जुलैपर्यंत सुरु असणार आहे. दूरसंचार विभागाने जुलै २०१७ मध्ये नकली मोबाइल फोन आणि चोरीच्या घटना कमी करण्यासाठी सी-डॉटला 'सेंट्रल एक्विपमेंट आयडेंटीटी रजिस्टर' (सीईआयआर) विकसित करण्याचं काम दिलं होतं. यासाठी सरकारने सीईआयआर गठीत करण्यासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. 

हरवलेला मोबाइल परत मिळवण्यासाठी सीम कार्ड किंवा आयएमआय नंबरची मदत घेतली जाते. पण अनेकदा चोरट्यांकडून तो काढून टाकला जातो. पण आता सीईआयआर प्रणाली सीम कार्ड काढल्यावर किंवा आयएमआय नंबर बदलल्यानंतर चोरी झालेला किंवा हरवलेल्या फोनवरील सर्व प्रकारच्या सेवा तात्काळ थांबवतील.अनेकदा जेव्हा एखादा मोबाइल चोरी होतो तेव्हा चोर त्या मोबाइलचा IMEI नंबर बदलून तो दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला विकतो. त्यानंतर तो फोन मिळणं  मुश्कील होतं. 

अनेक चोर हे महागडे मोबाइल चोरल्यानंतर त्याचे IMEI नंबर बदलून टाकतात. ज्यामुळे मोबाइल ट्रॅक केले जाऊ शकत नाही. प्रत्येक फोनचा आयएमआय नंबर हा वेगळा असतो. त्यामुळे त्याचं ट्रॅकिंग करणं सोपं असतं. फोन याच नंबरने ट्रॅक केले जातात. फोन चोरी झाल्यानंतर त्याची तक्रार पोलिसांच्या सायबर क्राइम सेलकडे नोंदवली जाते. सायबर सेल मोबाइल ट्रॅकिंगद्वारेच मोबाइल शोधते. दरम्यान आता नव्या प्रणालीमुळे मोबाइल शोधण्यास बरीच मदत होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
भारीच... सीम कार्ड किंवा IMEI नंबर बदलल्यानंतरही सापडणार चोरी झालेला मोबाइल! Description: Sim card: जर आपला मोबाइल हरवला किंवा चोरी झाला तर तो मिळणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. त्यामुळे आता मोबाइल शोधण्यासाठी सरकारने एक नवी यंत्रणा तयार केली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola