WhatsApp Last Seen Settings Update । मुंबई : सोशल मीडियावरील सर्वाधिक लोकप्रिय ॲप व्हॉट्सॲप एक नवीन अपडेट आणणार आहे, ज्या अंतर्गत प्लॅटफॉर्मची गोपनीयता सेटिंग्जमध्ये मोठे बदल आणणार आहे. लवकरच व्हॉट्सॲपचे नवीन अपडेट रिलीज होत आहे. त्यामुळे आता तुम्ही किती वेळ ऑनलाइन आहात हे कोणापासूनही तुम्हाला हवे तेव्हा लपवता येईल. चला तर म जाणून घेऊया हे नवीन अपडेट काय आहे आणि यामुळे सर्वच युजर्स का आनंदी आहेत. (Now WhatsApp has added a new feature in privacy settings Last Scene).
अधिक वाचा : महत्त्वाची बातमी! एसबीआयचे होम लोन, कार लोन महागले
WABetaInfo च्या नवीन अहवालानुसार, व्हॉट्सॲप एक नवीन अपडेट आणत आहे, जे प्लॅटफॉर्मच्या 'लास्ट सीन' फिचर्सच्या सेटिंग्जमध्ये मोठा बदल आणेल. माहितीनुसार, व्हॉट्सॲप एका फिचरवर काम करत आहे जे युजर्संना त्यांचे 'लास्ट सीन' त्यांना दाखवायचे नसलेल्या लोकांपासून किंवा त्यांना अधिक प्रश्न विचारणाऱ्यांपासून लपवता येणार आहे.
अधिक वाचा : ७१ हजारांच्या स्कूटीसाठी दिले तब्बल १५ लाख रूपये
या नवीन अपडेटमध्ये येणाऱ्या फिचरच्या मदतीने तुम्ही अशा लोकांपासून तुमचा लास्ट सीन लपवू शकता ते तुम्हाला ऑनलाइन असल्यावर सतत विचारणा करत असतात. हे फिचर व्हॉट्सॲप युजर्संना विशिष्ट व्यक्तींपासून त्यांचा लास्ट सीन (Last Seen) लपवण्याचा पर्याय उपलब्ध करून देईल. हे वैशिष्ट्य व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना विशिष्ट संपर्कांपासून त्यांचे शेवटचे दृश्य लपविण्याचा पर्याय देईल. ॲपच्या प्रायव्हसी अंतर्गत हे फीचर तयार करण्यात आले आहे. यासाठी युजर्संना सेटिंग्जच्या 'लास्ट सीन'मध्ये जावे लागेल आणि त्यानंतर शेवटचा पर्याय निवडावा लागेल. नंतर Everyone, माय कॉन्टॅक्ट्स (My Contacts), नोबडी (Nobody) आणि माय कॉन्टॅक्ट्स एक्सेप्ट (My Contacts Except) इत्यादी पर्याय निवडावे लागतील. अशा प्रकारे, तुम्ही तुमचा लास्ट सीन कोणापासूनही लपवू शकाल.
या नवीन अपडेटमध्ये 'लास्ट सीन' व्यतिरिक्त अनेक मनोरंजक फिचर्स जारी केले जाऊ शकतात. 'लास्ट सीन' प्रायव्हसी अपडेट आता प्रोफाईल फोटोसाठी आणि तुमच्या 'बद्दल' सेक्शनसाठी देखील आणले जाऊ शकते. तसेच, ग्रुप ॲडमिनला एक विशेष पॉवर देखील मिळेल ज्यामुळे तो सर्व सदस्यांसाठी ग्रुपवर येणारा मेसेज डिलीट करू शकेल. या नवीन अपडेटनंतर युजर्स व्हॉट्सॲपवर येणार्या मेसेजवर इमोजीसह प्रतिक्रियाही देऊ शकतील.