MOTO G22 : लॉन्चिंगच्या आधीच स्पेसिफिकेशन्स झाले लिक, फिचर पाहून युजर्स खूश

मोटोरोला कंपनीचा परवडणारा आणि आधुनिक फिचर्स असणारा मोबाईल म्हणून अनेकजण MOTO G22 ची प्रतीक्षा करत आहे. कंपनीने घोषणा करण्यापूर्वीच या मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स लिक झाले आहेत.

MOTO G22
MOTO G22 चे फिचर्स झाले लिक  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • MOTO G22 चे फिचर्स झाले लिक
  • मोबाईल असेल 6.53 इंचांचा
  • सुरक्षेसाठी अनेक फिचर्स

MOTO G22 | मोटोरोला कंपनीचा MOTO 22 हा फोन लवकरच बाजारात लॉन्च होणार आहे. या मोबाईलच्या चार वेगवेगळ्या हँडसेटचे रंग आणि त्याचे स्पेसिफिकेशन्स याबाबतची माहिती मात्र त्यापूर्वीच बाजारात लिक झाली आहे. कंपनीने अधिकृतरित्या याची घोषणा कऱण्यापूर्वीच ही माहिती युजर्सपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे ज्यांना हा फोन खरेदी करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे. फोन बाजारात येण्यापूर्वीच त्याच्या फिचर्सवर संशोधन करण्यासाठी अधिक वेळ त्यामुळ मिळणार आहे. 

असे आहेत (कथित) फिचर्स
लिक झालेल्या माहितीनुसार MOTO 22 मध्ये 6.53 इंचाचं OLED पॅनेल असणार आहे. त्याचसोबत 90Hz रिफ्रेश रेट आणि HD+ रिझॉल्युशन या मोबाईलमध्ये देण्यात आलं आहे. फोनच्या मध्यभागी असणारं पंचहोल आणि थिक चिन हीदेखील या मोबाईलची वैशिष्ट्यं असणार आहेत. 

अधिक वाचा - NASA Controversy : चंद्रावरील माती आणि झुरळांच्या सांगाड्यावरून वाद, थेट NASA नेच घेतला आक्षेप; ही आपली संपत्ती असल्याचा दावा

16MP सेल्फी कॅमेरा
MOTO G22 मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फुल्ल एचडी व्हर्जनमध्ये सेल्फी कॅमेरा वापरून व्हिडिओ आणि फोटो काढता येणार आहेत. पाठीमागे 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईट लेन्स बसवण्यात आली आहे. तर डेप्थ इफेक्टसाठी 2 मेगापिक्सलची वेगळी लेन्सही मोबाईलमध्ये असणार आहे. छोट्यात छोट्या घटकाचा फोटोही क्लिअर घेता यावा, यासाठी ही रचना करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 

अधिक वाचा - Cheapest CNG Cars : या आहेत जबरदस्त मायलेजच्या सर्वात स्वस्त सीएनजी कार, पेट्रोलचे टेन्शनच नाही!

इतर फिचर्स
या मोबाईलमध्ये MediaTek Hello G37 प्रोसेसर बसवण्यात आला आहे. या मोबाईलध्ये 4GB रॅम, 64GB स्टोअरेज आणि मायक्रो SD कार्डसाठी एक स्लॉट देण्यात आला आहे. हा मोबाईल अँड्रॉईड12 ऑपरेटिंग सिस्टिमचा असावा, असा अंदाज आहे. वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी या मोबाईलच्या साईडला फिंगरप्रिंट रिडर बसवण्यात आले आहेत. 
या मोबाईलमध्ये 5000mAH ची बॅटरी आहे. या मोबाईलमध्ये 5G कनेक्टिव्हिटीची सोय नसावी, अशी चर्चा आहे. गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या G20 च्या श्रेणीतीलच पुढचं मॉडेल म्हणून या मोबाईलकडे पाहिलं जात आहे. या क्षणी MOTO G22 ची किंमत किती असेल, याची कुठलीही माहिती समोर आलेली नाही. या महिन्याच्या शेवटी कदाचित किंमतीची माहिती समोर येईल, असा अंदाज आहे. पुढील एक ते दोन आठवड्यांत या मोबाईलची कंपनीकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. युजर्सच्या बजेटमध्ये बसणारा आणि आधुनिक फिचर्स असणारा मोबाईल म्हणून या मॉ़डेलची जोरदार चर्चा आहे. अर्थात, लिक झालेली स्पेसिफिकेशन्स आणि प्रत्यक्षातील स्पेसिफिकेशन्स यात नेमका काय फरक आहे, हे समजण्यासाठी कंपनीकडून हा मोबाईल अधिकृतरित्या लॉन्च होण्याची वाट पाहावी लागेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी