OnePlus 7 आणि  OnePlus 7 Pro लॉन्च, फिचर्स आणि किंमत जाणून घ्या

फोना-फोनी
Updated May 15, 2019 | 10:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

OnePlus 7 /OnePlus 7 Pro launch: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी OnePlus नं आपले दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. वनप्लस 7 आणि वनप्लस 7 pro ची लॉन्चिंगसाठी मंगळवारी संध्याकाळी इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं

OnePlus 7 and OnePlus 7 Pro
लवकर खरेदी करा,  OnePlus 7 आणि  OnePlus 7 Pro 

OnePlus 7 and 7 Pro Price and Features: चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लसनं भारतीय बाजारात दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. लॉन्च इव्हेंटमध्ये फ्लॅगशिप स्मार्टफोन वनप्लस 7 प्रो आणि वनप्लस 7 फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च केले. यावेळी स्मार्टफोनमध्ये डिस्प्ले, कॅमेरा आणि प्रोसेसरसह काही फिचर्स गेल्या व्हर्जनच्या तुलनेत आणखीन चांगले केले आहेत. कंपनीनं OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro ची किंमत देखील सांगितली आहे. याव्यतिरिक्त फोनसोबत 5,990 रूपयांच्या किंमतीचा इयरफोन देखील देण्यात येणार आहे. १६ मे पासून दोन्ही फोन वेगवेगळ्या रंगांत आणि स्टोरेज व्हेरिएंटमध्ये मार्केटमध्ये येण्यास सुरूवात होईल. वनप्लसच्या नव्या स्मार्टफोनची किंमत 32,999 पासून सुरूवात आहे. 

OnePlus 7 आणि  OnePlus 7 प्रो चे फिचर 

कॅमेराः  OnePlus 7 Pro मध्ये 48 मेगापिक्सलच्या सेंसरसोबत ट्रिपल कॅमेरा सिस्टम देण्यात आली आहे. यात ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन देखील आहे. या सिस्टममध्ये एक कॅमेरा अल्ट्रा-वाइड किंवा टेलिफोटो कॅमेऱ्याच्या ऐवजी एक डेप्थ सेंसर आहे. कॅमेरा अल्ट्राशॉट फिचर्स एचडीआर प्लस आणि सुपर रिजॉल्यूशन मोडनं परिपूर्ण आहे. OnePlus 7 मध्ये ड्युअल कॅमेरा सिस्टम देखील आहे. 

सेल्फी कॅमेऱ्यासाठी दोन्ही फोनमध्ये एक 16 मेगापिक्सलचं शूटर उपलब्ध आहे. हे 1080p चा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी सक्षम आहे. कॅमेरा 4K / 60fps (फ्रेम प्रति सेंकद) चा व्हिडिओ कॅप्चर करण्यासोबत  1080p / 240fps आणि 720p / 480fps स्लो मोशन मोडची सुविधा आहे. फ्रंट कॅमेरा खास पद्धतीनं डिझाईन करून फोनमध्ये इंटिग्रेट करण्यात आलं आहे. 

प्रोसेसरः नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये 8 कोरचं क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 885.7 नॅनोमीटरचं चिपसेट देण्यात आलं आहे. ज्यात 855  एड्रेनो 640 जीपीयू ग्राफिक्स असेल. यावेळी वनप्लस स्मार्टफोन चांगल्या बेजललेस डिस्प्लेसोबत सादर करण्यात आला आहे. 

रॅमः शानदार हायस्पीड प्रोसेसर व्यतिरिक्त वनप्लस 7 प्रोमध्ये 12 gb रॅम देण्यात आला आहे. रॅम वाढवल्यामुळे स्मार्टफोनमध्ये हेव्ही अॅप रोम मेमरीच्या ऐवजी रॅम मेमरीमध्ये लोड होईल आणि यामुळे फोनचा परफॉर्मन्स वेगानं आणि स्मूथ होईल. 

बॅटरी आणि स्पीकरः प्रो व्हर्जनला दमदार बॅटरी 4000 एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. वनप्लस 7 मध्ये 3700 एमएएच बॅटरी आहे. फोनमध्ये डॉलबी एटमॉसच्या 3 D साऊंडचा ड्युअल स्पिकर देण्यात आला आहे. 

स्टोरेजः  यावेळी कंपनीनं स्टोरेज देखील वाढवलं आहे. प्रो व्हर्जन नव्या यूएफएस 3.0 स्टॅडर्डवर 128 gb आणि 256 gb स्टोरेजच्या क्षमतेसोबत लॉन्च करण्यात आलं आहे. दोन्ही फोनमध्ये 6gb आणि 8 gb रॅम असलेल्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. वनप्लस 7 pro मध्ये एक 12 gb चं व्हर्जन देखील सादर करण्यात आलं आहे. 

किंमतः भारतीय बाजारात वनप्लस 7 ची किंमत 32,999 रूपये आणि प्रो व्हर्जनची किंमत 48,999 रूपयांपासून सुरू आहे. OnePlus7 ची किंमत 32,999 रूपये (6GB +128GB) आणि  37,999 रूपये (8GB+256GB)असेल. ज्यात OnePlus7Proचे तीन व्हेरिएंटची किंमत 48,999 रूपये (6GB+128GB), 52,999 (8GB+256GB)रूपये आणि Rs 57,999 (12GB+256GB) रूपये असेल. 

कंपनीनं लॉन्च इव्हेंटमध्ये पहिल्यांदा OnePlus 7 Pro  सादर केला आणि त्यानंतर  OnePlus 7 लॉन्च केला. हे दोन्ही स्मार्टफोन बऱ्याच आकर्षक रंगात सादर करण्यात आले आहे. 

खाली दिलेल्या लिंकच्या मदतीनं तुम्ही या इव्हेंटचा व्हिडिओ बघू शकता. 

वनप्लस जगातील टॉप प्रीमियम स्मार्टफोन निर्माता कंपनीपैकी एक आहे. लोक बऱ्याच वेळेपासून कंपनीच्या  वनप्लस 7 आणि वनप्लस 7 प्रो स्मार्टफोनची आतुरतेनं वाट बघत होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी