Oppo नं लॉन्च केला सर्वांत स्वस्त स्मार्टफोन,  १० हजार रूपयांत मिळवा दमदार फिचर

फोना-फोनी
Updated Apr 23, 2019 | 13:46 IST | IANS

Oppo A5s Launch: ओप्पोनं भारतात एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत १० हजार रूपयांपेक्षा कमी आहे. कंपनीनं यात चांगले फिचर दिले आहेत. जाणून घ्या या स्मार्टफोनच्या खास फिचरबद्दल.

Oppo  A5S
Oppo नं लॉन्च केला सर्वांत स्वस्त स्मार्टफोन,  १० हजार रूपयांत मिळवा दमदार फिचर  |  फोटो सौजन्य: Twitter

Oppo A5s budget smartphone launched In India, Price, feature specifications and more: चीनी हँडेसट निर्माता ओप्पोनं सोमवारी कमी दरातील A5s  हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत केवळ ९,९९० रूपये आहे. ओप्पो A5s मध्ये वॉटरड्रॉप नॉच स्क्रिन आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक हेलियो पी35 चिपसेटवर चालतो. कंपनीनं दिलेल्या वक्तव्यात म्हटलं की, डिव्हाईसमध्ये 4,230 एमएचची मजबूत बॅटरी देण्यात आली आहे. तसंच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) एल्गोरिद्मचा प्रयोगामुळे ऊर्जेचा वापर कमी होतो. 

Oppo A5s चे फिचर

  1.   A5s हा फोन दोन व्हर्जनमध्ये उपलब्ध होईल. ज्यात २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी रोम आणि ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी रोमचा समावेश असेल. ओप्पो इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ओप्पो दक्षिण आशियाचे अध्यक्ष चार्ल्स वोंग यांनी सांगितलं की, ओप्पो A5s च्या लॉन्चसोबत आमचं लक्ष्य आहे की, आमच्या यूजर्संना आणखीन अधिक शक्ती आणि प्रगत तंत्रज्ञानासोबत कमी किंमतीत स्मार्टफोन प्रदान करावे. 
  2.   या स्मार्टफोनमध्ये 6.2 इंचाची एलसीडी वॉटरड्रॉप स्क्रिन देण्यात आली आहे.  ज्याचा एसपॅक्ट रेशिओ 19:9 आहे. यात  8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 13 मेगापिक्सलचा प्लस 2 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे. हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे जो मीडियाटेक हेलियो पी 35 प्रोसेसरनं ऑपरेट केला आहे. मीडियाटेक हेलियो पी 35 एक ऑक्टा-कोर चिपसेट आहे. जी टीएसएमसीच्या सुधारित 12 एनएम फिनएफईटी नोडवर निर्मित आहे. 
  3.  ओप्पोच्या A5s या स्मार्टफोनमध्ये रिअर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनला तुम्ही अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम मॉल अशा ठिकाणांवरून खरेदी करू शकता. स्मार्टफोनचा ४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. कंपनीनं या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अद्याप घोषणा केली नाही आहे. तसंच हा स्मार्टफोन ग्रीन आणि गोल्ड या दोन कलरमध्ये उपलब्ध होणार आहे. 

तर गेल्या महिन्यात आलेल्या वृत्तानुसार ओप्पो कंपनी सध्या एका नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे. या स्मार्टफोनचं नाव रेनो असणार आहे. स्मार्टफोनशी निगडीत विविध लीक रिपोर्ट्स समोर येत आहेत. याआधी स्मार्टफोनचा कलर, कॅमेरा सेटअप आणि अन्य माहिती समोर आली होती. रेनो स्मार्टफोनचं फिचर 10X झूम असेल. तर त्यानंतर आलेल्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, स्मार्टफोन विविध प्रोसेसर व्हेरिएंटमध्ये लॉन्च होईल. ओप्पोनं अधिकृतपणे याबाबतच स्पष्टिकरण दिलं आहे की, स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचं फ्लॅगशिप प्रोसेसर असेल. फोन लिक्विड कूलिंगसहित असणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Oppo नं लॉन्च केला सर्वांत स्वस्त स्मार्टफोन,  १० हजार रूपयांत मिळवा दमदार फिचर Description: Oppo A5s Launch: ओप्पोनं भारतात एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत १० हजार रूपयांपेक्षा कमी आहे. कंपनीनं यात चांगले फिचर दिले आहेत. जाणून घ्या या स्मार्टफोनच्या खास फिचरबद्दल.
Loading...
Loading...
Loading...