ओप्पोच्या स्टायलिश स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात 

फोना-फोनी
रोहित गोळे
Updated Feb 13, 2020 | 16:34 IST

Oppo Reno 2F Price: ओप्पोने आपला Oppo Reno 2F या स्टायलिश स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. त्यामुळे आता कमी किंमतीत हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.

oppo reduced the price of this stylish smartphone now you can buy reno 2 f cheaply
ओप्पोच्या स्टायलिश स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात   |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: ओप्पो रेनो 2 एफ या स्मार्टफोनच्या किंमतीत आता कपात करण्यात आली आहे.  कंपनीने या स्मार्टफोनची किंमत तब्बल २००० रुपयांनी कमी  केली आहे. ओप्पो रेनो 2 स्मार्टफोन रेनो हा 2 सीरीजचा भाग आहे. ज्यामध्ये आकर्षक कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आणि पॉप अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला ​​आहे. या स्मार्टफोनमध्ये फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.

ओप्पो रेनो 2 एफ स्मार्टफोनची किंमत

ओप्पो रेनो 2 स्मार्टफोनच्या किंमती कमी झाल्या आहेत. या स्मार्टफोनची किंमत २३,९९० रुपये एवढी होती जी आता २१,९९० रुपये एवढी झाली आहे. ओप्पो इंडियाने या किंमत कपातीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या स्मार्टफोनची नवीन किंमती अमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर पाहता येईल. ओप्पोने या स्मार्टफोनसह रेनो 2 आणि रेनो 2 झेड हे स्मार्टफोन मागील वर्षी ऑगस्टमध्ये लाँच केले होते. हे स्मार्टफोन त्यावेळी २५,९९० रुपये किंमतीवर लाँच करण्यात आला होता. ज्यात नोव्हेंबरमध्ये घट होऊन २३,९९० रुपये एवढी किंमत झाली होती.

Oppo Reno 2F specifications, features

ड्यूल सिम सपोर्ट असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये 6.53 इंच फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले आहे. जो कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 4 प्रोटेक्शनसह उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी 70 प्रोसेसर आहे. यामध्ये 8 जीबी रॅम मेमरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे. याचं मुख्य लेन्स 48 मेगापिक्सेल आहे.

याव्यतिरिक्त फोनमध्ये 8 मेगापिक्सल का सेकंडरी सेन्सर देण्यात आला आहे. फ्रंटमध्ये ओप्पोने 16 मेगपिक्सलचा कॅमेरा दिला आहे. जो पॉपअप मॉड्यूल आहे. म्हणजेच या फोनमध्ये पॉपअप सेल्फी कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. या स्मार्टफोनमध्ये 4000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी