Paytm Samsung Super Sale: सॅमसंगच्या 'या' स्मार्टफोनवर तब्बल १४ हजार रुपयांची कॅशबॅक ऑफर

फोना-फोनी
Updated May 09, 2019 | 12:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

Paytm Sale: पेटीएमचा सॅमसंग सुपर सेलमध्ये वेगवेगळ्या स्मार्टफोनवर अनेक ऑफर्स सुरु आहे. यामध्ये कॅशबॅक ऑफरवर तब्बल १४ हजार रुपये परत मिळणार आहेत. पण यासाठी तुम्हाला याबाबतची माहिती जाणून घ्यावी लागेल. 

samsung_paytm_sale
(पेटीएम) 

मुंबई: पेटीएमवर सॅमसंग सुपर सेलचं आयोजन करणार आहे. ज्यामध्ये ग्राहकांना तब्बल १४ हजार रुपयांपर्यत कॅशबॅक मिळणार आहे. ही कॅशबॅक ऑफर नुकताच लाँच झालेल्या सॅमसंग गॅलक्सी एस 10 सीरीज स्मार्टफोनवर आहे. कॅशबॅकसोबतच नो कॉस्ट ईएमआय ऑफर आणि एक्सचेंज ऑफर देखील देण्यात आली आहे. या स्मार्टफोन खरेदीवर कॅशबॅक हे पेटीएम अकाउंटवर क्रेडिट होणार आहे. सॅमसंग गॅलक्सी एस 10  (५१२ जीबी) स्टोरेज व्हेरिएंटवर तब्बल १४ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. तर गॅलक्सी एस 10 ई वर ९ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. 

सॅमसंग गॅलक्सी एस 10 स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ही ८४,९०० रुपये एवढी आहे. या स्मार्टफोनवर १४ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. यासाठी आपल्याला MOBSAM14K हा प्रोमो कोड वापरावा लागेल. कॅशबॅकनंतर सॅमसंग गॅलक्सी एस 10 हा स्मार्टफोन आपण ७०,९०० रुपयात खरेदी करू शकतात. 

तर याचा 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ही ६६,९०० रुपये एवढी आहे. या स्मार्टफोनच्या व्हेरिएंटवर ११ हजार रुपयांपर्यत कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. पेटीएमवरून हा फोन खरेदी करत असताना आपल्याला MOBSAM11K हा प्रोमो कोड टाकायचा आहे. ज्यानंतर तुम्हाला हा स्मार्ट फोन फक्त ५५,९०० रुपयात खरेदी करता येईल. तर तिकडे सॅमसंग गॅलक्सी एस ९ वर पेटीएमकडून ९ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. 

त्यामुळे सॅमसंग गॅलक्सी एस 9 हा स्मार्टफोन आपण ४६,९०० रुपयांना खरेदी करू शकतो. या फोनची मूळ किंमत ही ५५,९०० रुपये एवढी आहे. सॅमसंगचा सर्वात प्रीमियम स्मार्टफोन गॅलक्सी एस 10 प्लस यावर ६००० रुपये कॅश बॅक ऑफर आहे. ही कॅश बॅक ऑफर या स्मार्टफोनच्या १२८ जीबी आणि ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटवर मिळणार आहे. हे दोन्ही व्हेरिएंट तुम्हाला अनुक्रमे ६७ हजार ९०० रुपये आणि ८५ हजार ९०० रुपयात खरेदी करता येणार आहे. या दोन्ही स्मार्टफोनची मूळ किंमत ही ७३,९०० रुपये आणि ९१,९०० रुपये एवढी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Paytm Samsung Super Sale: सॅमसंगच्या 'या' स्मार्टफोनवर तब्बल १४ हजार रुपयांची कॅशबॅक ऑफर Description: Paytm Sale: पेटीएमचा सॅमसंग सुपर सेलमध्ये वेगवेगळ्या स्मार्टफोनवर अनेक ऑफर्स सुरु आहे. यामध्ये कॅशबॅक ऑफरवर तब्बल १४ हजार रुपये परत मिळणार आहेत. पण यासाठी तुम्हाला याबाबतची माहिती जाणून घ्यावी लागेल. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola