Apple iPhone 14 खरेदी करायचाय म्हणून 'या' चुका करणं अजिबात परवडणार नाही!

फोना-फोनी
रोहित गोळे
Updated Aug 25, 2022 | 17:58 IST

Apple iPhone 14 सप्टेंबरमध्ये लॉन्च होणार आहे आणि Apple चे नव्या स्मार्टफोनविषयी लोकांमध्ये बरीच चर्चा आहे. पण हा फोन खरेदी करायचा असेल तर तर तो खरेदी करताना तुम्हाला काही चुका करणं हे अजिबात परवडणार नाही.

planning to buy apple iphone 14 so dont make some mistakes financial planning savings investment
महागड्या वस्तूंच्या नादात 'या' चुका कराल तर होईल पश्चताप!  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • iPhone 14 सीरीजसह अॅपलचे इतर प्रोडक्ट 7 सप्टेंबर रोजी लाँच केले जातील
  • चांगले भविष्य आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नियोजन करा
  • मोठ्या आणि महागडी शॉपिंग करण्यापूर्वी बजेट निश्चित करा

Apple iPhone 14 सप्टेंबरमध्ये लाँच होणार आहे. या नव्या फोनबाबत संपूर्ण जगात उत्सुकता आहे. अशावेळी प्रत्येकाकडेच असा नवा फोन असला पाहिजे असं प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे. पण समजा जर आपलं वार्षिक उत्पन्न हे 10,00,000 रुपयांपेक्षा कमी असेल तर अशावेळी या स्मार्टफोन 1,00,000 रुपये अधिक खर्च करणं हे किती शहाणपणाचं आहे. या लेखाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सांगणार आहोत की, वस्तू खरेदी करताना काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. (planning to buy apple iphone 14 so dont make some mistakes financial planning savings investment)

आम्ही चार काम करणाऱ्या पुरुष आणि महिलांशी चर्चा केली. ज्यांचं वय 25 ते 27 वर्ष आहे. ज्यांना वार्षिक 5,00,000 रुपये ते 8,00,000 पगार मिळतो आणि जे टेक-होम सॅलरी (Take-Home Salary) च्या आसपास 40%  भाग हा घर आणि तुमच्या ट्रान्सपोर्टवर खर्च होतो. तसंच खाण्या-पिण्यावर तुमच्या पगारातील सर्वात मोठा भाग खर्च होतं. तसंच अनेक जण PF सह इतरही काही गुंतवणूक करत असतात. 

अधिक वाचा: नितीन गडकरींचा मास्टर प्लान, गाडीची टँक एकदा फुल केल्यास धावणार 650 KM

आम्ही ज्या चार लोकांशी चर्चा केली त्यांच्या मते, महिन्याच्या शेवटचा आठवड्यात खूपच तंगी येते. एकीकडे वाढती महागाई आणि वस्तूच्या वाढत्या किंमती लक्षात घेऊन देखील या सगळ्यांचं म्हणणं आहे की, त्यांची आजही आयफोन खरेद करण्याची इच्छा काही कमी झालेली नाही. त्यामुळे हे चारही जण येणाऱ्या सणांच्या काळात पैसे खर्च करण्यासाठी तयार आहेत.  

आता आम्ही आपल्याला 3 टिप्स देणार आहेत. ज्या तुम्हाला सणासुदीनंतर देखील आर्थिकदृष्ट्या सुदृढ ठेवण्यास मदत करतील.

सणासुदीच्या काळाआधीच प्लॅनिंग आणि तुमचं बजेट ठरवून घ्या: 

आयुष्यात आर्थिक चढ-उतारापासून बचाव करण्यासाठी तरुणांना योग्य वेळी जबाबदारी स्वीकारणं हे खूप महत्त्वाचं आहे. अशी आशा बाळगू नका की, तुम्हाला तुमचे आई-वडील दिवाळीला महागडी बाइक, स्मार्टफोन यासारख्या गोष्टी गिफ्ट करतील. तसेच जर आपण आपल्या आईला सिल्क साडी किंवा वडिलांना रोलेक्स (Rolex) घड्याळ खरेदी करुन देऊ शकत नाही तर स्वत:ला दोष देत बसू नका. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वत:चं एक बजेट तयार करा. 

अधिक वाचा: सावधान ! या कारच्या 'एअरबॅग'मध्ये गडबड, Maruti Suzuki ने घेतला तडकाफडकी निर्णय

यामुळे अगदी शेवटच्या क्षणी खरेदी करण्यापासून आपला बचाव करेल. तसेच प्रोडक्ट्सवर भरघोस सूट किंवा डिल्स यांच्यावर भाळून जाऊ नका. कारण अनेकदा काही गोष्टी आपण गरज नसताना खरेदी करतो. आपलं खरेदीसाठी जे बजेट आहे त्यावर कायम राहा. जर आपल्याला काही खरेदी करायचं असेल तर त्याची तुमच्या बजेटप्रमाणे योग्य अशी यादी बनवून घ्या आणि तशीच खरेदी करा. 

फायनान्स ऑप्शन सावधानीने निवडा: 

आधी खरेदी करा, नतंर पैसे भरा (Buy Now, Pay Later) क्रेडिट कार्ड्स (Credit Cards), डिजिटल लोन्स (Digital Loans) असे अनेक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. पण प्रत्येक फायनेंशियल प्रोडक्टसोबत एक किंमत जोडलेली असते. व्याज दर (Intrest Rate)  आणि परतफेडीच्या कालावधीचे काळजीपूर्वक विश्लेषण करा आणि तुमच्यासाठी उपलब्ध सर्वोत्तम फायनान्स डीलवर रिसर्च करण्याचा प्रयत्न करा. एक असा पर्याय निवडा की, जे पैसे फेडताना तुमच्या एकूण कमाईवरही त्याचा ताण पडणार नाही. 

अधिक वाचा: पृथ्वीसाठी धोक्याची घंटा? सूर्यावर रहस्यमय डागाचा आकार वेगाने वाढतोय, दोन दिवसांत 10 पटीने वाढला सनस्पॉट

तुमची गुंतवणूक अजिबात थांबवू नका 

आर्थिक नियोजन हे काही सहजासहजी होत नाही. अनेक तरुण हे शॉर्टटर्म गरजा पूर्ण करण्यासाठी आपली काही गुंतवणूक रोखतात. पण हे तुमच्या भविष्याच्या दृष्टीने चुकीचं ठरू शकतं आणि आपल्या लाँग टर्म गुंतवणुकीवर त्याचा वाईट परिणाम देखील होऊ शकतो. यामुळे SIP सारख्या गुंतवणुकीचा जास्त फायदा उचला. जिथवर iPhone 14 खरेदीचा प्रश्न आहे. हा तुमचा खासगी निर्णय आहे. पण प्रचंड पैसे खर्च करण्याआधी तुमचं एकूण आर्थिक गणित अजिबात कोलमडणार नाही याची भरपूर काळजी घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी