वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी रोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि Disney+ Hostar, जाणून घेऊया प्रत्येक प्लॅ

फोना-फोनी
Updated Apr 26, 2021 | 15:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

व्होडाफोनच्या ९८ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये १२ जीबी डेटा मिळतो, तेही २८ दिवसांसाठी, तर जिओच्या १०१ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये १२ जीबी डेटा मिळतो.

Best offers of prepaid plans for work from home employees
वर्क फ्रॉम होम करण्यांसाठी जबरदस्त प्रीपेड प्लॅन्स 

थोडं पण कामाचं

  • दूरसंचार कंपन्यांचे प्रीपेड प्लॅन
  • वर्क फ्रॉम होम ग्राहकांसाठी प्लॅन
  • जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडियाच्या ऑफर

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक राज्यात लॉकडाऊन लागू करण्या आले आहे. अशा परिस्थितीत विविध क्षेत्रातील अनेक नोकरदार वर्क फ्रॉम होमने कार्यरत आहेत. खासगी कंपन्यांमधील कर्मचारी वर्क फ्रॉम होमने काम करत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता दूरसंचार कंपन्यांनी नवीन प्लॅन बाजारात आणले आहेत. जिओ, बीएसएनएल आणि व्होडाफोनने मागील वर्षीदेखील वर्क फ्रॉम होम प्लॅन बाजारात आणले होते.

वेगवेगळ्या दूरसंचार कंपनीचे वेगवेगळे प्रीपेड प्लॅन आहेत. या प्लॅनमधील फायदे हे वर्क फ्रॉम होम करण्यांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेले आहेत. ग्राहकांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेटा, एसएमएस आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मिळते आहे.

१०० रुपयांखालील प्लॅन


एअरटेल आणि व्होडाफोन यांनी ४८ रुपयांचे प्रीपेड प्लॅन आणले आहेत. यामध्ये २८ दिवसांसाठी ३ जीबी डेटा मिळतो. तर व्होडफान आयडिया यासोबतच मूव्ही आणि टीव्हीचे सबस्क्रिप्शनदेखील देते.

जिओच्या ५१ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड ६ जीबी डेटा मिळतो. तर एअरटेलच्या ९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये १२ जीबी डेटा मिळतो. व्होडाफोनच्या १६ रुपयांच्या प्लॅनमध्ये २४ तासांसाठी १ जीबी डेटा मिळतो.

तर व्होडाफोनच्या ९८ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये १२ जीबी डेटा मिळतो, तोही २८ दिवसांसाठी. जिओच्या १०१ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये १२ जीबी डेटा मिळतो. ग्राहकांनी आपापल्या गरजांनुरुप यातील प्लॅनची निवड करायची आहे.

३०० रुपयांखालील प्लॅन


जिओ १५१ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना ३० दिवसांसाठी ३० जीबी डेटा देते आहे. तर एअरच्या २५१ रुपयांच्या प्लॅनमध्ये ५० जीबी ४ जी डेटा मिळतो आहे. मात्र काही भागांमध्ये हा प्लॅन उपलब्ध नाही. या प्लॅनची माहिती ग्राहकांना एअरटेल थॅंक्सवर मिळू शकते.

जिओ आणि व्होडाफोन आयडियाचा २५१ रुपयांचा प्लॅन- जिओ ३० दिवसांसाठी ५० जीबी डेटा देते आहे तर व्होडाफोन आयडिया २८ दिवसांसाठी ५० जीबी डेटा देते आहे. 

५०० रुपयांखालील प्लॅन


एअरटेल आपल्या ४०१ रुपयांच्या प्लॅनमध्ये २८ दिवसांसाठी ३० जीबी डेटा देते आहे. शिवाय यात तुम्हाला डिस्ने आणि हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन देखील मिळते. जिओच्या ४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ५६ दिवसांसाठी १.५ जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये डिस्ने, हॉटस्टार आणि जिओ टीव्ही सबस्क्रिप्शनदेखील मिळते. व्होडाफोन आयडियाच्या ५०१ रुपयांच्या प्लॅनमध्ये ७५ जीबी डेटा मिळतो, शिवाय १ वर्षासाठी डिस्ने, हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मोफत मिळते.
 

दूरसंचार क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन आयडियासोबत बीएसएनएलदेखील वेगवेगळे प्लॅन आणि ऑफर ग्राहकांसाठी बाजारात आणत आहेत. लॉकडाऊनमुळे डेटा आणि इतर सुविधांच्या खपात मोठी वाढ झाली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वाढत्या वापरामुळे दूरसंचार क्षेत्राला मोठी संधी निर्माण करून दिली आहे. त्याचाच फायदा घेण्यासाठी कंपन्यांकडून नवनवीन ऑफर बाजारात आणल्या जात आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी