Xiaomi Redmi Y3: शाओमीचा नवा स्मार्टफोन कधी लॉन्च होणार, सांगतोय रणवीर सिंग!

फोना-फोनी
Updated Apr 16, 2019 | 14:05 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Xiaomi Redmi Y3: शाओमीचा रेडमी वाय 3 हा नवीन स्मार्टफोन लवकरच लॉन्च होणार आहे. याची माहिती अभिनेता रणवीर सिंगनं ट्विटकरून दिली. रणवीरनं एक व्हिडिओ ट्विट केलाय. बघा काय म्हणतोय तो.

Ranveer Singh about Xiaomi Redmi Y3
रणवीर सिंग सांगतोय शाओमीच्या रेडमी वाय ३ स्मार्टफोनबद्दल  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: शाओमीनं आपल्या नवीन स्मार्टफोनची लॉन्चिंग डेट जाहीर केलीय. हा स्मार्टफोन शाओमी रेडमी वाय सीरिजचा एक भाग असेल. या स्मार्टफोनमध्ये कंपनीनं दमदार असा सेल्फी कॅमेरा दिलाय आणि त्याच प्रकारे फोनचं प्रमोशन कंपनी करत आहे. रिपोर्ट्स नुसार शाओमीचा हा नवा स्मार्टफोन रेडमी वाय 3 असेल. येत्या 24 एप्रिलला हा स्मार्टफोन कंपनी लॉन्च करणार आहे. फोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा फ्रंट सेल्फी कॅमेरा असणार आहे. अभिनेता रणवीर सिंगनं ट्विट करत या स्मार्टफोनविषयी माहिती दिलीय.

कंपनीनं ट्विट करून या बाबतीत माहिती दिलीय की, रेडमी वाय 3 हा स्मार्टफोन 24 एप्रिलला दुपारी 12 वाजता लॉन्च करण्यात येईल. कंपनी या फोनला #32MPSuperSelfie या हॅशटॅगनं प्रमोट करत आहे. शाओमीनं ट्विटमध्ये स्मार्टफोनच्या एका भागाचा फोटो पण पोस्ट केलाय. यात फोनचा कॅमेरा आणि वॉटर ड्रॉप नॉच शेप स्पष्टपणे दिसत आहे. म्हणजे या फोन मध्ये आपल्याला रेड मी नोट 7 सारखा नॉच बघायला मिळेल.

यापूर्वी कंपनीनं आणखी एक ट्विट करत टीज केलं होतं की, रेडमी वाय 3 या स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी असेल, जी संपूर्ण एक दिवस चालेल. बॅटरीच्या कॅपॅसिटीच्या बाबतीत तशी अधिक माहिती मिळाली नाहीय. पण शाओमीच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 4000 mAh ची बॅटरी असेल, अशी अपेक्षा आहे. याशिवाय फोनमध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा असेल की नाही याबाबतही माहिती नाही.

रेडमी वाय 3 स्मार्टफोनला नुकतंच वायफाय एलियांसवर स्पॉट केलं गेलं आहे. मात्र वायफाय सर्टिफिकेशनमध्ये स्मार्टफोनच्या कोणत्याच फीचरची माहिती समोर आली नाहीय. रिपोर्ट्स नुसार स्मार्टफोन अँड्रॉईड पाय वर आधारित मीयूआय 10 वर काम करेल. शाओमीनं नुकताच रेडमी नोट 7, रेडमी नोट 7 प्रो आणि रेडमी गो स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.

आता शाओमीच्या या नवीन रेडमी वाय 3 स्मार्टफोनची सर्व जण वाट बघत आहे. कारण यात असलेलं मेन सेल्फी कॅमेऱ्याचं फीचर हे मुख्य आकर्षण ठरणार असं दिसतंय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Xiaomi Redmi Y3: शाओमीचा नवा स्मार्टफोन कधी लॉन्च होणार, सांगतोय रणवीर सिंग! Description: Xiaomi Redmi Y3: शाओमीचा रेडमी वाय 3 हा नवीन स्मार्टफोन लवकरच लॉन्च होणार आहे. याची माहिती अभिनेता रणवीर सिंगनं ट्विटकरून दिली. रणवीरनं एक व्हिडिओ ट्विट केलाय. बघा काय म्हणतोय तो.
Loading...
Loading...
Loading...