Realme 3 Pro: १९ एप्रिलपासून सुरू होईल ‘ब्लाईंड ऑर्डर’, बुक करा स्मार्टफोन

फोना-फोनी
Updated Apr 18, 2019 | 16:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Realme 3 Pro: चीनी स्मार्टफोन कंपनी ओप्पोचा सब ब्रँड असलेल्या रियलमी आपला नवा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. रियलमी ३ प्रो २२ एप्रिलला लॉन्च होणार आहे. त्याअगोदर जाणून घ्या काय आहे ब्लाईंड ऑर्डर...

Realme 3 pro smartphone
रिअलमी ३ प्रो स्मार्टफोनचं ब्लाईंड ऑर्डर  |  फोटो सौजन्य: Twitter

नवी दिल्ली: रिअलमी आपला नवीन स्मार्टफोन रियलमी ३ प्रो २२ एप्रिलला लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनच्या फीचर्सबाबत कंपनी सतत ट्विटरवरून टीज करतेय. कंपनीनं स्मार्टफोनाच्या प्रीऑर्डर संदर्भात एक घोषणा केली आहे. कंपनीनं याला ब्लाईंड ऑर्डर असं नाव दिलं आहे. या सेलची सुरूवात १९ एप्रिलला होणार आहे. कंपनीनं आतापर्यंत स्मार्टफोनच्या फीचर्सबाबत कोणतीही माहिली लीक केलेली नाही. कदाचित हेच कारण आहे की, कंपनीनं आपल्या सेलला ब्लाईंड ऑर्डर हे नाव दिलं आहे.

आतापर्यंत ज्या काही गोष्टी समोर आल्या, त्यानुसार रियलमी ३ प्रो ची सरळ-सरळ रेडमी नोट ७ प्रो सोबत फाईट असेल. कंपनी रियलमी ३ प्रोमध्ये तसंच डिझाईन देऊ शकते, अशी आशा व्यक्त केली जात आहे की, जसं डिझाईन रियलमी ३ मध्ये दिलं गेलंय. काही रिपोर्ट्सनुसार स्मार्टफोन क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७१० प्रोसेसर सोबत लॉन्च होऊ शकतं. मिड रेंज स्मार्टफोनमध्ये कोणत्याही कंपनीनं अजूनपर्यंत या प्रोसेसरचा वापर केला नाहीय.

तर तिकडे शाओमीनं रेडमी नोट ७ प्रो स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६७५ प्रोसेसर दिला आहे. या प्रोसेसरच्या तुलनेत स्नॅपड्रॅगन ७१० प्रोसेसरमध्ये अधिक चांगले ग्राफिक परफॉर्मन्स मिळतात. रियलमी ३ प्रो स्मार्टफोनमध्ये आपल्याला ड्युअल कॅमेरा फीचर मिळेल. हा स्मार्टफोन ४८ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा देईल अशी आशा आहे. यासोबतच फोनमध्ये ओप्पोच्या व्हीओओसी चार्जिंग सपोर्ट असेल.

 

 

हा स्मार्टफोन आपण १९ एप्रिल रात्री १२ वाजेपासून रियलमी डॉट कॉमवरून ऑर्डर करू शकता. काही रिपोर्ट्सनुसार स्मार्टफोनमध्ये ६.३ इंचचा फुल एचडी डिस्प्ले मिळेल. फोनमध्ये रिअर फिंगरप्रिंट सेंसर आणि ३,९६० mAh ची बॅटरी मिळू शकते. हा फोन अँड्रॉईड पाय वर आधारित कलर ओएस ६.० वर काम करेल. कंपनीकडून मात्र या फीचर्सबाबत अद्याप काहीही सांगितलं गेलं नाहीय.

आता या स्मार्टफोनमध्ये खरंच कोणते फीचर्स आहेत हे १९ एप्रिलनंतरच कळेल. पण रेडमी नोट ७ प्रो सोबत टक्कर देणार असेल तर तसेच जबरदस्त फीचर्स आपल्याला या ही स्मार्टफोनमध्ये दिसतील, अशी अपेक्षा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Realme 3 Pro: १९ एप्रिलपासून सुरू होईल ‘ब्लाईंड ऑर्डर’, बुक करा स्मार्टफोन Description: Realme 3 Pro: चीनी स्मार्टफोन कंपनी ओप्पोचा सब ब्रँड असलेल्या रियलमी आपला नवा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. रियलमी ३ प्रो २२ एप्रिलला लॉन्च होणार आहे. त्याअगोदर जाणून घ्या काय आहे ब्लाईंड ऑर्डर...
Loading...
Loading...
Loading...