Realme C35 Launch In India: Realme C35 आज होणार लॉन्च, 5000mAh बॅटरीसोबत मिळणार 50MP कॅमेरा, जाणून घ्या किंमत

फोना-फोनी
Updated Mar 07, 2022 | 17:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

Realme C35 Launch | Realme आज म्हणजेच ७ मार्च रोजी भारतात नवीन बजेटमध्ये स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. हा ब्रँड बजेट सेगमेंटमध्ये Realme C35 स्मार्टफोन लॉन्च करेल, जो आकर्षक फिचर्ससह उपलब्ध असेल. बॉक्सी डिझाईन असलेला हा डिव्हाइस भारतापूर्वी थायलंडमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

Realme C35 will be launched in India today with a 5000mAh battery and a 50MP camera
Realme C35 आज भारतात होणार लॉन्च  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • Realme आज भारतात नवीन बजेटमध्ये स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.
  • बॉक्सी डिझाईन असलेला हा डिव्हाइस भारतापूर्वी थायलंडमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
  • हा हँडसेट Realme च्या अफोर्डेबल C-सीरीजचा भाग आहे.

Realme C35 Launch | नवी दिल्ली : Realme आज म्हणजेच ७ मार्च रोजी भारतात नवीन बजेटमध्ये स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. हा ब्रँड बजेट सेगमेंटमध्ये Realme C35 स्मार्टफोन लॉन्च करेल, जो आकर्षक फिचर्ससह उपलब्ध असेल. बॉक्सी डिझाईन असलेला हा डिव्हाइस भारतापूर्वी थायलंडमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा हँडसेट 5000mAh बॅटरी, 50MP AI कॅमेरासह उपलब्ध आहे. महत्त्वाचे म्हणजे हा हँडसेट Realme च्या अफोर्डेबल C-सीरीजचा भाग आहे. यात ऑक्टा-कोअर प्रोसेसर मिळेल. (Realme C35 will be launched in India today with a 5000mAh battery and a 50MP camera). 

अधिक वाचा : रिचा घोषने स्टंपामागून ५ फलंदाजांना पाठवले माघारी

Realme C35 Price In India

भारतात या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. तर थायलंडमध्ये हे डिव्हाइस दोनपेक्षा जास्त कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. त्याची 4GB RAM + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 5799 THB जवळपास 13,350 रूपये आहे. तर त्याच्या 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6299 THB (सुमारे 14,500 रुपये) आहे. कंपनीने या डिव्हाइसचा 6GB वेरिएंट देखील लिस्ट केला आहे. भारतात हा फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. त्याचे प्रक्षेपण दुपारी होणार आहे. 

अधिक वाचा : श्रीनगरमध्ये झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात आतापर्यंत २ जण ठार

Realme C35 Specifications 

हा फोन थायलंडमध्ये यापूर्वीच लॉन्च झाला आहे, त्यामुळे याच्या फिचर्सबद्दल सर्व माहिती समोर आली आहे. डुअल सिम सपोर्ट असलेला Realme C35 स्मार्टफोन Realme UI R Edition वर काम करतो, जो Android 11 वर आधारित आहे. यात ऑक्टा-कोर युनिसॉक T616 प्रोसेसर आहे. फोन 6 GB पर्यंत RAM सह येतो. 

ऑप्टिक्सबाबत भाष्य करायचे झाले तर हँडसेटमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याची मुख्य लेन्स 50 MP आहे. याशिवाय मॅक्रो लेन्स आणि पोर्ट्रेट कॅमेरा लेन्स देखील डिव्हाइसमध्ये उपलब्ध आहेत. सेल्फीसाठी कंपनीने यात  8MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 128 GB पर्यंत स्टोरेज मिळेल. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज एक टीबी पर्यंत वाढवता येते. फोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह येईल. डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी उपलब्ध असेल, जी 18 W चार्जिंगला सपोर्ट करेल. यात ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ, 3.5 मिमी ऑडिओ जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखी कनेक्टिव्हिटी फिचर्स असतील. तर डिव्हाइसचे वजन 189 ग्रॅम आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी