मुंबई: रिअलमी ने आपले दोन नवे स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. यामध्ये रिअलमी एक्स (Realme X) आणि रिअलमी 3i (Realme 3i) हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. रिअलमी एक्स या फोनची डिझाइन, लेटेस्ट इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट टेक्नोलॉजी, ट्रू फुल व्ह्यू देणारी टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर आणि 3765 mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच फोनमध्ये 20 VoLTE ची व्हीओसीसी 3.0 फ्लॅश चार्ज टेक्नोलॉजी देण्यात आली आहे.
यासोबतच प्रीमिअम फिचर्समध्ये सोनी आयएमएक्स 586, 48 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल सेंसरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यासोबतच 16 मेगापिक्सलसह फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. रिअलमी एक्स हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये 4GB रॅम, 128 GB रोम आणि 8GB रॅम, 128 GB रोम देण्यात आले आहेत. या दोन्ही फोन्सची किंमत क्रमश: 16,999 रुपये आणि 19,999 रुपये अशी ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन दोन रंगात - पोलर व्हाईट आणि स्पेस ब्ल्यू मध्ये उपलब्ध आहे.
रिअलमी एक्स दोन लिमिटेड एडिशनमध्ये उपलब्ध आहे. ज्यात रिअलमी एक्स स्पायडर मॅन एडिशन (एका स्पेशल गिफ्ट बॉक्स आणि कस्टमाईज्ड यूआयसह) 29,999 रुपयांत उपलब्ध आहे. तर रिअलमी एक्स मास्टर एडिशन 19,999 रुपयांत उपलब्ध आहे.
यासोबतच रिअलमीने आणखीन एक 'डिझाइन रिफाईंड' बजेट स्मार्टफोन रिअलमी 3i लॉन्च केला आहे. मीडियाटेक हीलियो P60 आणि 4230 mAh बॅटरीसह हा स्मार्टफोन दमदार परफॉर्मन्स आणि चांगली बॅटरी लाइफ देतो.
रिअलमी 3i स्मार्टफोनचा 3GB रॅम आणि 32GB रोम असलेल्या व्हेरिएंटची किंमत 7,999 रुपये आहे. तर, 4GB रॅम आणि 64GB रोम व्हेरिएंट असलेल्या स्मार्टफोनची किंमत 9999 रुपये इतकी आहे. रिअलमी एक्स या स्मार्टफोनचा पहिला सेल रिअलमी डॉट इन तसेच फ्लिपकार्टवर 24 जुलै रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. मात्र, जर तुम्हाला त्याआधी हा फोन खरेदी करायचा असेल तर रिअलमी एक्स रिअलमी डॉट इन आणि फ्लिपकार्ट वरुन 18जुलैच्या रात्री 8 वाजल्यापासून खरेदी करु शकता.