Realme X2 Pre Booking: केवळ १००० रुपये देऊन लॉन्चिंगपूर्वी बूक करू शकतात Realme X2 स्मार्ट फोन 

फोना-फोनी
Updated Dec 12, 2019 | 19:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Realme X2 Pre Booking: रिअलमी कंपनी आपल्या नवा स्मार्टफोन रिअलमी एक्स २ या महिन्याच्या १७ तारखेला लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगपूर्वी केवळ १००० रुपये देऊन याला फोनला बूक करता येणार आहे. 

realme x2 pre booking here how to book before launch technology news in marathi google news
Realme X2 Pre Booking: केवळ १००० रुपये देऊन लॉन्चिंगपूर्वी बूक करू शकतात Realme X2 स्मार्ट फोन  

नवी दिल्ली :  रिअलमीने आपल्या नवा स्मार्टफोन रिअलमी एक्स २ भारतात १७ डिसेंबरला लॉन्च करण्याची संपूर्ण तयारी केली आहे. लॉन्चिंगपूर्वी या कंपनीच्या स्मार्टफोनमध्ये रुची दाखविणाऱ्या ग्राहकांना या फोनला ऑर्डर करण्याची संधी मिळाली आहे. रिअलमी यासाठी एक बुस्टर सेल आयोजित केला आहे. जी वास्तवतेत कंपनीची एक ब्लाइंड ऑर्डर असणार आहे. 

या सेलमध्ये रिअलमी फॅन्स आणि ग्राहकांना रिअलमी एक्स २ स्मार्टफोन प्री ऑर्डरने मिळविण्याची संधी मिळणार आहे. ग्राहक, १० डिसेंबर ते १६ डिसेंबर दरम्यान कंपनीच्या वेबसाइटवर रजिस्टर करून या स्मार्टफोनची प्री ऑर्डर देऊ शकणार आहेत. 

रिअलमीच्या वेबसाईटवर सध्या असलेल्या माहितीनुसार ग्राहक हे डिव्हाइस केवळ १००० रुपये प्री बुकिंगने बुक करू शकणार आहेत. यानंतर या संबंधीत ग्राहकांना १७ डिसेंबर ते २४ डिसेंबर यांच्यात दरम्यान स्मार्टफोनची संपूर्ण किंमत द्यावी लागणार आहे. १७ डिसेंबरला हा फोन लॉन्च होणार आहे. या दिवशी याची खरी किंमत जाहीर होणार आहे. 

स्मार्टफोनला प्री ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना ५०० रुपयांची अतिरिक्त सूट मिळणार आहे. हे प्रोडक्टचे १७ डिसेंबरपासून डिस्पॅच होणार आहे. हा फोन यापूर्वी चीनमध्ये लॉन्च झाला आहे. 

Realme X2 चे फीचर (चीनी व्हेरिअंट)

रिअलमी एक्स २ स्मार्टफोनचा ६.४ इंचचा फूल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले आहे.  जो गोरिल्ला ग्लास ५ प्रोटेक्शनसोबत आहे. हा स्मार्ट फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७३० जी वर काम करत आहे. यात ८ जीबी रॅम आहे तर १२८ जीबीपर्यंत स्टोरेजचा पर्याय आहे. 

डिव्हाइसमध्ये चार रिअर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. ज्यात मुख्य कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा आहे. फोन ८ मेगा पिक्सल अल्ट्रा वॉइड एंगल कॅमेरा, २ मेगापिक्सल डेप्थ सेंसर आणि २ मेगापिक्सल मायक्रोल लेन्स देण्यात आला आहे. फोनमध्ये ३२ मेगापिक्सचा सेल्फी कॅमेरा आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी