शाओमीने लॉन्च केला Redmi 8 A dual हा बजेट स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत

फोना-फोनी
Updated Feb 11, 2020 | 19:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

शाओमीचा सब ब्रॅंड रेडमीने आपला बजेटमधील Redmi 8A dual हा स्मार्टफोन आज लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन 8A चे आधुनिक मॉडेल आहे. या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेऱ्यासह आणला आहे.

Redmi 8A dual: Xiomi redmi 8Adual smartphone launched in India
शाओमीने लॉन्च केला Redmi 8 A dual हा बजेट स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • शाओमीचा सब ब्रॅंड रेडमीने आपला बजेटमधील Redmi 8A dual हा स्मार्टफोन आज लॉन्च केला आहे.
  • या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेऱ्यासह आणला आहे.
  • व्हेरियंट सी ब्लू, स्काय व्हाईट आणि मिडनाइट ग्रे अशा तीन रंगांचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध आहे.

नवी दिल्ली: शाओमीचा सब ब्रॅंड रेडमीने आपला बजेटमधील Redmi 8A dual हा स्मार्टफोन आज लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन 8A चे आधुनिक मॉडेल आहे. या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेऱ्यासह आणला आहे. या फोनची किंमत ६ हजार ४९९ रूपये एवढी आहे. हा या सेगमेंटमधील पहिला स्मार्टफोन आहे. ज्यात यूएसबी टाइप सी पोर्ट, फास्ट चार्जिंग आणि गोरिला ग्लासचे प्रोटेक्शन यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. हा फोन तीन रंगात उपलब्ध करण्यात आला आहे. व्हेरियंट सी ब्लू, स्काय व्हाईट आणि मिडनाइट ग्रे अशा तीन रंगांचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध आहे. कंपनीने फोनसोबत एक पॉवरबॅंकसुद्धा लॉन्च केली आहे.  

हा स्मार्टफोन दोन पर्यायात उपलब्ध करण्यात आला आहे. २ जीबी रॅम आणि ३ जीबी रॅम असे दोन पर्याय आहेत. २ जीबी रॅमच्या फोनची किंमत ६ हजार ४९९ इतकी आहे. तसेच ३ जीबी रॅम फोनची किंमत ६ हजार ९९९ रूपये इतकी आहे. फोनची विक्री कंपनीच्या अधिकृत वेबसाइट Mi.com आणि ऑनलाईन पार्टनर अॅमेझॉन इंडियावरून होणार आहे. या फोनचा पहिला सेल १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे.

या फोनमध्ये ६.२२ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. वॉटरड्रॉप नॉचसह तो उपलब्ध आहे. फोनमध्ये २ जीएचझेड क्वॉलकॉम ४३९ प्रोसेसर दिला आहे. २ जीबी रॅम आणि ३ जीबी रॅमच्या फोनमधअये ३२ जीबीचा स्टोरेज मिळणार आहे. तसेच यात व्हीओवायफाय हे एक फीचर देण्यात आले आहे. फोटोग्राफीसाठी यात दोन रियर कॅमेरे दिले आहेत. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर दिला आहे. रियर कॅमेऱ्यात एआय सीन डिटेक्शन आणि एआय पोर्ट्रेट मोड दिलेला आहे. याचा सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा असेल. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. तसेच १८ वॅटचा फास्ट चार्जर दिलेला आहे. तसेच यात रिव्हर्स चार्जिंगचे फीचरही देण्यात आले आहे.

स्मार्टफोनसह कंपनीने दोन रेडमी पॉवर बॅंक आज लॉन्च केली आहे. १०,००० एमएएच आणि २०,००० एमएएच क्षमतेचे दोन पॉवर बॅंक आहेत. यात ड्युअल इनपुट आणि ड्युअल इनपुटचा सपोर्ट दिला आहे. १०,००० एमएएचच्या पॉवर बॅंकमध्ये १० वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. तर २०,००० एमएएच क्षमतेच्या पॉवर बॅंकमध्ये १८ वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळणार आहे. छोट्या पॉवर बॅंकची किंमत ७९९ रूपये तर मोठ्या पॉवर बॅंकची किंमत १४९९ रूपये ठेवण्यात आली आहे.   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी