शाओमीचा रेडमी K20 Pro बंद होणार, काय आहे कारण...

फोना-फोनी
Updated Feb 10, 2020 | 16:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

शाओमीचा Redmi K20 Pro या फोनचे उत्पादन बंद केले जाणार असल्याची घोषणा शाओमीचे उपाध्यक्ष आणि रेडमी ब्रॅंडचे जनरल मॅनेजर लू विबिंग यांनी केली आहे. या फोनला लॉन्च करून वर्ष उलटत नाही तोवर कंपनीने हा निर्णय घेतला.

redmi k20 pro will be discontinued this month says Xiomis lu weibing
शाओमीचा रेडमी K20 Pro बंद होणार, काय आहे कारण...  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • कंपनीने केवळ Redmi K30 फोन लॉन्च केला. कारण Redmi K30 फोन लॉन्च होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता.
  • शाओमीचा Redmi K20 Pro या फोनचे उत्पादन बंद केले जाणार असल्याची घोषणा शाओमीचे उपाध्यक्ष आणि रेडमी ब्रॅंडचे जनरल मॅनेजर लू विबिंग यांनी केली आहे.
  • जगभरात Redmi K20 Proचे ५० लाखांहून अधिक जास्त युनिट उपलब्ध करण्यात आलेले आहेत.

नवी दिल्ली: शाओमीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये धक्कातंत्र वापरल्याने अनेक जण संभ्रामावस्थेत आहेत. कंपनीने केवळ Redmi K30 फोन लॉन्च केला. कारण Redmi K30 फोन लॉन्च होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र कंपनीने एकच फोन लॉन्च केला. त्यामुळे शाओमीचा Redmi K20 Pro या फोनचे उत्पादन बंद केले जाणार असल्याची घोषणा शाओमीचे उपाध्यक्ष आणि रेडमी ब्रॅंडचे जनरल मॅनेजर लू विबिंग यांनी केली आहे. या फोनला लॉन्च करून वर्ष उलटत नाही तोवर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

लूविबिंग यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे, जगभरात Redmi K20 Proचे ५० लाखांहून अधिक जास्त युनिट उपलब्ध करण्यात आलेले आहेत. मात्र, फेब्रुवारी २०२०मध्ये या फोनचे उत्पादन बंद करण्यात येणार आहे. रेडमी के२० प्रो ला गेल्या वर्षी मे महिन्यात चीनमध्ये लॉन्च करण्यात आले होते. म्हणजेच फोनला वर्ष पूर्ण होण्यास अजून तीन महिने बाकी आहेत. विशेष म्हणजे लू विबिंग यांनी आपल्या पोस्टमध्ये हे स्पष्ट केले नाही की, रेडमी के२० प्रो हा फोन केवळ चीनमधून हटवण्याचा निर्णय घेतला आहे की भारतातूनही हा फोन बाद करण्यात येणार आहे. यासंबंधी शाओमी इंडियाला विचारले असता शाओमीच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, रेडमी के२० सीरिजचे फोन भारतात सध्या तरी विकले जातील. कारण भारतात रेडमीची नंबर वन सीरिज आहे.

रेडमी के२ प्रो चे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला म्हणजे कंपनी लवकरच रेडमी के३० प्रो लॉन्च करण्याच्या तयारीत आहे असा अंदाज वर्तवला जात आहे. एका रिपोर्टनुसार, शाओमी आपला रेडमी के३० प्रो ला मार्च महिन्यात लॉन्च करू शकते. गीकबेंच लिस्टिंगच्या माहितीनुसार, रेडमी के३० प्रो मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर आणि ८ जीबी रॅम असणार आहे. रेडमीच्या या फोनमध्ये चार रियर कॅमेरे असणार असून त्यातील एक ६४ मेगापिक्सलचा Sony IMX686 सेन्सर देण्यात येणार आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी