रेडमी नोट 9 प्रो, नोट 9 प्रो मॅक्स भारतात लॉन्च, जाणून घ्या फिचर 

चीनी स्मार्टफोन बनवणारी कंपनी शाओमीनं रेडमी नोट सीरिजचा 9 वा जेनरेशनचा स्मार्टफोन नोट 9 प्रो मॅक्स आणि नोट 9 प्रो लॉन्च केला.

Redmi Note 9 Pro Max
रेडमी नोट 9 प्रो, नोट 9 प्रो मॅक्स भारतात लॉन्च, जाणून घ्या फिचर  

थोडं पण कामाचं

 • शाओमीनं भारतात आपला रेडमी नोट 9 सीरिज लॉन्च केला.
 • रेडमी 8 लाइनअप सारखा, यावेळी कंपनीनं तीन डिव्हाईस लॉन्च केले.
 • या फोनच्या आउरा डिझाइन, प्रो कॅमेरा आणि मॅक्स परफॉर्मेन्सचं नक्की कौतुक होईल.

मुंबईः शाओमीनं भारतात आपला रेडमी नोट 9 सीरिज लॉन्च केला. रेडमी 8 लाइनअप सारखा, यावेळी कंपनीनं तीन डिव्हाईस लॉन्च केले. ज्यात रेडमी नोट 9 प्रो मॅक्स (Redmi Note 9 Pro Max),रेडमी नोट 9 (Redmi Note 9) आणि रेडमी नोट 9 प्रो (Redmi Note 9 Pro) समावेश आहे. 

शाओमी इंडियाचे मुख्य मार्केटिंग अधिकारी अनुज शर्मानं यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, रेडमी नोट प्रो सीरिज एमआय फॅन्ससाठी बनवण्यात आला आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की या फोनच्या आउरा डिझाइन, प्रो कॅमेरा आणि मॅक्स परफॉर्मेन्सचं नक्की कौतुक करतील. 

रेडमी नोट 9 प्रो मॅक्सची ही आहेत वैशिष्ट्ये 

 • तीन स्टोरेज व्हेरिएंट लॉन्च केला आहे.
 • हा स्मार्टफोन 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले
 • तीन कलर व्हेरिएंट- इंटरस्टेलर ब्लॅक, आउरा ब्ल्यू आणि ग्लेसियर व्हाइट
 • फोन 6 जीबी- 64 जीबी, 6 जीबी- 128 जीबी आणि 8 जीबी-128 जीबी व्हेरिएंटमध्ये मिळेल. 
 • स्क्रीन रिज्योल्यूशन 2400 x 1080 पिक्सल आहे.
 • ट्रिपल कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 नं लेस आहे. 
 • एड्रेनो 618 जीपीयू सुद्धा आहे.
 • रेडमी नोट 9 प्रो मॅक्समध्ये क्वॉड कॅमेरा सेटिंग
 • 64 एमपी प्रायमरी लेस, 8 एमपी अल्ट्रा वाइड एंगल लेंस
 • 5 एमबी मायक्रो सेंसर आणि 2 एमपी डेप्थ सेंसर
 • फ्रंटमध्ये यात 32 एमपी इन डिस्प्ले सेल्फी शूटर
 • अत्याधुनिक क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720 जी प्रोसेसर आहे.
 • या व्हेरिएंटची किंमत 14,999, 16,999 आणि 18,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 
 • हा फोन मी डॉट कॉम, अॅमेझॉन इंडिया, मी होम्स आणि मी स्टूडिओजमध्ये 25 मार्चपासून उपलब्ध होईल. 

रेडमी नोट 9 प्रोचे फिचर 

 • दोन स्टोरेज व्हेरिएंट लॉन्च केलेत. 
 • हा स्मार्टफोन 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले
 • इंटरस्टेलर ब्लॅक, आउरा ब्ल्यू आणि ग्लेसियर व्हाइटमध्ये उपलब्ध होईल.
 • हा फोन 4 जीबी-64 जीबी, 6जीबी-128 जीबी व्हेरिएंटमध्ये मिळेल. 
 • स्क्रीन रिज्योल्यूशन 2400X1080 पिक्सल आहे.
 • ट्रिपल कॉर्निग गोरिल्ला ग्लास 5 लेस आहे. 
 • एड्रेनो 618 जीपीयू
 • क्वॉड- कॅमेरा सेटिंग
 • 48 एमपी प्रायमरी लेंस, 8एमपी अल्ट्रा वाइड एंगल लेंस
 • 5एमबी मायक्रो सेंसर आणि 2MP डेप्थ सेंसर
 • फ्रंटमध्ये यात सुद्धा 32 MP इन डिस्प्ले सेल्फी शूटर
 • अत्याधुनिक क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720 जी प्रोसेसर आहे.
 • याची किंमत 12,999 आणि 15,999 रुपये असेल.
 • याची विक्री मी डॉट कॉम, अॅमेझॉन इंडिया, मी होम्स आणि मी स्टूडिओजमध्ये 17 पासून सुरु होईल. 

दोन्ही स्मार्टफोन लवकरच सर्व ऑफलाइन पार्टनर स्टोर्सवर उपलब्ध होतील. दोन्ही स्मार्टफोन अॅन्ड्रॉईड 10 वर एमआययूआय 11 च्या मदतीनं चालतील. दोन्ही फोनमध्ये 5020 एमएएचची बॅटरी आहे आणि मॅक्स 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत येईल. तर नोट 9 प्रोसोबत 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी