Jio Recharge: जिओचा धमाकेदार Recharge Plan, वर्षभरासाठी मिळवा अनलिमिटेड डेटा आणि फोन कॉल्स

Reliance Jio Prepaid Recharge plan: रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त असा प्रिपेड प्लान लॉन्च केला आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जिओ ग्राहसांकाठी महत्त्वाची बातमी
  • आता एका रिचार्जमध्ये मिळवा वर्षभरासाठी अनलिमिटेड डेटा अन् फोन कॉल्स
  • जाणून घ्या या खास रिचार्सबद्दल

Jio Recharge plan: रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कंपनीने आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी एक मस्त आणि जबरदस्त प्लान आणला आहे. जिओने आपल्या रिचार्ज प्लानमध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे आता तुम्ही एक हजाराहून कमी किमतीच्या रिचार्ज प्लानमध्ये वर्षभर काम चालवू शकणार आहात. होय... कारण, तुम्ही 899 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये कंपनीने ही खास सुविधा दिली आहे. (Reliance jio 899 rupees plan offers unlimited data and calling for a year read in marathi)

जिओ 899 प्रिपेड रिचार्ज प्लानची वैधता 336 दिवसांची आहे आणि यामध्ये 28 दिवसांची एकूण 12 सायकल्स असतात. 28 दिवसांसाठी तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगसोबतच अनेक सुविधा मिळणार आहेत. यामध्ये रिचार्ज प्लान संपल्यावर आपोआप पुन्हा रिचार्ज होईल. त्यानंतर पुन्हा 28 दिवसांसाठी तुम्हाला 2GB डेटा मिळणार आहे. 12 महिन्यांत तुम्हाला एकूण 24GB डेटा दिला जाणार आहे.

हे पण वाचा : सोन्यापेक्षाही महाग आहेत हे धातू, किंमत ऐकून चक्रावून जाल​

एसएमएसचं बोलायचं झालं तर तुम्हाला खूपच फायदा मिळणार आहे. या रिचार्जमध्ये तुम्हाला 50 SMS मिळणार आहेत. याची वॅलिडिटी 28 दिवसांची असणार आहे. हा प्लान जिओच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या लिस्टमध्ये आहे. हा प्लान केवळ जिओ फोन युजर्स (Jio Phone users) साठीच उपलब्ध आहे. जर तुम्ही Jio Phone वापरत नाहीयेत आणि दुसऱ्या फोनचा वापर करत आहात तर मग तुम्हाला हा रिचार्ज करण्याची आवश्यकता नाहीये.

हे पण वाचा : सोफीच्या हॉट आणि बोल्ड फोटोने वाढवलं इंटरनेटचं तापमान​

Jio चा 155 रुपयांचा प्रिपेड प्लान हा सुद्धा भरपूर प्रमाणात विक्री होणारा एक प्लान आहे. या रिचार्जचा तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. या प्लानची वॅलिडिटी सुद्धा 28 दिवसांची आहे. या प्लानमध्ये तुम्हाला 2GB डेटा मिळणार आहे. तसेच अनलिमिटेड कॉलिंग्सची सुविधा सुद्धा दिली जाणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी