Reliance Jio: नववर्षात रिलायन्स जिओचं ग्राहकांना मोठं गिफ्ट, १ जानेवारीपासून सर्व नेटवर्कवर कॉलिंग Free

Reliance Jio unlimited free calling: रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी नववर्षाचं एक मोठं गिफ्ट दिलं आहे. नवीन वर्षापासून जिओ वरुन इतर कुठल्याही नेटवर्कवर अनलिमेटेड कॉल्स करता येणार आहेत.

Reliance Jio
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • रिलायन्स जिओचा नवा धमाका
  • रिलायन्स जिओच्या ग्राहकांना १ जानेवारी २०२१ पासून भारतात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल्स करता येणार

टेलिकॉम ऑपरेटर कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio)ने आपल्या ग्राहकांना नवीन वर्षाचं गिफ्ट (New Year Gift) दिलं आहे. रिलायन्स जिओचे ग्राहक आता देशभरात इतर कुठल्याही नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉल्स (unlimited calling to any network in country) करु शकतात. ही सुविधा १ जानेवारी २०२१ पासून लागू होणार आहे. यामुळे इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी कोणत्याही प्रकारचे इंटरकनेक्ट यूसेज चार्ज (IUC) आता द्यावे लागणार नाहीये. ट्राय (TRAI)च्या निर्देशांनंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी वेगळं रिचार्ज करावं लागणार नाही

ऑक्टोबर २०१९ पासून रिलायन्स जिओच्या ग्राहकांना इतर नेटवर्कवर कॉल्स करण्यासाठी ठराविक फ्री मिनिट्स देण्यात येत होते. हे फ्री मिनिट्स संपल्यानंतर ग्राहकांना इतर नेटवर्कवर कॉल्स करण्यासाठी IUC रिचार्ज करावे लागत होते. मात्र, आता रिलायन्स जिओने १ जानेवारी २०२१ पासून सर्व नेवटर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्याचं जाहीर केलं आहे.

ऑन-नेट डोमेस्टिक कॉल्स अद्यापही फ्री 

कंपनीने स्पष्ट केलं आहे की, ऑन-नेट डोमेस्टिक कॉल्स जिओ नेटवर्कवर अद्यापही फ्री आहे. कंपनीने म्हटलं की, 'VoLTE सारख्या अॅडव्हान्स टेक्नोलॉजीचा लाभ सामान्य भारतीय नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रिसायन्स जिओ वचनबद्ध आहे.'

रिलायन्स जिओच्या ग्राहकांत वाढ

रिलायन्स जिओने ऑक्टोबर महिन्यात एकूण २२ लाखांहून अधिक नवीन मोबाइल ग्राहक जोडले आहेत. यामुळे रिलायन्स जिओच्या एकूण ग्राहकांची संख्या आता ४०.६३ कोटी इतकी झाली आहे. जिओने वायरलेस सेग्मेंटमध्ये सर्वाधिक म्हणजेच २,४५,९१२ ग्राहक जोडले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी