Reliance Jio | रिलायन्स जिओच्या मोबाइल सेवेत २१ टक्के दरवाढ, १ डिसेंबरपासून लागू

Reliance Jio | पुढील महिन्यापासून म्हणजे १ डिसेंबरपासून जिओचे वाढीव दर लागू होणार आहेत. जिओच्या मोबाइल शुल्कांमध्ये जरी वाढ होणार असली तरी जिओने एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाच्या तुलनेत मोबाइल शुल्क कमीच ठेवले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या कंपन्यांमध्ये शुल्कावर आधारित स्पर्धा होणार आहे.

Reliance Jio mobile services tariffs
जिओच्या प्लॅनच्या किंमतीत वाढ 
थोडं पण कामाचं
  • रिलायन्स जिओकडून आपल्या मोबाइल शुल्कात वाढ
  • जिओचे वाढीवर दर १ डिसेंबरपासून लागू होणार
  • याआधी एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने केली होती दरवाढ

Reliance Jio | नवी दिल्ली : भारती एअरटेल (Bharti Airtel) आणि व्होडाफोन आयडियानंतर (Vodafone Idea)आता रिलायन्स जिओदेखील (Reliance Jio) आपल्या मोबाइल सेवांच्या शुल्कात वाढ करण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स जिओच्या मोबाइल सेवा शुल्कांमध्ये (mobile services tariffs) २१ टक्क्यांपर्यतची वाढ होणार आहे. पुढील महिन्यापासून म्हणजे १ डिसेंबरपासून जिओचे वाढीव दर (Jio hikes mobile services tariffs) लागू होणार आहेत. जिओच्या मोबाइल शुल्कांमध्ये जरी वाढ होणार असली तरी जिओने एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाच्या तुलनेत मोबाइल शुल्क कमीच ठेवले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या कंपन्यांमध्ये शुल्कावर आधारित स्पर्धा होणार आहे. अर्थात या तिन्ही कंपन्यांनी केलेल्या दरवाढीमुळे ग्राहकांना मात्र फटका बसणार आहे. (Reliance Jio announced 21 % hike in mobile services tariffs)

रिलायन्स जिओचे प्लॅन

रिलायन्स जिओकडे अद्यापदेखील सर्वात कमी किंमतीचा २८ दिवस व्हॅलिडिटी असलेला ९१ रुपयांचा प्लॅन आहे. तर भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने २८ दिवसांच्या व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅनची किंमत ९९ रुपये केली आहे. जिओफोन प्लॅन, अनलिमिटेड प्लॅन आणि इतर प्लॅनच्या शुल्कात १९.६ टक्के तर २१.३ टक्क्यांपर्यत वाढ होणार आहे. जिओ आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देत जगभरातील सर्वात स्वस्त मोबाइल सेवा पुरवणे सुरूच ठेवणार असल्याचे जिओकडून सांगण्यात आले आहे.

अनिलिमिटेड प्लॅन

जिओकडून १५ प्लॅनच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. अनलिमिटेड प्लॅन श्रेणींमध्ये जिओने शुल्कात वाढ करत ते १२९ रुपयांवरून १५५ रुपयांवर नेले आहे. तर ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा अनिलिमिटेड प्लॅन आता ३२९ रुपयांऐवजी ३९५ रुपयांना मिळणार आहे. याशिवाय १.५ जीबी दररोज डेटा मिळणारा ८४ दिवसांचा प्लॅन आता २० टक्के अधिक शुल्कासह ५५५ रुपयांऐवजी ६६६ रुपयांना मिळणार आहे. याशइवाय २ जीबी डेटा असणारा प्लॅन आता २,३९९ रुपयांऐवजी २,८७९ रुपयांना मिळणार आहे.

एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि जिओमधील स्पर्धा

दूरसंचार क्षेत्रातील नेमके चित्र स्पष्ट होण्यासाठी जिओ जेव्हा आपल्या सर्व प्लॅनची दरवाढ जाहीर करेल तेव्हा करता येणार आहे असे मत दूरसंचार क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांनी प्रत्येक ग्राहकामागे सरासरी महसूल राखण्याचा प्रयत्न केला आहे. या कंपन्यांनी प्रत्येक ग्राहकामागे सरासरी २०० ते ३०० रुपये दर महा महसूल आकारण्याचे धोरण ठेवले आहे. मात्र अर्थातच जिओच्या स्पर्धेमुळे या कंपन्यांना जास्त दरवाढ करता आलेली नाही. 

रिलायन्स जिओने ग्राहकांना स्वस्त दरात विविध प्लॅन देण्याचे धोरण ठेवल्यामुळे भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांच्यावरील दबाव कायम राहिला आहे. त्यामुळे एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांना आपले धोरण ठरवताना जिओचा विचार करावा लागतो आहे. आगामी काळात ५ जी सेवा आल्यानंतर ही स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी