Prepaid Plan | रिलायन्स जिओने परत आणला ४९९ रुपयांचा प्लॅन, वाढवली हॅप्पी न्यू ऑफर !

Reliance Jio : रिलायन्स जिओ आणि इतर खासगी दूरसंचार कंपन्यांकडून मागील काही आठवड्यापूर्वी अनेक प्लॅन्सच्या किंमतीत वाढ करण्यात आली. यामुळे काही लोकप्रिय प्लन्स बंद करण्यात आले किंवा त्यातील काही लाभ कमी करत सुरू ठेवण्यात आले. आज रिलायन्स जिओने त्यांचा लोकप्रिय ४९९ रुपयांचा प्लॅन पुन्हा बाजारात आणला. मात्र या प्लॅनमध्ये २ जीबी दररोज डेटा आणि Disney+ Hotstar या सुविधा मिळणार आहे.

jio happy new year offer
जिओ हॅप्पी न्यू इयर ऑफर 
थोडं पण कामाचं
  • जिओचा ४९९ रुपयांचा प्लॅन
  • या प्लॅनमध्ये आहे जबरदस्त सुविधा
  • हा ४९९ रुपयांचा प्लॅन Disney+ Hotstar च्या सब्सिक्रिप्शनसह येतो

Reliance Jio Prepaid Plan | नवी दिल्ली : रिलायन्स जिओ आणि इतर खासगी दूरसंचार कंपन्यांकडून मागील काही आठवड्यापूर्वी अनेक प्लॅन्सच्या किंमतीत वाढ करण्यात आली. यामुळे काही लोकप्रिय प्लन्स बंद करण्यात आले किंवा त्यातील काही लाभ कमी करत सुरू ठेवण्यात आले. आज रिलायन्स जिओने त्यांचा लोकप्रिय ४९९ रुपयांचा प्लॅन पुन्हा बाजारात आणला. मात्र या प्लॅनमध्ये २ जीबी दररोज डेटा आणि Disney+ Hotstar या सुविधा मिळणार आहे. या लोकप्रिय ४९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची माहिती जाणून घेऊया. (Reliance Jio brings back Rs 499 prepaid plan)

जिओ ४९९ रुपयांचा प्लॅन- फायदे आणि व्हॅलिडिटी

जिओचा ४९९ रुपयांचा प्लॅन दररोज २ जीबी डेटा देतो. लिमिट संपल्यानंतर ग्राहकांना पुढील डेटा ६४ केबीपीएस स्पीडसह मिळतो. हा प्लॅन २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. त्याचबरोबर जिओ ते जिओ आणि जिओ ते इतर कंपन्या यांच्यात व्हॉइस कॉलिंग आणि त्यासह १०० एसएमएस दररोज आणि जिओ प्राइम मेंबरशिप देखील मिळते. हा ४९९ रुपयांचा प्लॅन Disney+ Hotstar च्या सब्सिक्रिप्शनसह येतो. एक वर्षासाठीची ही सुविधा मिळते. याशिवाय जिओ अॅप्सच्या सुविधा मिळतात. यात जिओसिनेमा आणि जिओटीव्ही हे अॅप्स आहेत.

जिओने हॅप्पी न्यू इयर ऑफरचा कालावधी वाढवला

रिलायन्स जिओने नव्या हॅप्पी न्यी इयर प्लॅन ऑफरचा कालावधी वाढवला आहे. हा वार्षिक प्लॅन २,५४५ रुपयांचा आहे. आधी ही ऑफर २ जानेवारी पर्यतच उपलब्ध होती. आता ही ऑफर ७ जानेवारी पर्यत असणार आहे. ग्राहक रिचार्ज करून यात अतिरिक्त फायदे मिळवू शकतात. हा २,५४५ रुपयांचा प्लॅन अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएस दररोज आणि १.५ जीबी डेली डेटा इत्यादी सुविधांसह ३३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीवर मिळतो. नवा हॅप्पी न्यू इयर प्लॅन २९ दिवसांची अतिरिक्त व्हॅलिडिटी देतो. त्यामुळे त्याचा वापर ३३६ दिवसांऐवजी ३६५ दिवसांपर्यत करता येतो.

 मागील महिन्यात मोबाइल बिलातील (Mobile bill hike)वाढीमुळे आधीच त्रस्त असणाऱ्या ग्राहकांना आगामी काळात यातून दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. २०२२ मध्ये देखील मोबाइल सेवा शुल्कांमध्ये (Mobile tariff hike)वाढ सुरूच राहण्याची चिन्हे आहेत. मोबाइल सेवांच्या पॅकचे शुल्क पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यातच जिओ (Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन आयडियाने (Vodafone Idea) आपल्या सेवांच्या शुल्कात २० ते २५ टक्के वाढ केली होती. याआधी पहिल्या वर्षी २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे किंमतीत वाढ झाली नव्हती. आता २०२२ मध्ये प्रीपेड मोबाइल सेवांच्या शुल्कात पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत.

प्रीपेड मोबाइल शुल्क वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. यात टेलीकॉम कंपन्यांनी आपला एआरपीयु वाढण्याची इच्छा, एआरपीयु म्हणजे प्रति ग्राहक सरासरी महसूल, छोट्या कालावधीत महसूल वाढवून प्रति ग्राहक २०० रुपयांपर्यत नेण्याचे उद्दिष्ट, मध्यम कालावधीत महसूल प्रति ग्राहक ३०० रुपयांपर्यत नेण्याचे उद्दिष्ट, नेटवर्क, स्पेक्ट्रमचा खर्च, ५ जी नेटवर्क, स्पेक्ट्रमचा खर्च यासारखे घटक आहेत. २०१७-२१ या कालावधीत ५जी सेवांचे नेटवर्क उभारण्यात ५ लाख कोटी रुपये खर्च झाले आहेत. टेलीकॉम कंपन्यांना स्पेक्ट्रमसाठी सरकारला द्यावे लागत असलेले शुल्क याचाही परिणाम आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी