Jio 5G: जिओने सुरू केली 5G लॉन्च करण्याची तयारी, खरेदी केला 57 हजार कोटींचा स्पेक्ट्रम

Reliance Jio 5G: रिलायन्स जिओने स्पेक्ट्रम खरेदी केलं असून त्याचा उपयोग 5G सेवा देण्यासाठी केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Reliance Jio buys 4G spectrum of rs 57 crore to 5G rollout
प्रातिनिधीक फोटो 

नवी दिल्ली : दोन दिवस चाललेल्या दूरसंचार विभागाचा स्पेक्ट्रम लिलाव मंगळवारी समाप्त झाला. या लिलावात रिलायन्स जिओ (Reliance Jio)ने 22 सर्कल्समध्ये स्पेक्ट्रम खरेदी केला आहे. रिलायन्स जिओने खरेदी केलेल्या या स्पेक्ट्रमची किंमत 57123 कोटी रुपये इतकी आहे. या स्पेक्ट्रम खरेदीमुळे आता रिलायन्स जिओकडे एकूण 1717 मेगाहर्ट्ज (अपलिंक + डाऊनलिंक) होईल जो पूर्वीच्या तुलनेत 55 टक्के अधिक आहे. स्पेक्ट्रम खरेदीमुळे रिलायन्स जिओला आणखी बळ मिळणार आहे.

रिलायन्स जिओने अलीकडेच जाहीर केले की, त्यांनी स्वदेशी 5G तंत्रज्ञान विकसित केले आहे ज्याची चाचणी अमेरिकेत झाली आहे. रिलायन्सचे मालक मुकेश अंबानी यांनी यंदा 5G लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी म्हणाले, "रिलायन्स जिओने भारतात डिजिटल क्रांती घडवून आणली आहे. आम्ही हे सुनिश्चित करू इच्छित आहोत की, आम्ही आमच्या विद्यमान ग्राहकांसह डिजिटल सेवांसह कनेक्ट होणाऱ्या 300 कोटी युजर्सला उत्तम डिजिटल अनुभव प्रदान करु शकतो. आम्ही भारतात डिजिटल फुटप्रिंट अधिक विस्तारपणे देण्यासाठी तयार आहोत आणि यासोबतच 5G रोलआऊट करण्यासाठी स्वत:ला तयार करत आहोत."

57,123 कोटी रुपयांत स्पेक्ट्रम खरेदी

रिलायन्स जिओने दोन दिवसांच्या लिलावात स्पेक्ट्रम 50 टक्क्यांहून अधिक स्पेक्ट्रम 57,123 कोटी रुपयांत खरेदी केलं आहे. यामुळे कंपनीच्या मोबाइल कॉल आणि डेटा सिग्न सेवेसाठी अतिरिक्त संसाधन उपलब्ध करुन देईल. भारतात पाच वर्षांत टेलिकॉम स्पेक्ट्रमचा पहिला लिलाव मंगळवारी पूर्ण झाला. टेलिकॉम कंपन्यांद्वारे स्पेक्ट्रमच्या किमती पुढील 18 वर्षांत पूर्ण वसूल केलं जाईल. रिलायन्स जिओ आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा अधिक मजबूत आहे कारण जिओकडे सरासरी 15.5 वर्षांसाठी स्पेक्ट्रम उपलब्ध आहे.

एअरटेलने 18,699 कोटी रुपयांत 355.45 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रम खरेदी केलं

दूरसंचार कंपनी भारतीय एअरटेलने 18,699 कोटी रुपयांत 355.45 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रम खरेदी केलं. सोमवारी 2,250 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू झाला होता. ज्याचं आरक्षित मूल्य हे जवळपास चार लाख कोटी रुपये इतके होते. दोन दिवसांच्या लिलावात 77,814.80 कोटी रुपयांत 855.60 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रम खरेदी करण्यात आलं. वोडाफोन-आयडियाने 1,993.40 कोटी रुपयांत रेडिओ वेव्जसाठी बोली लावली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी