Reliance Jio Prepaid Plan | जिओचा ग्राहकांना झटका, बंद केले हे जबरदस्त प्रीपेड प्लॅन, तुमचा प्लॅन तर नाही ना?

Reliance Jio Prepaid Plan | जिओ या देशातील आघाडीच्या दूरसंचार कंपनीने आपले काही प्रीपेड प्लॅन बंद केले आहेत. ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. जिओने सप्टेंबर महिन्यातच Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शनसोबत पाच नवे प्रीपेड प्लॅन बाजारात आणले होते. हे प्लॅन म्हणजे ४९९ रुपये, ६९९ रुपये, ८८८ रुपये, २,५९९ रुपये आणि ५४९ रुपयांवाले प्लॅन होते. यामध्ये ५४९ रुपयांचा प्लॅन एक डेटा ओन्ली प्रीपेड प्लॅन होता.

Reliance Jio Prepaid Plan
रिलायन्स जिओने बंद केले काही प्रीपेड प्लॅन 
थोडं पण कामाचं
  • जिओने सप्टेंबर महिन्यात Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शनसोबत पाच नवे प्रीपेड प्लॅन बाजारात आणले होते
  • हे प्रीपेड प्लॅन ४९९ रुपेय, ६९९ रुपये, ८८८ रुपये, २,५९९ रुपये आणि ५४९ रुपयावाले प्लॅन होते
  • जिओने ४९९ रुपये, ६६६ रुपये, ८८८ रुपये, २,४९९ रुपये आणि ५४९ रुपयावाले प्लॅन्स बंद केले आहेत

Jio Prepaid Plan | नवी दिल्ली : रिलायन्स जिओ या देशातील आघाडीच्या दूरसंचार कंपनीने आपले काही प्रीपेड प्लॅन बंद केले आहेत. ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. जिओने सप्टेंबर महिन्यातच Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शनसोबत पाच नवे प्रीपेड प्लॅन बाजारात आणले होते. हे प्लॅन म्हणजे ४९९ रुपये, ६९९ रुपये, ८८८ रुपये, २,५९९ रुपये आणि ५४९ रुपयांवाले प्लॅन होते. यामध्ये ५४९ रुपयांचा प्लॅन एक डेटा ओन्ली प्रीपेड प्लॅन होता. रिलायन्स जिओने जेव्हा हे प्लॅन बाजारात आणले होते त्याच काळात Disney+ Hotstar ने आपल्या प्लॅनमध्ये बदल केले होते. (Reliance Jio closes some of the prepaid plan, check the details)

एअरटेल आणि व्होडाफोननंतर जिओकडून बदल

अलीकडेच एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या दोन दूरसंचार कंपन्यांनी आपल्या प्लॅनच्या किंमतीत बदल करत त्यांचे शुल्क वाढवले होते. त्यानंतर रिलायन्स जिओनेदेखील आपल्या प्रीपेड प्लॅनमध्ये बदल केले होते. आता मात्र असे दिसून येते आहे की जिओने आपल्या ४,९९ रुपये, ६६६ रुपये, ८८८ रुपये, २,४९९ रुपये आणि ५४९ रुपयावाल्या प्लॅनना बंद केले आहे. कारण सध्या हे प्लॅन रिलायन्स जिओच्या वेबसाईटवर दिसत नाहीत.

जिओचा ६०१ रुपयांचा प्लॅन

अलीकडेच जिओने आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किंमतीत वाढ केली होती आणि जे प्लॅन्स बंद करण्यात आले आहेत ते या यादीमध्ये नव्हते. सध्या जिओकडे Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शनसह फक्त ६०१ रुपयांचा प्लॅन उपलब्ध आहे. जिओच्या ६०१ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना १ वर्षाच्या मोफत Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शनव्यतिरिक्त ३ जीबी डेटा + ६ जीबी (टोटल ९० जीबी) डेटा, दररोद १०० एसएमएस, २८ दिवसांची व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड कॉल्सची सुविधा दिली जाते आहे. याशिवाय ग्राहकांना जिओटीव्ही आणि जिओसिनेमा यासारख्या अॅप्सची देखील मोफत सुविधा दिली जाते आहे.

जिओकडे अद्यापदेखील ६६६ रुपयांचा प्लॅन उपलब्ध आहे. मात्र आता यामध्ये Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शनची ऑफर देण्यात येत नाही. हे प्लॅन ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा, ८४ दिवसांची व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड कॉल्स, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्स इत्यादी सुविधांची ऑफर देत आहेत.

मोबाइल शुल्कांमध्ये झाली वाढ

काही दिवसांपूर्वीच भारती एअरटेल (Bharti Airtel) आणि व्होडाफोन आयडियानंतर (Vodafone Idea)आता रिलायन्स जिओदेखील (Reliance Jio) आपल्या मोबाइल सेवांच्या शुल्कात वाढ करण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स जिओच्या मोबाइल सेवा शुल्कांमध्ये (mobile services tariffs) २१ टक्क्यांपर्यतची वाढ होणार आहे. पुढील महिन्यापासून म्हणजे १ डिसेंबरपासून जिओचे वाढीव दर (Jio hikes mobile services tariffs) लागू होणार आहेत. जिओच्या मोबाइल शुल्कांमध्ये जरी वाढ होणार असली तरी जिओने एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाच्या तुलनेत मोबाइल शुल्क कमीच ठेवले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या कंपन्यांमध्ये शुल्कावर आधारित स्पर्धा होणार आहे. अर्थात या तिन्ही कंपन्यांनी केलेल्या दरवाढीमुळे ग्राहकांना मात्र फटका बसणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी