जिओने दिली खुशखबर, दोन नवे फायदेशीर प्लान वर्षभराची वैधता, ७३० GB डाटा 

रिलायन्स जिओकडे अनेक कॅटेगरीत प्रत्येक गरजेप्रमाणे ग्राहकांसाठी प्रीपेड प्लान उपलब्ध आहेत. मुकेश अंबानींच्या जिओकडे २ जीबी , ३ जीबी, १.५ जीबी, १ जीबी डाटा  दररोजचे प्रीपेड प्लान उपलब्ध आहेत.

reliance jio good news most beneficial plan
जिओने दिली खुशखबर, दोन नवे फायदेशीर प्लान वर्षभराची वैधता  |  फोटो सौजन्य: BCCL

Realince Jio New Pre paid plan, नवी दिल्लीः  रिलायन्स जिओकडे अनेक कॅटेगरीत प्रत्येक गरजेप्रमाणे ग्राहकांसाठी प्रीपेड प्लान उपलब्ध आहेत. मुकेश अंबानींच्या जिओकडे २ जीबी , ३ जीबी, १.५ जीबी, १ जीबी डाटा  दररोजचे प्रीपेड प्लान उपलब्ध आहेत. कंपनीकडे २ जीबी डाटा  दररोज मिळणारे दोन प्लान आहेत. जे वर्षभर वैधता देतात. म्हणजेच दररोज रिचार्ज करण्याची समस्या संपणार. तसेच या प्लानमध्ये जबरदस्त डाटा  सुद्धा मिळणार आहे. जाणून घेऊ या दोन प्लानविषयी.

२५९९ रुपयांचा प्लान पहिला प्लान

जिओचा २५९९ रुपयांचा प्लानची वैधता ३६५ दिवसांची म्हणजेच संपूर्ण  एका वर्षाची आहे. या रिचार्ज प्लानमध्ये २ जीबी डाटा मिळतो. तसेच कंपनी १० जीबी डाटा  अतिरिक्त देते. म्हणजेच एकूण या प्लानमध्ये ७४० जीबी डाटा  युजर्संना मिळतो. दररोज मिळणाऱ्या डाटा ची लिमिट संपल्यानंतर याची स्पीड कमी होऊन ती 64Kbps होते. ग्राहकांना जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड तर अन्य नेटवर्कवर १२ हजार कॉलिंग मिनिट्स मिळतात.

रिलायन्स जिओच्या या प्लानमध्ये १०० एसएमएस दररोज फ्री मिळतात. तसेच जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन या पॅकमध्ये ऑफर केले जाते. जिओचा हा पॅक ३९९ रुपये किंमतीच्या डिज्नी प्लस हॉटस्टार सोबत येतो.

२३९९ रुपयांचा दुसरा रिचार्ज प्लान

जिओच्या या प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. २३९९ रुपयांच्या प्लानमध्ये रोज २ जीबी डाटा  दिला जातो. एकूण या प्लानमध्ये ७३० जीबी डाटा चा फायदा मिळतो. दररोज मिळणाऱ्या डाटा ची लिमिट संपल्यानंतर त्याची स्पीड कमी होऊन 64Kbps होते. या प्लानमध्ये जिओ ते जिओवर अनलिमिटेड आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी १२ हजार कॉलिंग मिनिट्स मिळतात. रिलायन्स जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये दररोज १०० फ्री एसएमएस मिळतात. तसेच जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन युजर्संना मिळते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी