रिलायन्स जिओने प्रीप्रेड प्लॅन्समध्ये केले मोठे बदल 

फोना-फोनी
रोहित गोळे
Updated Feb 25, 2020 | 19:55 IST

Reliance Jio reduces validity of a popular plan: र‍िलायन्स जिओ यूजर्स (Reliance Jio Users)साठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण जिओने काही पॉप्युलर प्रीपेड प्लॅन्सच्या व्हॅलिडिटीमध्ये कपात केली आहे.

reliance jio made changes in popular prepaid plans reduced validity
रिलायन्स जिओने प्रीप्रेड प्लॅन्समध्ये केले मोठे बदल   |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: Reliance Jio reduces validity: रिलायन्स जिओ यूजर्ससाठी (Reliance Jio Users) एक महत्त्वाची बातमी आहे. कंपनीने आपल्या काही लोकप्रिय प्रीपेड प्लॅन्सची व्हॅलिडिटी (वैधता) कमी केली आहे. पूर्वीच्या तुलनेत आता या योजनांमध्ये ग्राहकांना कमी व्हॅलिडिटी मिळणार आहे. रिलायन्स जिओने हा बदल १२९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये केला आहे. त्याच बरोबर 2020 रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील काही बदल केले आहेत. यासोबतच व्हॅलिडिटी देखील कमी केली आहे. त्यामुळे ग्राहकांना सल्ला आहे की, रिचार्ज करण्याआधी संबंधित प्लॅन्सच्या व्हॅलिडिटीबाबत एकदा संपूर्ण माहिती घ्या. 

यापूर्वी रिलायन्स जिओच्या १२९९ रुपयांच्या वार्षिक प्लॅनमध्ये ३६२ दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात येत होती. मात्र, आता ग्राहकांना या योजनेत ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे. यासह कंपनीने २०२० रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवली असून यासाठी ग्राहकांना २१२१ रुपये मोजावे लागणार आहे. तसंच या प्लॅनच्या व्हॅलिडिटीमध्ये देखील २९ दिवसांची कपात करण्यात आली आहे. हा प्लॅन देखील ग्राहकांन ३३६ दिवसांसाठी उपलब्ध असेल.

प्लॅनच्या व्हॅलिडिटीमध्ये बदल करण्यामागे काही कारणं असल्याचं सांगण्यात येत आहे. जिओचे जेवढेही  रिचार्ज पॅक आहेत. ते २८ दिवसांसाठी वैध आहेत. त्यामुळे वार्षिक रिचार्जच्या प्लॅन्सबाबत देखील हेच सूत्र अंमलात आणण्याची कंपनीची इच्छा आहे. १२ महिन्यांत ग्राहकांना २८ दिवसानंतर ग्राहकांना केवळ ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे.

रिलायन्स जिओ '२०२० नेमकी काय ऑफर होती? 

रिलायन्स जिओ '२०२० हॅप्पी न्यू ईअर ऑफर' (2020 Happy New Year Offer)काही महिन्यापूर्वीच आणली होती. या ऑफरमध्ये  सब्सक्रायबर्सला २०२० रुपयात एका वर्षापर्यंत जिओच्या अनलिमिटेड सेवा मिळणार आहेत. म्हणजे हा प्लॅन घेतल्यानंतर तुम्हाला २०२० रुपयांचं पेमेंट आधी करावं लागणार आहे. त्यानंतर यूजर्सला एक वर्षासाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज १.५ जीबी 4G डेटा, दररोज १०० एसएमएस आणि जियो अॅप्सचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी