JIO चा मोठा धमाका, एकत्र लॉन्च केले दोन जबरदस्त प्लान, मिळणार इतका अधिक डेटा 

रिलान्यस जिओने आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन स्वस्त प्लान आणले आहे. जे १४ दिवसांच्या व्हॅलेडीटीची ऑफर देतात.

Reliance Jio new offer data plan new user affordable charges business news in marathi
JIO चा मोठा धमाका, एकत्र लॉन्च केले दोन जबरदस्त प्लान, मिळणार इतका अधिक डेटा  

मुंबई :  रिलान्यस जिओने आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन स्वस्त प्लान आणले आहे. जे १४ दिवसांच्या व्हॅलेडीटीची ऑफर देतात. ट्रायकडून शेअर करण्यात आलेल्या डेटानुसार रिलायन्स जिओसह इतर नेटवर्क कंपन्यांनी डिसेंबर महिन्यात प्लान्स महाग करून ग्राहकांना झटका दिला होता. त्यामुळे कंपन्यांच्या युजरबेसवर याचा परिणाम झाला. रिलायन्स जिओशी केवळ ८२ हजार ३०८ नवे ग्राहक जोडले गेले आहे. यापूर्वी कंपनीत दर महिन्याला सरासरी  ८० लाख ग्राहक जोडले जात होते. कंपनीने नवीन युजर्सला आकर्षित करण्यासाठी दोन नवीन अफोर्डेबल डेटा प्लान JioPhone युर्जससाठी आणले आहेत. 

कंपनी ४९ चा प्लान १४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसाठी देत आहे. यात १४ दिवसांसाठी २ जीबी डेटा युजर्सला मिळणार आहे. सोबत युजर्सला जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगही मिळणार आहे. दरम्यान, इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी या प्लानमध्ये २५० मिनिट देण्यात आले आहे. मेसेज बाबत बोलायचे तर १४ दिवसांच्या संपूर्ण व्हॅलिडीटीसाठी युजर्सला २५ एसएमएस देण्यात येणार आहे. सोबत जिओ अॅपचे सब्सक्रिप्शन युजर्सला मिळणार आहे. 

४९ प्रमाणे ६९ रुपयांचा प्लानही १४ दिवसांच्या व्हॅलिडिटीची ऑफर देत आहे. दोन प्लानमध्ये डेटाचे अंतर अधिक आहे. ६९ रुपयेच्या प्लानमध्ये १४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह एकूण ७ जीबी डेटा मिळणार आहे. दररोज युजर्स ५०० एमबी डेटा वापरू शकणार आहेत. त्याचा नंतर स्पीड ६४ केबीपीएस राहणार आहे. इतर बेनिफीट मागील प्लान प्रमाणे असणार आहेत. या प्लान्ससाठी जिओ फोन युजर्ससाठीही आहेत. कमी डेटा वापरणाऱ्या युजर्ससाठी हा ऑप्शन चांगला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी