हा प्लॅन देतोय नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम आणि डिस्ने+हॉटस्टार व्हीआयपी, सोबत डेटासुद्धा फ्री फक्त ३९९ रुपयात

फोना-फोनी
Updated Apr 25, 2021 | 22:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

Reliance Jio Plan : रिलायन्स जिओच्या या ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला ७२७ रुपये किंमतीचे सबस्क्रिप्शन मोफत मिळेल, शिवाय अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचाही लाभ मिळेल.

Jio postpaid plan gives free subscription of Netflix, Amazon Prime & Disney+ Hotstar VIP
जिओच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime आणि Disney+ Hotstar VIP मोफत 

थोडं पण कामाचं

  • जिओची जबरदस्त ऑफर
  • जिओचा पोस्टपेड प्लॅन
  • Netflix, Amazon Prime आणि Disney+ Hotstar VIP मोफत

नवी दिल्ली : रिलायन्स जिओ नेहमी आपल्या ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर आणत असते. मात्र रिलायन्स जिओचे असेही काही प्लॅन आहेत ज्यांच्याबद्दल थोड्याच लोकांना माहिती असते. रिलायन्स जिओचे काही असे पोस्डपेड प्लॅन आहेत ज्यामध्ये ग्राहकांसाठी अनेक लाभ आहेत. रिलायन्स जिओचा असाच एक प्लॅन आहे ज्यात तुम्हाला Netflix, Amazon Prime आणि Disney+ Hotstar VIP चे सबस्क्रिप्शन मोफत मिळते आणि तुम्ही ७२७ रुपयांची बचत करता.

जिओ पोस्टपेड

नेटफ्लिक्सच्या एका महिन्याच्या सबस्क्रिप्शनचे शुल्क १९९ रुपये आहे. तर अॅमेझॉन प्राईमच्या एका महिन्याच्या सबस्क्रिप्शनचे शुल्क १२९ रुपये आहे. याशिवाय Disney+ Hotstar VIP चे सबस्क्रिप्शनसाठी ३९९ रुपये मोजावे लागतात. या सर्व सुविधांचा एकत्रित खर्च ७२७ रुपये इतका येतो.  मात्र जिओच्या ३९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये तुम्हाला ही सर्व सुविधा मोफत मिळते.

रिलायन्स जिओच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये काय खास आहे


जिओच्या या ३९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये एका महिन्यासाठी ७५ जीबी डेटा मिळतो. याशिवाय हा डेटा संपल्यानंतर जर तुम्हाला डेटा वापरायचा असेल तर प्रति जीबी १० रुपये मोजावे लागतील. याशिवाय या प्लॅनमध्ये तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि प्रतिदिन १०० एसएमएसचा लाभ घेऊ शकता. या प्लॅनमध्ये तुम्ही आपला डेटा रोल ओव्हर देखील करू शकता. यात २०० जीबीपर्यतचा डेटा रोल ओव्हर करता येतो.

जिओच्या या प्लॅनमध्ये कोणत्या अॅपचे सबस्क्रिप्शन मिळते?


रिलायन्स जिओच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार या प्लॅनमध्ये तुम्हाला Netflix, Amazon Prime आणि  Disney+ Hotstar VIP या अॅपचे सबस्क्रिप्शन सोबत जिओप्राईम चे सबस्क्रिप्शनदेकील मिळते. जिओ प्राईमच्या सबस्क्रिप्शनची किंमत ९९ रुपये आहे. याव्यतिरिक्त JioTV, JioNews, JioSecurity आणि JioCloud च्या मोफत सबस्क्रिप्शनचा लाभही तुम्ही घेऊ शकता.

दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा

भारतातील दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे, अशात जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी दूरसंचार कंपन्या विविध ऑफर्स देत आहेत. देशाच्या दूरसंचार क्षेत्रात रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या तीन आघाडीच्या कंपन्या आहेत. रिलायन्स जिओने बाजारपेठेत पाऊल ठेवल्यापासून दूरसंचार क्षेत्राचे स्वरुपच बदलून गेले आहे.

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने दूरसंचार क्षेत्र काबीज करण्यासाठी जिओमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. आगामी काळात जिओचा मोठा विस्तार करण्याच्या योजना रिलायन्स समूहाने आखल्या आहेत. यासाठी डिजिटल व्यासपीठात जिओचा मोठा विस्तार केला जाणार असून जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. यात फेसबुकचाही समावेश आहे. त्यामुळे आगामी काळात एअरटेल आणि  व्होडाफोनला मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे.

रिलायन्स समूह दूरसंचार क्षेत्राबरोबरच रिटेल क्षेत्रातही मोठा विस्तार करतो आहे. देशातील वाढत्या डिजिटल अर्थव्यवस्थेत निर्माण होणाऱ्या संधींचा लाभ उठवण्यासाठी जिओने मोठ्या योजना आखल्या आहेत. जिओ प्लॅटफॉर्म्समधील गुंतवणूक हा त्याचाच एक भाग आहे. जिओमधील गुंतवणुकीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज ही कर्जमुक्त कंपनी झाली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी