रिलायन्सकडून जिओफोन नेक्स्टची वैशिष्ट्ये जाहीर, दिवाळीच्या मुहुर्तावर येणार फोन

जिओफोन नेक्स्ट हा भारतात बनवलेला स्मार्टफोन असणार आहे. हा भारतीयांसाठी आणि भारतीयांनी बनवलेला फोन असणार आहे. जिओफोन नेक्स्टमुळे प्रत्येक भारतीयाला समान संधी मिळेल आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करता येईल, असे रिलायन्सकडून सांगण्यात आले.

JioPhone Next Key Features
जिओफोन नेक्स्टची वैशिष्ट्ये 
थोडं पण कामाचं
  • मेकिंग ऑफ जिओफोन नेक्स्ट ही फिल्म रिलायन्स जिओकडून प्रसिद्ध
  • रिलायन्स जिओ बाजारात आणतेय जिओफोन नेक्स्ट हा एक नवा स्वस्त स्मार्टफोन
  • गुगल आणि क्वॉलकॉम यांच्या भागीदारीतून बनवण्यात आलेला फोन

मुंबई: रिलायन्स जिओने (Reliance Jio)मेकिंग ऑफ जिओफोन नेक्स्ट ही फिल्म प्रसिद्ध केली आहे . रिलायन्सला जिओफोन नेक्स्ट (JioPhone Next)हा नव्या स्मार्टफोन लॉचिंगच्या पार्श्वभूमीवर ही फिल्म जाहीर करण्यात आली. जिओफोन नेक्स्ट हा एक स्वस्त स्मार्टफोन (Smartphone)असून तो गुगल आणि क्वॉलकॉम यांच्या भागीदारीतून बनवण्यात आलेला फोन आहे. दिवाळीच्या दिवशी हा फोन बाजारात आणला जाणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या योजनेची घोषणा केली. नवा स्मार्टफोन बाजारात आणण्याची घोषणा अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली होती. (Reliance Jio unveils Key Features of JioPhone Next; Check the features)

जिओफोन नेक्स्ट भारतीय बाजारपेठेत

जिओफोन नेक्स्ट हा भारतात बनवलेला स्मार्टफोन असणार आहे. हा भारतीयांसाठी आणि भारतीयांनी बनवलेला फोन असणार आहे. जिओफोन नेक्स्टमुळे प्रत्येक भारतीयाला समान संधी मिळेल आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करता येईल, असे रिलायन्सकडून सांगण्यात आले. जिओफोन नेक्स्टमध्ये प्रगती ओएस असणार आहे. ही एक जागतिक दर्जाची ऑपरेटिंग सिस्टम असून अॅंड्राइडकडून बनवण्यात आली आहे. ही ऑपरेटिंग सिस्टम खास भारतासाठी बनवण्यात आली आहे. रिलायन्स प्रसिद्ध केलेल्या फिल्ममध्ये जिओफोन नेक्स्ट कोट्यवधी भारतीयांच्या आयुष्यात कसा बदल घडवणार आहे ते सांगण्यात आले.

जिओफोन नेक्स्टचा प्रोसेसर क्वॉलकॉमकडून बनवण्यात आला आहे. यामध्ये कनेक्टिव्हिटीवर भर देण्यात आला आहे. शिवाय लोकेशन तंत्रज्ञानावर भर देण्यात आला आहे. फोनची कामगिरी, ऑडिओ सुविधा, बॅटरीची कामगिरी यावरदेखील खास लक्ष देण्यात आले आहे.

जिओफोन नेक्स्टची वैशिष्ट्ये

  1. या स्मार्टफोनमध्ये व्हॉइस असिस्टंट असणार आहे, ज्यामुळे ग्राहकांना इंटरनेटवरून सहजपणे माहिती घेता येणार आहे.
  2. ग्राहकांना हव्या असलेल्या भाषेत ते ही सुविधा घेऊ शकणार आहेत. त्याचबरोबर स्क्रीनवर असलेली माहिती ग्राहकांसाठी फोनच वाचून दाखवणार आहे. त्याचबरोबर ट्रान्सलेट सुविधेद्वारे ग्राहकांना स्क्रीनवरील माहिती त्यांच्या आवडीच्या भाषेत भाषांतरीत करता येणार आहे. यामुळे ग्राहक आपल्या आवडीच्या भाषेनुसार माहिती वाचू शकणार आहेत.
  3. नव्या जिओफोन नेक्स्टमध्ये विविध प्रकारच्या फोटोग्राफी मोडना साहाय्यक ठरणारा कॅमेरा असणार आहे. त्यात पोट्रेट आणि नाइट मोड असणार आहे. कॅमेरामध्ये इंडियन ऑगमेंटेड रिअॅलिटी फिल्टर्स असणार आहेत.
  4. हा नवा स्मार्टफोन सर्व अॅड्राइड अॅप्ससाठी सहाय्यक असणार आहे, म्हणजे या नव्या फोनवर सर्व अॅड्राइड अॅप्स वापरता येणार आहेत.
  5. प्रगती ओएसमुळे फोनची कामगिरी सुधारणार आहे. शिवाय बॅटरीचे आयुष्य वाढणार आहे. 

मुकेश अंबानींना त्यांचे वडील धीरुभाई अंबानी यांच्याकडून पेट्रोलियम आणि तेलशुद्धीकरणाचा व्यवसाय मिळाला. तेव्हापासून मुकेश अंबानींनी या व्यवसायाबरोबरच दूरसंचार, रिटेल, तंत्रज्ञान आणि ई-कॉमर्सच्या क्षेत्रात जबरदस्त मुसंडी मारली आहे. २०१६ मध्ये रिलायन्स जिओची सुरूवात करून अंबानींनी दूरसंचार क्षेत्रात एकप्रकारे क्रांतीच घडवली आहे. त्याचबरोबर रिटेल क्षेत्रातदेखील रिलायन्सची जबरदस्त घोडदौड सुरू आहे. मागील वर्षीच जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुगल, फेसबुक आणि सिल्व्हर लेकसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. जिओमध्ये एकूण २७ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी