रोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस फ्री, फक्त ७५ रुपयांपासून सुरू होतो जिओचा हा प्लॅन

फोना-फोनी
Updated May 03, 2021 | 17:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

जिओच्या विविध प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगबरोबरच डेटा, एसएमएस आणि इतर अनेक सुविधा मिळतात. अशाच किफायतशीर प्लॅनबद्दल जाणून घेऊया.

Reliance Jio best recharge plans
रिलायन्स जिओचे रिचार्ज प्लॅन फक्त ७५ रुपयांपासून 

थोडं पण कामाचं

  • रिलायन्स जिओचे स्वस्त प्लॅन
  • फक्त ७५ रुपयांपासून सुरूवात
  • स्वस्त आणि मस्त रिचार्ज प्लॅन

नवी दिल्ली : स्वस्त प्लॅन देण्याच्या स्पर्धेत जिओ सर्वात पुढे आहे. जिओच्या विविध प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगबरोबरच डेटा, एसएमएस आणि इतर अनेक सुविधा मिळतात. अशाच किफायतशीर प्लॅनबद्दल जाणून घेऊया.

जिओच्या या प्लॅनची सुरूवात ७५ रुपयांनी होते आणि २०० रुपयांपर्यत जाते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना २ जीबी हाय स्पीड डेटा, अनलिमिटे़ कॉलिंग आणि इतर नेटवर्क मोफत मिळतात. हा प्लॅन जिओफोन वापरणाऱ्यांसाठी आहे. यामध्ये इतरही अनेक सुविधा देण्यात आलेल्या आहेत. 

JioPhone चा ७५ रुपयांचा प्लॅन


या प्लॅनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची व्हॅलिडिटी सोबत ३ जीबी डेटा आणि जिओ (Jio) नेटवर्क अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तर इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी तुम्हाला ५०० मिनिटे आणि ५० एसएमएस मिळतात. 

JioPhone चा १२५ रुपयांचा प्लॅन


या प्लॅनमध्ये ग्राहकांना १४ जीबी डेटा मिळतो. यात दररोज तुम्ही ०.५ जीबी डेटा वापरू शकता. याशिवाय ग्राहकांना ३०० मोफत एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय ग्राहकांना jio App
चे सबस्क्रिप्शनसुद्धा मिळते. या सुविधांबरोबरच जिओ नेटवर्कवर फ्री अनलिमिटेड कॉलिंग आणि इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी ५०० मिनिटे मिळतात.

JioPhone चा १५५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन


या प्लॅनची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे आणि यामध्ये ग्राहकांना रोज १ जीबी डेटा मिळतो. शिवाय यात जिओ नेवटर्कवर कॉलिंग मोफत आणि इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी ५०० मिनिटे मिळतात. या सुविधांव्यतिरिक्त ग्राहकांना रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शनदेखील मिळते.

JioPhone चा १८५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन


या प्लॅनअंतर्गत २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते आणि दररोज २ जीबी डेटा मिळतो. याशिवाय जिओ नेटवर्कवर मोफत कॉलिंग आणि इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी मोफत ५०० मिनिटे मिळतात. या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस मिळतात आणि तुम्हाला जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शनदेखील मिळते.

स्वस्त आणि किफायतशीर प्लॅन देण्यासाठी रिलायन्स जिओ प्रसिद्ध आहे. देशातील दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया या तीन दूरसंचार कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा आहे. या तिन्ही कंपन्या ग्राहकांसाठी निरनिराळ्या ऑफर आणि प्लॅन आणत असतात. यात जिओच्या बाजारातील एन्ट्रीमुळे दूरसंचार क्षेत्राचे निकषच बदलून गेले आहेत. आता फ्री कॉलिंग आणि एसएमएसच्या सुविधेने ग्राहक आकर्षित होत नाहीत. किती आणि मोफत डेटा दिला जातो आहे हे प्लॅनमध्ये महत्त्वाचे असते. याशिवाय विविध मनोरंजनाच्या अॅपचे सबस्क्रिप्शनदेखील महत्त्वाचे असते. रिलायन्स जिओ आपल्या प्लॅनद्वारे ग्राहकांना जिओ अॅपचे मोफत सबस्क्रिप्शन आपल्या ग्राहकांना देत असते.

आगामी काळात मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ देशातील दूरसंचार क्षेत्र पादाक्रांत करण्यासाठी मोठा विस्तार करणार आहे. मागील वर्षी जिओने मोठी आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदेखील उभारली होती. फेसबुकनेदेखील जिओमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी