Reliance Jio: 'या' प्लान्समध्ये दररोज मिळतो 3GB डेटा, जाणून घ्या सविस्तर

Jio prepaid plans: रिलायन्स जिओकडून प्रीपेड प्लानमध्ये ग्राहकांना दररोज 3GB डेटा मिळत आहेत. असे तीन प्लान्स आहेत ज्यामध्ये ही सुविधा ग्राहकांना मिळत आहेत. जाणून घेऊयात या प्लान्स संदर्भात...

Reliance Jio
Reliance Jio  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई : मुकेश अंबानी यांची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने खूपच स्वस्त 4G प्रीपेड प्लान्स ऑफर करण्यास सुरुवात केली आहे. रिलायन्स जिओकडून नेहमीच ग्राहकांसाठी काहीतरी नवीन आणि स्पेशल ऑफर लॉन्च करण्यात येत असतात आणि त्यामुळेच रिलायन्स जिओने देशभरात आपल्या ग्राहकांच्या संख्येत वाढ केली आहे. स्वस्त प्रीपेड प्लान्सचा मुद्दा आला तर रिलायन्स जिओचे प्लान्स ग्राहकांची पसंती असते. रिलायन्स जिओचे असेही काही प्लान्स आहेत जे प्रति दिवस युजर्सला 3GB डेटा उपलब्ध करुन देतात.

जिओ 349 रुपयांचा प्लान (Jio 349 prepaid plan)

349 रुपयांच्या जिओ प्रीपेड प्लानमध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी 3GB डेटा प्रति दिवस मिळतो. म्हणजेच युजर्सला महिन्याभरात 84GB डेटा मिळणार आहे. तसेच दररोजची डेटा लिमिट संपल्यावर युजर्सला 64 KBPS या स्पीडने इंटरनेट वापरता येणार आहे. हा एक अनलिमिटेड कॉम्बो प्रीपेड प्लान आहे ज्याचा अर्थ आहे की, यामध्ये अनलिमिटेड वॉईस कॉलिंग आणि 100 SMS प्रति दिन मिळणार आहेत. जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमा सारख्या जिओ अॅप्स सबस्क्रिप्शन युजर्सला मिळणार आहे.

जिओ 401 रुपयांचा प्लान (Jio 401 prepaid plan)

जिओचा 401 रुपयांचा जिओ प्लान आहे ज्यामध्ये सप्टेंबर महिन्यात आयपीएल 2020 पूर्वी लॉन्च करण्यात आला होता. या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे. यामध्ये ग्राहकांना प्रति दिवस 3GB डेटा मिळणार आहे. म्हणजेच युजर्सला महिन्याभरात 84GB डेटा मिळणार आहे. यासोबतच अतिरिक्त 6GB डेटाचा लाभ मिळून एकूण 90GB डेटा ग्राहकांना मिळणार आहे. हा एक अनलिमिटेड कॉम्बो प्लान आहे ज्यामध्ये अनलिमिटेड वॉईस कॉलिंक आणि 100SMS प्रति दिनचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे. 401 रुपयांच्या जिओ प्लानमध्ये डिज्नी+ हॉटस्टार व्हीआयपीचं सब्सस्क्रिप्शन ग्राहकांना मिळणार आहे.

जिओ 999 रुपयांचा प्लान (Jio 999 prepaid plan)

तर, रिलायन्स जिओच्या 999 रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये ग्राहकांना 84 दिवसांसाठी प्रति दिवस 3GB डेटा मिळणार आहे. या रिचार्जसह युजर्सला अनलिमिटेड वॉईस कॉलिंग, प्रति दिवस 100 SMS आणि जिओ अॅप्सचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी