जिओच्या ग्राहकांना फक्त १ रुपया जास्त देऊन मिळतोय ५६ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएस, जाणून घ्या ऑफर

फोना-फोनी
Updated May 02, 2021 | 22:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त रिचार्ज प्लॅन आणले आहेत. जिओने फक्त १ रुपया वाढवून एक नवा प्लॅन आणला आहे. हा प्लॅन ५६ जीबी ४जी इंटरनेट आणि २८ दिवसांची व्हॅलिडिटी देतो.

Reliance Jio Offer
रिलायन्स जिओचे भन्नाट प्लॅन 

थोडं पण कामाचं

  • रिलायन्स जिओचे प्रीपेड प्लॅन
  • ५९८ रुपयांचा प्लॅन
  • ५९९ रुपयांचा प्लॅन

नवी दिल्ली : दूरसंचार कंपन्यांमधील स्पर्धा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त रिचार्ज प्लॅन आणले आहेत. जिओने फक्त १ रुपया वाढवून एक नवा प्लॅन आणला आहे. हा प्लॅन ५६ जीबी ४जी इंटरनेट आणि २८ दिवसांची व्हॅलिडिटी देतो.

रिलायन्स जिओ

रिलायन्स जिओचा ५९८ रुपये आणि ५९९ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन (Prepaid Recharge Plans)यामध्ये फक्त १ रुपयांचे फरक आहे. कोणालाही वाटले यामुळे प्लॅनमध्ये काय फरक पडणार. मात्र तसे नाही, कारण जिओने यात मास्टरस्ट्रोक मारला आहे. कारण फक्त एक रुपयांच्या फरकाने ग्राहकांना २८ दिवसांसाठी रोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएसची सुविधा मिळेल. जिओच्या या ५९८ रुपये आणि ५९९ रुपयांच्या प्लॅनबद्दल जाणून घेऊया.

रिलायन्स जिओचा ५९८ रुपयांचा प्लॅन


रिलायन्स जिओचा ५९८ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी फक्त ५६ दिवसांची आहे. ग्राहकांना यामध्ये दररोज २ जीबी हाय स्पीड ४जी डेटा, अनलिमिटेड लोकल-एसटीडी कॉलिंग आणि १०० एसएमएसचा लाभ मिळतो. म्हणजेच या प्लॅनमध्ये एकूण ११२ जीबी डेटा मिळतो. कंपनी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय Jio Apps ची मेंबरशीप आणि १ वर्षासाठी Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन देते.

जिओचा ५९९ रुपयांचा प्लॅन


रिलायन्स जिओचा ५९९ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये रोज २ जीबी हाय स्पीड ४जी इंटरनेट, अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग आणि १०० एसएमएस चा लाभ मिळतो. याची व्हॅलिडिटी ८४ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये एकूण १६८ जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये Jio Apps चे सबस्क्रिप्शनदेखील मिळते.

या दोन प्लॅनमधील फरक स्पष्ट आहे. ग्राहकांना फक्त १ रुपया जास्त देऊन २८ दिवसांची अतिरिक्त व्हॅलिडिट आणि ५६ जीबी इंटरनेट चा लाभ घेता येतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे बजेट असेल तर ५९९ रुपयांचा प्लॅन घेणेच फायद्याचे ठरेल. फायद्याची आणखी बाब म्हणजे या प्लॅनमध्ये ग्राहक जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी, जिओ क्लाऊड आणि जिओ न्यूजचा आनंद घेऊ शकतात.

कंपन्यांमधील तीव्र स्पर्धा

देशातील दूरसंचार क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधील स्पर्धा तीव्र झाली आहे. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्या जास्तीत जास्त ग्राहकांना जोडण्यासाठी वेगवेगळे प्लॅन आणि ऑफर बाजारात आणत असतात. जिओने दूरसंचार क्षेत्रात एन्ट्री केल्यानंतर या क्षेत्राचे स्वरुपच पालटून गेले आहे. आगामी काळात दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे.

मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ विस्ताराच्या मोठ्या योजना आखते आहे. मागील वर्षी जिओने मोठी आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. रिलायन्स जिओमध्ये फेसबुकनेदेखील गुंतवणूक केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज इतर क्षेत्रांमध्येही आपला व्यवसाय विस्तारते आहे. रिटेल व्यवसायातसुद्धा विस्तार करण्याच्या रिलायन्सच्या मोठ्या योजना आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी